नवीन लेखन...

जागतिक ॲ‍क्युप्रेशर थेरपी दिवस

शारीरिक आणि मानिसक समस्यांपासून दिलासा देण्यात ॲ‍क्युप्रेशर थेरेपीही खूप फायद्याची आहे. मात्र, शरीराच्या योग्य सांध्यावर ॲ‍क्युप्रेशर केले तरच लाभ मिळते. आज जागतिक ॲ‍क्युप्रेशर थेरपी दिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तणाव दूर करण्यासाठी शरीराचे ॲ‍क्युप्रेशर बिंदू.

खांदे आणि मानेचा मिलन बिंदू

दिवसभराचा संपूर्ण तणाव खांदे आणि मानेच्या स्नायुंमध्ये एकत्र होतो. खांदे आणि मानेच्या मिलन बिंदू प्रेशर बनवल्यास यापासून आराम मिळू शकतो. कार्यालयात डेस्कवर बसल्या-बसल्या थोडे मागच्या बाजूने झुका आणि दोन बोटांनी जिथे मान कवटीला मिळते त्या जागेची २० सेकंदांपर्यंत मसाज करा. यामुळे रिलेक्स वाटते.

अमाशय

अमाशय नाभीच्या वर असते. अनेक रिफ्लेक्सोलॉजिस्ट या बिंदूचा वापर करणे पसंत करतात. इथे ॲ‍क्युप्रेशरद्वारे होणारी हालचाल छाती आणि डायफ्रामला तणावापासून मुक्त करते. यामुळे श्वास घेण्याची प्रक्रिया सुधारते.

पाय

मेंदूला आराम मिळवून देण्यासाठी हा बिंदू एकदम योग्य आहे. असे मानले जाते की, अग्नाशय (पॅनक्रियाज) बरे करण्यासाठी हा सर्वात चांगला ॲ‍क्युप्रेशर पॉइंट आहे. पायाच्या अगदी मध्यभागी असलेला हा पॉइंट तणाव कमी करतो आणि शरीराच्या क्रियांवर लक्ष देण्यामध्ये व्यक्तीची मदत करतो.

हात

हातांवर दाब देताच तणावापासून आराम मिळतो. हा महत्त्वपूर्ण ऊर्जा चॅनेलपैकी एक आहे. हा बिंदू हृदय, यकृत, अग्नाशयाला प्रभावित करतो. ज्या लोकांना तणाव जाणवतो त्यांच्यामध्ये बहुतांश यकृतामध्ये एकत्र होतो. हा भाग दाबल्याने खूप आराम मिळतो.

दंड

रिफ्लेक्सोलॉजी आणि ॲ‍क्युपंक्चरसाठी हा बिंदू शरीराच्या उत्तम स्पॉट्सपैकी एक मानला जातो. तणाव आणि थकवा शरीरामध्ये उलटा ऊर्जा प्रवाह तयार करतात. अशा स्थितीमध्ये ॲ‍क्युप्रेशर थेरपी अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे ऊर्जेचा प्रवाह सुधारतो. तसेच ऊर्जा योग्य दिशेने घेऊन जाण्यासोबतच ही थेरपी मानसिक एकाग्रतादेखील वाढवते. या बिंदूवर ॲ‍क्युप्रेशर केल्याने तणाव गायब होतो.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..