नवीन लेखन...

झटपट आनंद – तात्पुरत्या सुखासाठी…

“झटपट आनंद – तात्पुरत्या सुखासाठी भविष्यातील होणारा तोटा स्वीकारणे.”

एखाद्याला डॉक्टरांनी सांगितले असते कि अंडी मटण एकदम बंद- बाहेरचं खाणं बंद फक्त साधे जेवण वेळच्या वेळी खा. ते पटलेलं असते, परंतु कुठूनतरी मिसळपावचा किंवा चायनीजचा वास येतो किंवा मित्रांच पार्टिचे नियोजन सुरु होतं. मग काय डॉक्टरांनी सांगितलेल हळूच बाजूला पडते नी आपोआपच पार्टीला हजेरी लागते. मग काय कसली शुगर नी कसला बीपी ?

दुसरे उदाहरण – उद्यापासून पहाटे लवकर उठून व्यायाम करण्याचं नियोजन असते पण सकाळी अंथरुणावरून उठावेसे वाटत नाही.

काही लोक तर म्हणतात कि “अलार्म बंद करून झोपाल्यावर रात्रीपेक्षापण चांगली झोप लागते ”
असे करता करता व्यायामाचे राहूनच जाते.

हि दोन जशी perfect उदाहरणे आहेत तशीच आणखीन काही आहेत.

गरजेशिवायचा अतिरिक्त खर्च करणे – हे तुमच्याकडुन नकळत होते.

उदा. तुम्ही एक जाहीरात बघता 100 Megapixel चा कॅमेरा ज्यात 2000 पट optical zoom ची फ़ॅसिलिटी आहे. किमतीवर २०% सुट आणि ”मासिक सुलभ हप्त्यावर उपलब्ध” असे कळताच आपल्यातला फोटोग्राफ़र जागा होतो.

किंवा “५२ इंची LED TV वर १५% डिस्काउंट, सोबत होमथिएटर फ़्री” अशी जाहिरात बघताच आपल्याला जाणवू लागते कि आपली जूनी टिव्ही बदलायची वेळ आली आहे. मग काय अशी खरेदी नकळतच होवुन जाते.

असे करताना बऱ्याचदा अशा वस्तूंची खरेदी खरंच गरजेची आहे का? हे आपण तपासत नाही. सर्व शेजारी, पाहुण्याकडे आहेत किंवा सगळे स्टाफ मेंबर घेत आहेत म्हणूनपन काही लोक खरेदी करतात. याबाबतीत मात्र “जगाबरोबर राहिलं पाहिजे” असे त्यांना वाटते

नवीन मॉडेल आले कि लगेच TV किंवा मोबाईल बदलले जातात.

यात जाणाऱ्या पैशाचा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही याचे कारण म्हणजे तात्पुरते समाधान -Instant Gratification.

People
spend money,
to buy things,
to impress the people’s,
People’s- who they never like.

यामुळे होतं काय की ” गरज नसलेल्या वास्तूसाठी जेव्हा जास्त पैसा खर्च होतो तेव्हा गरजेच्या गोष्टीसाठी पैसा उरत नाही.

या दसरा आणि दिवाळीच्या सणात अशाप्रकारच्या तात्पुरत्या सुखाच्या जास्त नादी लागू नका. तुमचे आरोग्य, कुटुंब, धन-संपत्ती यांच्याबद्दलचे निर्णय घेताना आपण “INSTANT GRATIFICATION” च्या ट्रॅपमध्ये अडकलेले नाही ना याची खात्री करा.

फुल्ल प्लॅनिंग असणे हाच यातून वाचण्याचा मार्ग आहे.

Forwarded post from Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..