नवीन लेखन...

वन्यजीव संवर्धक जिम कॉर्बेट

जिम कॉर्बेट यांचा जन्म २५ जुलै १८७५ रोजी नैनिताल येथे झाला.

मूळचे आयरिश वंशाचे एडवर्ड जेम्स अर्थात जिम कॉर्बेट एक विश्वविख्यात शिकारी आणि तत्संबंधी लेखक, छायाचित्रकार, वन्यजीव संवर्धक म्हणून ओळखले जात. जिम कॉर्बेट हे मनापासून भारतात रमलेले शिकारी. नैनिताल, गढवाल आणि कुमाऊँ परिसरातील (आताचे उत्तराखंड) नरभक्षक वाघांची शिकार करून, आदिवासींचे जगणे सुरक्षित करणारे धाडसी शिकारी होते. पर्यावरणरक्षक, उत्तम छायाचित्रकार आणि लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे कॉर्बेट. एकूण सोळा भावंडांपैकी आठवे असलेल्या जिम कॉर्बेट यांचे वडील ख्रिस्तोफर विल्यम कॉर्बेट हे आर्यलंडमधून भारतात येऊन ब्रिटिश भारतीय लष्करात कर्नलपदावर नोकरीला होते. पुढे त्यांनी लष्कराची नोकरी सोडून पोस्टात नोकरी धरली.

१८६२ मध्ये ख्रिस्तोफर यांची नियुक्ती नैनिताल येथे पोस्टमास्तर या पदावर झाली. पदवी शिक्षणानंतर जिम कॉर्बेट यांना बंगाल आणि वायव्य रेल्वेत नोकरी मिळाली. सुरुवातीला रेल्वे खात्यात नोकरीला असलेल्या कॉर्बेट यांनी रेल्वेची कामं करणारे कंत्राटदार म्हणूनही व्यवसाय केला. अनेक आदिवासींना त्यांनी काम दिलं. जन्मापासून नैनितालमध्ये वाढलेल्या जिम कॉर्बेट यांची नाळ नैनितालच्या जंगलाशी, तिथल्या अदिवासींशी अगदी घट्ट जोडली गेली होती. त्यांचं ‘माय इंडिया’ हे पुस्तकही त्यांनी आदिवासींनाच समर्पित केलं आहे. या परिसरातल्या जंगलातल्या अनेक हिंस्र नरभक्षक वाघांना ठार करणारे शूर शिकारी म्हणून जिम कॉर्बेट यांची इतिहासात नोंद आहे. एखादा वाघ किंवा बिबट्या नरभक्षक आहे, याची खात्री पटल्याशिवाय ते त्याला ठार करत नसत. ४३६ लोकांचा बळी घेणारा या भागातला पहिला नरभक्षक वाघ ‘चंपावत’ याला कॉर्बेट यांनी ठार केले. तिथून नरभक्षक वाघांना ठार करण्याची त्यांची मोहीम सुरू झाली. दोन नरभक्षी बिबट्यांचीही त्यांनी शिकार केली. या नरभक्षक वाघांच्या शिकारी ते एकटेच करत. फक्त रॉबिन हा त्यांचा कुत्रा त्यांच्या सोबत असे. नैनितालचे आणि आजूबाजूचे जंगल त्यांना अतिशय प्रिय होते. तिथले त्यांचे वास्तव्य, नरभक्षक वाघांच्या शिकारी, आदिवासींचं जीवन, जंगलातली निरीक्षणं, अनुभव यांचं वर्णन करणारी विविध पुस्तकं त्यांनी लिहिली. ती चांगलीच गाजली. आजही त्यांची पुस्तकं आवर्जून वाचली जातात. या भागातल्या जनजीवनाचे संदर्भ देणारा तो मूल्यवान दस्तऐवज आहे. मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ, जंगल स्टोरीज, मॅनइटर लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग, जंगल लोर, दी टेम्पल टायगर अँड मोअर मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ ही त्यांची पुस्तकं खूप गाजली. या पहाडी प्रदेशात ‘लॉर्ड माल्कम हॅले’ हे पहिले राष्ट्रीय अभयारण्य उभारण्याच्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

जिम कॉर्बेट यांच्या स्मरणार्थ १९५७ मध्ये या अभयारण्याचं ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ असं नामकरण करण्यात आलं. बालपणापासून नैनितालच्या जंगलात वाढलेल्या या माणसानं आयुष्याच्या शेवटी भारत स्वतंत्र झाल्यानंतर केनियाला स्थलांतर केलं. नोव्हेंबर १९४७ मध्ये त्यांनी नैनितालजवळ कालाधुंगीमध्ये असलेलं घर विकून ते केनियाला गेले. त्यांच्या नैनितालमधील घरात आता संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्यांच्या आयुष्यावर ‘बीबीसी’ने १९८६मध्ये ‘मॅन इटर्स ऑफ इंडिया’ हा माहितीपट बनवला. ‘इंडिया: किंग्डम ऑफ दी टायगर’ हा चित्रपट २००२ मध्ये आला, तर २००५ मध्ये ‘मॅनइटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग’ हा तिसरा चित्रपट प्रदर्शित झाला.

ब्रिटिश असूनही मनाने भारतीय झालेल्या जिम कॉर्बेट यांचे भारतीयांच्या मनात अढळ स्थान आहे. ‘माय इंडिया’, हे जिम कॉर्बेट यांच्या वरील विश्वास भावे यांनी अनुवाद केलेले पुस्तक वाचण्या सारखे आहे.

जिम कॉर्बेट यांचे १९ एप्रिल १९५५ रोजी निधन झाले.

https://www.youtube.com/watch?v=1aYwkA_uBOE

https://www.youtube.com/watch?v=sMo2d1b1cP4

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..