नवीन लेखन...

वैश्विक अन्न दिन

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे , सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह , उदर भरण नोहे जाणी जे यज्ञकर्म 

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

हा श्लोक जनमाणसांना ठाऊकच आहे. जेवण्यापूर्वी पंगतीत किंवा एकटे असतानाही या श्लोकाचं उच्चारण केलं जातं. स्वत: समर्थ रामदासांनी हा श्लोक लिहिला आहे याचा अर्थ त्यामागे नक्कीच काहीतरी गूढ अर्थ लपलेला असेल आणि काहीतरी खास कारण असणार.

ह्या श्लोकाचा अर्थ काहीसा असा आहे :-

जेवण करीत असताना म्हणजेच तोंडात घास घेत असताना श्रीहरीचे नाव घेत जावे. नाम घेण्यासाठी कुठलंही मूल्य लागत नसल्याने सहजच हवन (होम) होते. शरीराचं पोषण करणारंं अन्न हे साक्षात परब्रम्ह आहे.जेवण करणे म्हणजे फक्त उदर (पोट) भरणंं नसून ते एक यज्ञकर्म आहे. 

अशी अन्नाची महति आहे. जगातील प्रत्येक माणसाच्या अन्न , वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील वस्त्र आणि निवारा या दोन जरी मूलभूत गरजा असल्या तरी, त्या गरजा कमी प्रमाणात भागल्या तरी त्याचा मानवी जीवनावर काही वाईट परिणाम होत नाही, पण जर का अन्न कमी मिळालं तर त्याचे निश्चीत स्वरुपात दुष्परिणाम दिसून येतात. कुपोषण वाढतं, भूकबळी वाढतात. हे असं जर आहे तर यावरुन अन्न हे शरीरासाठी, ऊर्जेसाठी , जीवनासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्या ध्यानात येईल.

आपण घरी किंंवा बाहेर जेवायला जातो त्यावेळी बरेचदा आपल्या ताटात भरमसाठ अन्न वाढून घेतो आणि पोट भरल्यावर किती सहजतेने ते अन्न फेकून देतो , वाया घालवतो. त्याचवेळी संपूर्ण जगात, अहो जगाचं तर सोडाच पण आपल्या आसपासच कितीतरी लोक भूकेने तडफडत असतात. पण जर हे अन्न आपण जर आपल्याला हवं तेवढंच वाढून घेतलं तर हा अपव्यय आपण थांबवू शकतो किमान कमी नक्कीच होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या की, जेवढ्या सहजतेने आपण अन्न वाया घालवतो तितक्या सहजतेने ते पिकत नाही. त्यामागे आपला पोशिंदा बळीराजा खूप मेहनत घेऊन अन्नधान्य पिकवतो आणि ते शिजवणार्‍याचीही कितीतरी मेहनत लागलेली असते.

आपल्या खिशात कितीही पैसे खेळते असले तरी ते खाऊन आपलं पोट भरत नाही, हे आताच्या अनुभवावरुन वेगळं सांगायला नको. 

आज दिनांक १६ ऑक्टोबर. आज संपूर्ण जगात ” वैश्विक अन्न दिन “ साजरा केला जातो. आजच्या दिवसाला एक गोष्ट आपण ठरवूया की

१) अन्न वाया घालवायचं नाही.

२) जेवढं अन्नदान शक्य आहे तेवढं नक्कीच करु. लक्षात घ्या की, अन्नदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे.

— आदित्य दि. संभूस

#World Food Day  #16thOctober

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..