नवीन लेखन...

अध्यात्माचा तास हवा आहे

८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे-२०१०

राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन ललित लेखन स्पर्धा

अध्यात्माचा तास हवा आहे

लहानपणी अध्यात्म वगैरे इतकं काही माहित नव्हतं. पण एक मात्र खरं आहे की, संध्याकाळी देवापुढे दिवे लागणं झाली की, शुभंकरोतीचे स्वर घरात निनादु लागायचे. आजीच्या मागोमाग एकएक श्र्लोक म्हणत म्हणत केव्हा दासबोधातील चरणं संपली हे कळायचंही नाही. आणि आजीच्या पुढे बोबड्या बोलातून ओघानेच “पसायदान” म्हटलं जायचं. भगवतगीतेतील अध्याय अर्थ समजेपर्यंत पाठ केलेले मला अजुनही आठवतात. रामरक्षा, अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र आम्ही केव्हा शिकलो हे अद्यापही न उलगडलेलंच कोडं आहे. शाळेतल्या मधल्या सुट्टीची डबा खाण्याची वेळ असो किंवा घरातील माणसांबरोबर एकत्रित जेवणाची पंगत असो. “वदनीकवल घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घ्या तापुकाचे” ह्या ओळी म्हटल्याशिवाय अन्नाला पंचपक्वान्नाची गोडी येत नव्हती. म्हणून सकाळच्या अंघोळीनंतर भगवतगीतेच्या अध्यायापासून ते सायंकाळच्या दिवेलागणीच्या शुभंकरोतीपर्यंत आमच्या विविध वेळांचे विविध श्लोक, प्रर्थना किंवा देवाचीच गाणी यात वेळ कसा चटकन् निघून जायचा हे कळायचंही नाही.

आजीबरोबर देवदर्शनाला जाण्याची भारी हौस. अमुक एका देवाला सोमवारी का जातात, किंवा तमुक एका देवाला तेल का वाहतात याची कोणतीच शहनीशा करणं लहान वयात साजेसं नव्हतं. आणि म्हणुनच एखाद्या सिनेमापेक्षा मी देवळात जाणं अधिक पसंत करु लागलो. देवाजवळ काही मनानं मागितलच तर ते म्हणजे “सगळ्यांना सुखी ठेव” या व्यतिरिक्त आणखी काही मागायचं असतं हे तेव्हा माहितही नव्हतं.

शाळेत शिकवल्या जाणार्‍या प्रार्थनेचे संदर्भ वेगळे होते. त्यातील अर्थ हा शब्दांच्या पलीकडे होता. त्यामुळे केवळ लहानपणी नुसत्याच म्हटलेल्या प्रार्थनेपेक्षा या प्रार्थना संजीवक आणि जीवनासाठी प्रार्थनेतून वेगळं दान मागणार्‍या होत्या. त्यातील अर्थ प्रार्थना म्हणण्यानरोबरच वाचुनही अधिक सकारात्मकपणे उमगत होता. त्यातील आशय हा जीवनातील प्रत्येक घटीकेशी निगडीत होता.

अध्यात्म हे केवळ जीवनदृष्टांत देण्यापुरताच मर्यादीत नसतं किंबहुना ते तसं असुही नये. कारण पौराणिक महाकाव्यांतून किंवा वेदांतुन, उपनिषदांतुन, केवळ जीवन दृष्टांताचा साक्षात्कार न होता, ते अध्यात्म या पलीकडे जाऊन एका परमोच्च आनंद क्षणापर्यंत अलौकिक असतं. अध्यात्माचा आपण घेतलेला अर्थ किंवा ते कसं असावं किंवा असु नये यासाठी अनेकांनी केलेल्या सोईनुसार व्याख्या उचित नाहीत असं नाही तर प्रत्येक अध्यात्मातील ग्राह्यांश हाही अध्यात्माच्या व्याख्येपलीकडे जाऊन पोहोचतो.

पारंपारिक समाजाने आणि आजच्या आधुनिक समाजाने स्विकारलेलं अध्यात्म यात फरक पडतो. कारण आधुनिक म्हणवणार्‍या समाजात सायंकाळी दिवेलागणीला “शुभंकरोती” म्हटलं जात असेल ना? कारण संस्कार, मुल्य, परंपरा याही प्रत्येकाने आपापल्या सोई प्रमाणे ठरविल्या ठरविल्या आहेत. त्यामुळे पॉप संगीताच्या तालावर थिरकणारी आमची पिढी एकुणच अध्यात्माचा भविष्यात किती विचार करेल याबद्दल शंका वाटते. कारण अध्यात्मापेक्षाही आपल्या दैनंदिन सकारात्मक कर्मांनाच पुष्टी देताना दिसते ती आजची पिढी.

ज्या साधुमहंतांना परमेश्वर कृपेचा लाभ झाला आहे दृष्टांत झाला आहे अशा साधुमहंतांनी जगाला दिलेला संदेश आजच्या पिढीकडुन सकारात्मक मार्गाने पाळला जाईल पण, त्याचे संदर्भ वेगळे असतील.

“अध्यात्माचा तास हवा आहे” असं म्हणताना मला अध्यात्माची लागलेली गोडी, आवड आणि तो तास हवा असण्याची धडपड पुढची पिढी करेल काय? या प्रश्नाची उकल होणं कठीण असेल पण, अशक्य मुळीच नाही म्हणुनच अध्यात्माचा तास हवा असण्याची धडपड माझ्या पिढीकडून पुढच्या किंबहुना नंतरच्या अनेक पिढीपर्यंत सुरु ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील असेन….असेनच….

— प्रकाश प्रभाकर बोरडे
१ /१०२, सुरज अपार्टमेंट
पाचपाखाडी, नितिन कंपनी समोर,
ठाणे (प.) ४००६०२
भ्रमणध्वनी – ९७६८३८३२४२

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..