नवीन लेखन...

जागतिक वारसा सप्ताह

जागतिक वारसा म्हणजे काय ?

प्रत्येक देशाला जशी स्वत:ची संस्कृती, परंपरा आणि आस्था असते तशीच ती संपूर्ण विश्वालाही असते. हे विश्वची माझे घर असा संदेश आपल्याला भारतीय संस्कृती देते. आपला प्राचीन वारसा सांभाळणे,त्याची काळजी घेणे तसेच त्यांच्या अभ्यास करून त्याविषयी अधिक माहिती घेणे असे यात अभिप्रेत असते.

शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात आपण अशा जागतिक वारसास्थळांची नावे वाचलेली असतात, पण त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला वाटली पाहिजे. शक्य झाले तर त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटही दिली पाहिजे. आणि अशा ठिकाणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे हे या निमित्ताने लक्षात घेले पाहिजे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (Archaeological Survey of India) विशेष पयत्न यासाठी केले जातात. सहायक पुरातत्व संचालक (एडीए) आणि राज्य पुरातत्त्व विभाग आणि विविध राज्यात शाळा तसेच महाविद्यालये, विविध संस्था यांच्यामार्फत सुद्धा जागतिक वारसा दिनानिमित्त जाणीव जागृती करण्यासाठी प्रदर्शने, स्पर्धा, व्याख्याने यांचे आयोजन केले जाते. भारतातील वारसा स्थळे याविश्या आवर्जून मांडणी करण्याची संधी घेतली जाते.

जागतिक वारसा स्थळे म्हणून भारतातील ३७ ठिकाणे ही ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यापैकी २९ स्थळे ही सांस्कृतिक असून ७ स्थळे ही नैसर्गिक ठिकाणे आहेत तर उरलेले एक स्थळ हे मिश्र स्वरूपाचे आहे.

सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या समृद्ध आणि संपन्न असलेली भारतातील जागतिक वारसास्थळे याप्रमाणे-

ताजमहाल (आग्रा)
खजुराहो ( मध्ये प्रदेश)
हंपी( कर्नाटक)
अजिंठा लेणी( महराष्ट्र)
वेरूळ (महाराष्ट्र)
बोधगया (बिहार)
सूर्य मंदिर कोणार्क (ओडिसा)
लाल किल्ला (दिल्ली)
सांचीचा स्तूप (मध्य प्रदेश )
बृहद्दीश्वर मंदिर ( तंजावर) चोळ राजांनी बांधलेली मंदिरे
काझीरंगा अभयारण्य( आसाम)
महाबलीपुरम मंदिरे ( तमिळनाडू)
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान ( पश्चिम बंगाल )
हुमायूनची कबर ( नवी दिल्ली)
जंतर मंतर (जयपूर – राजस्थान)
आग्रा किल्ला (उत्तर प्रदेश)
फतेपूर सिक्री (उत्तर प्रदेश)
रानी की वाव(पाटण-गुजरात)
पट्टदक्कल मंदिर समूह (कर्नाटक)
घारापुरी लेणी (महाराष्ट्र)
नालंदा विद्यापीठ आणि विहार ( बिहार)
छत्रपती शिवाजी महाराज स्थानक (मुंबई)
भारतातील पर्वतीय रेल्वे
कुतुब मिनार (दिल्ली)
चंपानेर पावागढ पुरातत्व उद्यान (गुजरात)
हिमालय राष्ट्रीय उद्यान (हिमाचल प्रदेश)
रपर्वतीय किल्ले (राजस्थान)
ख्रिस्ती प्रार्थना स्थळे (गोवा)
भीमबेटका शैलाश्रय (मध्ये प्रदेश)
मानस वन्यजीव अभयारण्य(आसाम)
केवलादेव राष्ट्रीय उद्यान भरतपूर (राजस्थान)
नंदादेवी राष्ट्रीय उद्यान आणि पुष्पदरी( उत्तराखंड)
पश्चिम घाट
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (सिक्कीम)
कॅपिटल कॉम्पलेकस (चंदीगड)
ऐतिहासिक शहर(अहमदावाद)
Victorian and Art Deco Ensemble (मुंबई)
Pink City (गुलाबी शहर) जयपूर

या यादीमध्ये आपल्याला वैविध्य दिसून येते. यामध्ये कोरीव मंदिरे, लेणी, तेथील दगडात कोरलेली शिल्पे आणि त्यांचे सौदर्य यांचा अभ्यास भारतीय विद्या या शाखेत केला जातो. निसर्ग आणि मानव हे एकमेकांच्या साह्चार्याने राहतात त्यामुळे वन्य जीव, पशु आणि पक्षी, निसर्गातील वैविध्य यांची काळजी घेणे यासातही अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचे महत्व अविवाद्य आहे. भारतीय परंपरेत जुन्या काळातील अनेक गोष्टी आजही जपून ठेवल्या जातात. गोव्यातील प्रार्थना मंदिरे हे त्याचे एक चांगले उदाहरण आहे.

डोळस आणि शोधक नजरेने आपण हा वारसा सांभाळूया, त्याची माहिती घेनायाचा प्रयत्न नक्की करुया आणि जागतिक वारसा सप्ताह साजरा करुया.

— आर्या जोशी.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2959 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..