नवीन लेखन...

लेखिका,गायिका, नाट्यअभिनेत्री माधुरी पुरंदरे

माधुरी पुरंदरे यांचा जन्म २९ एप्रिल १९५२ रोजी झाला.

माधुरी पुरंदरे या अतिशय दर्जेदार आणि सहजसोप्या लिखाणातून लहान मुलांना वाचनाची गोडी लावून, पुस्तकांकडे ओढून नेणाऱ्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्या उत्तम गायिका, तसंच नाट्यअभिनेत्रीही आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे वडील आणि समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन, स्त्री-शिक्षण, ग्रामविकास, बालवाड्या अशा अनेक आघाड्यांवर काम करणाऱ्या समाजसेविका निर्मला पुरंदरे ह्या त्यांच्या आई.

माधुरी पुरंदरे यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून जीडी आर्टचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्ट यांचे शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी फ्रेंच भाषेचा डिप्लोमाही केला. पुढे अनेक वर्षे त्यांनी अलीओंस फ्रांसेज संस्थेमध्ये फ्रेंच भाषा शिकवण्याचे कार्य केले. चित्रकला आणि साहित्य या दोनही क्षेत्रांत उत्तम गती असणाऱ्या माधुरी पुरंदरे यांनी बाल व कुमारांसाठी विपुल लेखन केले आहे.

‘आमची शाळा’, ‘राधाचं घर’, ‘यश संच’, ‘सख्खे शेजारी’, ‘पाचवी गल्ली’, अशा पुस्तकांतून त्यांनी मुलांच्या भावविश्वाचा आणि त्यांच्या आसपासच्या परिसराचा घेतलेला शोध मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही भावणारा ठरला आहे. ‘वाचू आनंदे’ या पुस्तक-संचातून चांगल्या मराठी साहित्यातील निवडक वेच्यांची आणि त्या आधारे देशभरातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांची आणि विविध चित्रशैलींची त्यांनी ओळख करून दिली. मुलांना भाषाभ्यासाची गोडी लागावी, त्यांची व्याकरणाची जाण वाढावी या हेतूने लिहिलेला ‘लिहावे नेटके’ हा पुस्तक-संच मुलांसाठीच नव्हे, तर मोठ्यांसाठीही भाषेचा अभूतपूर्व मार्गदर्शक ठरला.

मुलांप्रमाणेच प्रौढांसाठीही त्यांनी उत्तम साहित्यनिर्मिती केली आहे. त्यांनी मराठीत लिहिलेल्या पिकासोच्या चरित्राला कोठावळे पुरस्कार मिळाला. मराठीतील कोसला, वाडा चिरेबंदी, बलुतं अशा दर्जेदार पुस्तकांचा त्यांनी फ्रेंचमध्ये अनुवाद केला आहे तर वेटिंग फॉर गोदो, लस्ट फॉर लाइफ, हॅनाज सूटकेस अशी जगप्रसिद्ध पुस्तके मराठीत आणली आहेत. आमची शाळा, बाबाच्या मिश्या, हॅनाची सुटकेस, हात मोडला, जादुगार आणि इतर कथा, कोकरू, फ्लॅट नंबर थर्टी सिक्स, लिहावे नेटके, मासोळी आणि चिमुकलं पाखरू, मोठी शाळा, मुखवटे, पाचवी गल्ली, शाम्याची गंमत व इतर कथा, सिल्व्हर स्टार, सुपरबाबा, Yash Big School, Yash Guest, झाडं लावणारा माणूस, चित्रवाचन, कंटाळा, मामाच्या गावाला, मोतिया, सख्खे शेजारी, वाचू आनंदे, व्हिन्सेट व्हॅन गॉग, परी मी आणि हिप्पोपोटॅमस, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

बालसाहित्यातील त्यांच्या एकंदर योगदानाबद्दल २०१४ साली साहित्य अकादमीने त्यांना सन्मानित केले आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4184 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..