नवीन लेखन...

अमेरिकन विनोदी अभिनेता ऑलिव्हर हार्डी

आपल्या लहानपणीच्या या जाड्या-रड्याच्या जोडीनं १९२६ पासून खरी धमाल सुरू केली. त्यांचा जन्म १८ जानेवारी १८९२ रोजी झाला. या जाड्या-रड्याच्या एका जोडीनं आपल्या ‘द म्युझिक बॉक्स’ या लघुपटासाठी त्या विभागातलं पहिलं वहिलं ऑस्कर पटकावलं होतं. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक तुडूंब प्रसन्न असायचे होते. सा-या जगभर या जाड्या-रड्याचा धुमाकूळ चालू होता. ‘पुटींग पँट्स ऑन फिलिप’ हा लॉरेल-हार्डीचा एकत्र असा पहिला लघुपट आला १९२७ मध्ये. हा मूकपट होता जगातल्या सुमारे वीस भाषांमध्ये हे लघु-चित्रपट अनुवादित झाले आणि पुन:पुन्हा पाहिले गेले. स्टॅन लॉरेल आणि ऑलिव्हर हार्डी या जोडीनं हॉलिवूडमध्ये तब्बल १०७ चित्रपट केले. ही संख्या त्यांच्या एकत्र असलेल्या चित्रपटांची आहे. यात एकूण ३२ मूक-लघुपट, ४० लघुपट आणि २३ पूर्ण लांबीचे चित्रपट आहेत. शिवाय १२ चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुण्या कलाकारांची भूमिका केली होती.

त्यापूर्वी म्हणजे त्यांची जोडी होण्यापूर्वीच लॉरेलनं ५० आणि हार्डीनं तर चक्क २५० चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या! १९२१ मध्ये ‘द लकी डॉग’ हा त्यांचा एकत्र असा चित्रपट आला होता, पण तो ‘लॉरेल-हार्डी’ जोडीचा चित्रपट म्हणून ओळखला जात नाही. तेव्हाच त्यांची जोडी करायला हवी होती, पण त्यांना नंतर एकत्र आणलं हाल रोच या निर्मात्यानं. १९३२ साली आलेला तीस मिनिटांचा असाच एक लघुपट म्हणजे ‘द म्युझिक बॉक्स’. दिग्दर्शक जेम्स पॅरोट आणि निर्माता हाल रोच. लघुपटांसाठी दिलं जाणारं पहिलं ऑस्कर या चित्रपटानं पटकावलं आणि एवढंच नाही तर १९९७ मध्ये हा चित्रपट अमेरिकेच्या नॅशनल फिल्म रजिस्ट्रीमध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अभिरूचीसंपन्न वारसा म्हणून जतन करून ठेवण्याचा निर्णय झाला. ‘लॉरेल-हार्डी’ आणि ‘अवर गँग’ या निर्माता हाल रोच यानं जगाला बहाल केलेल्या दोन लघुपट मालिका आहेत. पैकी लॉरेल हार्डीचं यश प्रचंड मोठं होतं. ते दोघे १९४० पर्यंत ते ‘हाल रोच स्टुडिओ’ बरोबर काम करत होते. त्यानंतर पाच वर्षं त्यांनी ‘ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स’ आणि ‘एमजीएम’ बरोबर एकूण आठ चित्रपट केले. आपला शेवटचा चित्रपट ‘अॅसटॉल के’ केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून रीतसर निवृत्ती घेतली. आज ही या जोडीचे चित्रपट बघताना वेगळाच आनंद असतो.

ऑलिव्हर हार्डी यांचे ७ ऑगस्ट १९५७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट

लॉरेल हार्डी चे चित्रपट
‘द म्युझिक बॉक्स’
https://www.youtube.com/watch?v=JCc_8xpBzwY
https://www.youtube.com/watch?v=SLOq2zWUZsQ


https://www.youtube.com/watch?v=YzqPoeuGwsE
https://www.youtube.com/watch?v=zTAPZTfIXVE

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..