कायदेविषयक लेखन

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणं आवश्यक आहे.

पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणं कायद्याने अनिवार्य करणं आवश्यक आहे. काल-परवाच एक व्हीडीओ पाहिला. एका लहान मुलीला तिची आई हवीय. तिला भुकही लागलीय. पण ती ज्या शाळा नामक पिंजऱ्यात आहे, त्या पिंजऱ्याची टिचर नामक रिंगमास्टर तिला इंग्रजीतून प्रश्न विचारतेय. ती लहान मुलगी अगदी असहाय होऊन रडतेय, तर ती रिंगमास्टर तिला दम देऊन हसायला सांगतेय. […]

सरकारनं लाल दिवा काढला, आता हे ही करावं

केंद्र सरकारने काही ठराविक सेवा वगळल्यास सर्वच मंत्री-अधिकाऱ्यांच्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय घेतला हे अतिशय उत्तम काम केलं. सामान्य जनतेच्या भावना सरकार ओळखू शकलं याचा अर्थ सरकारची जनतेशी नाळ जुळली आहे असा होतो. आता सरकारने आणखी एक काम करावं. ‘भारत सरकार’ किंवा ‘मबाराष्ट्र शासन’ असं मराठी-इंग्रजीत मागे-पुढे लिहिलेल्या अनेक सरकारी व खाजगी गाड्या दिसतात. […]

गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?

“गोहत्या बंदी” हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. ‘स्वदेशी आंदोलन’ हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे. […]

कायद्यात अडकलेला प्रजासत्ताक दिन सन २०१७

ही घटना सत्य आहे. मुंबईच्या हायकोर्टात मी स्वत: अनुभवलेली आहे. हायकोर्ट व प्रजासत्ताक दिनासंबंधी असल्याने हायकोर्टाचा सन्मान व ‘प्रजे’च्या भावनांना या लेखामुळे अनवधनानं काही धक्का पोहोचल्यास त्याबद्दल आधीच माफी मागून ठेवतो. झालंय काय, की सन्मान व भावना या दोन गोष्टी इतक्या नाजूक झाल्यायत ती त्या कधी आणि कशामुळे तुटतील आणि दुखावतील सांगता येत नाही.. दिवस अगदी […]

पासपोर्ट का आणि कशासाठी?

आपला देशातून जगातील इतर कोणत्याही देशांत जाण्यासाठी पासपोर्ट अनिवार्य आहे. पासपोर्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सरकार कडून नागरिकाला प्रदान केले गेलेले अधिकृत प्रमाणपत्र. नागरिकत्वाचा हा एक सबळ पुरावा असतो. त्यामुळे परदेशात जाताना पासपोर्ट व त्या देशाचा व्हिसा अत्यावश्यएक असतो. अमेरिका आणि युरोपमधील देशांचे व्हिसा मिळविण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष जाण्याच्या दिवसांपूर्वी काही महिने आधी सुरू करावी लागते. पासपोर्टमध्ये तुमच्या […]

बेस्ट बिफोर…..!

२४ डिसेंबर १९८६ रोजी राष्ट्रपतींनी “ग्राहक संरक्षण कायदा – १९८६” वर स्वाक्षरी केली. या निमित्ताने आपण दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो. पण एक जागरूक ग्राहक म्हणून आपण त्याचा किती उपयोग करतो? […]

महाराष्ट्रातला सेवा हमी कायदा

महाराष्ट्रात आता ‘राईट टू सर्व्हिस अॅक्ट’ म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43 सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही. तब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल… आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे […]

शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदी का लादली असावी ?

शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेश असावा कि नाही याच्या वादामुळे माझ कुतूहल चाळवल गेलं आणि मुळात अशी बंदी का लादली गेली असावी याचा विचार मन करू लागलं..माझ्या मनाने माझ्या ज्येतिषशास्त्राच्या अभ्यासाशी लावलेली संगती आपल्यासमोर ठेवतो..या विषयातील तज्ञ मार्गदर्शन करतीलच. ज्योतिषात शनीला अत्यंत महत्व दिल गेलं आहे. शनी हा पहिल्या प्रतिचा अशुभ ग्रह मानला गेलेला आहे. मृत्यूचा […]

राष्ट्रीय भूमापन दिन

भारतातील जमिनींची मोजणी १० एप्रिल १८०२ रोजी  सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील. गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले? त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटीश अधिकारी होता. त्याने ३३ गुणिले ३३ अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. […]

राष्ट्रीय ध्वजसंहिता

गेले काही दिवस महाराष्ट्रातील काही आमदारांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या बातमीवरुन विधिमंडळात आणि बाहेरही गदारोळ सुरु आहे. रा्ट्रीय प्रतिके वापरण्याचे आणि त्यांना योग्य तो मान देण्यासाठी काही नियम केले गेले आहेत. मात्र कितीजणांना हे नियम माहित आहेत हा प्रश्नच आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, […]

1 2 3 4