नवीन लेखन...

जागतीक इमोजी दिवस

सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर माणसाच्या प्रत्येक भावनेसाठी आज इमोजी उपलब्ध आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, मेसेंजर यांच्यामुळे इमोजी आताच्या काळात संदेश पाठवतानाच्या अविभाज्य भाग बनल्या आहेत इतक्या की चक्क त्यांच्या साठी स्वतंत्र दिवस सुद्धा साजरा केला जातोय. १७ जुलै २०१४ रोजी पहिला जागतीक इमोजी दिवस साजरा करण्यात आला. इमोजीपीडियाच्या जेरेमी बर्ज यांनी प्रथम या दिवसाची सुरुवात केली. भारतीय सोशल मीडिया विश्वामध्ये अनेक भाषांमध्ये वेगवेगळ्या इमोजी वापरल्या जातात.

तुम्हाला ठाऊक आहे का, इमोजीची सुरुवात १९९५ च्या आसपास जपानी फोन मध्ये करण्यात आली होती!

१९९५ च्या आसपास पेजर्स वापरले जायचे त्यावेळी जपानच्या NTT डोकोमोने एक इमोजी वापरली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. हळूहळू इमोजी आज सर्वत्र पाहायला मिळते. फेसबुकवर ❤ ही इमोजी गेल्या वर्षी पेक्षा यावर्षी दुपटीने वापरली गेली आहे! एकूण २८०० हुन अधिक इमोजीपैकी जवळपास सर्वच म्हणजे २३०० रोजच्या रोज वापरल्या जात आहेत! ७० कोटी इमोजी फेसबुक च्या पोस्ट्समध्ये दैनंदिन वापरल्या जात आहेत!

नववर्षाच्या स्वागताला सर्वाधिक इमोजीचा वापर होतो. भारतात आनंदाचे अश्रू येणारा आणि ब्लोईंग किसचा इमोजी सर्वाधिक वापरला जातो. ‘बोबल एआई’ या टेक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार या दोन इमोजींना भारतीयांची सर्वाधिक पसंती आहे. तर टॉप १० इमोजींमध्ये स्माइलिंग फेस विद हार्ट, किस मार्क, ओके हँड, लाऊडली क्राईंग फेस, बीमिंग फेस विद स्माइलिंग आइज, थम्स अप, फोल्डेड हँड्स आणि स्माइलिंग फेस विद सनग्लासेस यांचा समावेश आहे. ट्विटरवर भारतीय डोळ्यात पाणी येईपर्यंत हसण्याची इमोजी सर्वाधिक वापरतात.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..