नवीन लेखन...

जागतिक एड्स दिवस

एड्स सारख्या महाभयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो. ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांचा संकल्पना मांडली. डॉ. मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये पाळला.

‘सायन्स जनरल’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखानुसार एड्सची उत्पत्ती ही किन्शासा शहरात झाली आहे. हे शहर आता कॉन्गो गणराज्याच्या नावाने ओळखले जाते. त्या लेखानुसार, शास्त्रज्ञांनी एड्सच्या विषाणूच्या जेनेटीक कोडच्या नमून्यांचं संशोधन केलं आहे. या संशोधनात हे विषाणू किन्शासा शहरात निर्माण झाल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे एड्सची निर्मिती झाल्यानंतर ३० वर्षांनी या रोगाची माहिती झाली. तसेच ह्य़ूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजे एड्स विषाणूशी संबंधित असलेले लेंटिव्हायरसेस (सतत रचना बदलणारे विषाणू) हे आफ्रिकेतील नर वानरांमध्ये १.६० कोटी वर्षांपासून अस्तित्वात होते असेही नवीन अभ्यासात निष्पन्न झाले आहे.

अमेरिकेतील बोस्टन महाविद्यालयाचे वेलकिन जॉन्सन व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतर्गत रचना सतत बदलणाऱ्या लेंटिव्हायरसेस (रेट्रोव्हायरसेसचा एक प्रकार) या विषाणूंचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. ऑक्सफर्ड आणि बेल्जियम विद्यापीठाच्या लूवेन विद्यापीठाच्या संशोधन चमूने एड्सच्या फॅमिली ट्रीची पुनर्रसंरचना करण्याचा प्रयत्न केला. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार एचआय़व्हीचा हा चिंपांजीचा वायरसचं परिवर्तित रूप आहे. हा सिमियन इम्युनोडिफिसिएंसी वायरसच्या नावाने ओळखला जातो. किन्शासा शहर हे बुशमीटची मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे संक्रमित झालेल्या रक्तामुळे हा वायरस मनुष्याच्य़ा शरीरात आला असण्याची शक्यता आहे. हा वायरस विविध माध्यमातून पसरला आहे. या वायरसने चिंपांजी, गोरिल्ला आणि शेवटी माणासाच्या शरिरात प्रवेश केला. दरम्यान एचआयव्ही-१ ने कॅमरून शहरातील लाखो लोकांना संक्रमित केलं. त्यानंतर हा वायरस जगभरात पसरला. असं का घडलं हे याच्या मुळाशी जायचं असेल तर काही दशकं मागे पाहावे लागेल.

१९२० पर्यंत किन्शासा शहर हे बेल्जियम कॉन्गोचा भाग होता. १९६६ सालापर्यंत त्याला लियोपोल्डविले नावाने ओळखले जात होतं. हे शहर बरेच मोठे होते आणि याची वाढ वेगात होत होती. त्यावेळी वेगवेगळ्या यौनसंबंधांचे आजार मोठ्या वेगात वाढत होते. त्याच काळात किन्शासा शहरात एका स्त्रीच्या मागे दोन पुरूष अशी संख्या झाली. त्यामुळे वेश्याव्यवसाय वाढला. या काळात दोन्ही प्रकारचे वायरसमुळे वेगाने वाढत राहिले. आरोग्य शिबिरात वापरल्या गेलेल्या सुईमुळे हा वायरस वाढण्यास मदत झाली. तसंच एचआय़व्ही वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे रेल्वे जाळं. १९४० च्या शेवटात जवळपास १० लाख लोक किन्शासा शहरात ये जा करत होते. त्यामुळे हा प्रकार आणखी वाढला.

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये १९८१ च्या सुमारास अचानक एका विकाराने लोकांना झपाटल्यागत अवस्था झाली. समलिंगी पुरुषांच्या गूढ आजारामुळे होत असलेल्या मृत्यूच्या घटनांनी ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी अमेरिकेत दहशत निर्माण केली होती. या लोकांची रोगप्रतिकारशक्ती लोप पावलेली होती आणि त्यामुळे इतरही रोग त्यांना झालेले आढळले. या विकाराने ग्रस्त झालेल्या मंडळींचा मृत्यूही वेगात होतो आहे, हे लक्षात आले. मात्र इतरत्र कुठेही होते तसेच अमेरिकेतही झाले. सरकारने हे प्रकरण काही फारसे गांभीर्याने घेतलेले नव्हते. सरकार तर त्या विषयी बोलणेही टाळत होते. त्याच सुमारास लुक माँटानिये (फ्रान्स) आणि रॉबर्ट गॅलो (अमेरिका) या दोन शास्त्रज्ञांनी १९८३-८४ मध्ये मानवी शरीर पोखरून काढणार्यात ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरसचा स्वतंत्रपणे शोध लावला.

समलिंगींचा आजार अशी ओळख बनलेल्या या व्हायरसने कुणाला कळायच्या आतच अमेरिका आणि आफ्रिका खंडात थैमान घालायला सुरुवात केली. अमेरिकेत त्याचे ‘गे प्लेग’ असे वर्णन केले गेले. १९८६नंतर भारतात शरीरविक्रय करणारया महिलांचा रोग म्हणून एड्सची लोकांना ओळख झाली. १९८७ उजाडेपर्यंत तब्बल ४० हजार अमेरिकन नागरिक एचआयव्ही- एड्सला बळी पडले होते. द. आफ्रिकेच्या त्या वेळच्या परराष्ट्रमंत्र्याने ‘द टेररिस्ट्स आर नाउ कमिंग टू अस वुइथ अ वेपन मोअर टेरिबल दॅन मार्क्सिझम : एड्स’ असा इशारा दिला.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..