नवीन लेखन...

विठ्ठला कोणता झेंडा, घेऊ हाती !

आषाढी वारीनिमित्त दोन वर्षांपूर्वी करोनाकाळात लिहिलेला हा लेख 


मंडळी आषाढ महिना चालू झाला म्हणजे वारीचे वेध लागलेले असतात. महाराष्ट्रातून संत वांग्मय यामध्ये पंढरपूर वारीला फार महत्व प्राप्त झाले आहे या वारीसाठी एक महिना अगोदर तयारी केली जाते. संसारी माणसे या वारीमध्ये सामील झालेले असतात हातात पताका कपाळी गंध. पांढरा शर्ट पांढरी धोतर डोक्याला पांढरी टोपी गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि हातामध्ये भगवी पताका व काखेला पिशवी. हा गणवेश पहिला की पंढरीच्या पांडुरंगा ची व पायी दिंडी ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही एवढे मात्र निश्चित. तीर्थक्षेत्र देहू आळंदी पासून पंढरपूर पर्यंत ही पायी वारी आज अखेर चालू आहे संसारातील सारे दुःख विसरून दिंडीत नाचणारे वारकरी भक्तिमय वातावरण आषाढ महिन्यातच कुठे पाहायला मिळते. या दिंडीमध्ये मृदंग विना हातात टाळ हार्मोनियम पेटी तबला तोंडात ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम आणि विठ्ठल यांचे अभंग ऐकावयास मिळतात. पंढरपूरच्या विठ्ठलाचे व वारकऱ्यांच अतूट नातं याठिकाणी पहावयास मिळते ही दिंडी चालू असताना भजन कीर्तन व प्रवचन कानावरून गेल्याशिवाय मनाला समाधान लाभत नाही. अशी हि निस्वार्थी वारी करणारी वारकरी मंडळी तल्लीन होऊन स्वतःला हरवून जातात तर आनंदाची गोष्ट आहे….l

माझे माहेर पंढरी, आहे भिवरी च्या तीरी
माझी बहीण चंद्रभागा , करी तसे पापभंगा

या अभंगात कितीतरी मोठा अर्थ दडला आहे अशीही जिव्हाळ्याची वारी होय. वारकर्‍यांनी हातात घेतलेली भगवी पताका सत्याची व न्यायाची आहे म्हणून वारकर्‍यांनी हातात घेतलेला भगवा पताका हे तर पांडुरंगाच्या भक्ती चे निशान आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. वारी करणारा मनात भेदभाव न धरता वैर न धरता एकोप्याने चाल लेली ही पायी दिंडी होय. या दिंडीत कोण लहान नाही कोण मोठा नाही सम समान अशी ही समतेची वारी होय.

आज सकाळी पेपर वाचत असताना यावर्षी आषाढी वारी बंद करण्यात आले आहे असे वाचण्यात आले. हल्ली क रो ना या रोगाने थैमान घातला आहे प्रत्येक माणसाच्या तोंडावर कापडी रुमाल दिसत आहे. गेली दोन महिने संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे यामुळे मोठ्या तीर्थक्षेत्राला व मंदिराला कुलपे लावण्यात आली आहे. आता तक्रार कुणाला सांगायची ज्याला सांगायची त्यांन स्वतःच दार बंद करून घेतले आहे. सन 1986साली गगनगिरी महाराज यांनी सांगितले होते ती च वाणी खरी ठरली आहे. या रोगावर औषध निघाय तयार नाही सर्वांचे प्रयत्न कमी पडायला लागले आहे. जा र न मरण आणि उच्चाटन हे परमेश्वराच्या हातात आहे तर काही माणसे म्हणतात या जगामध्ये पाप फार झाले आहे या समाजातून पुष्कळ ऐकाय मिळते. पूर्वी प्लेग आणि फट की असे रोग येऊन या रोगात पुष्कळ माणसे या जगातून कायमची निघून गेली आहे म्हणून या रोगाच्या पिढ्यांमध्ये काही मानस गाव सोडून रानात राहायला जात होती. शेवटी हा निसर्ग आहे कधी काय होईल सांगता येत नाही परमेश्वराकडे सांगायचे तोच दार बंद करून मंदिरात बसला आहे आता तक्रार करायची कोणाकडे व त्या परमेश्वराला शोधायचे कुठे हा प्रश्न समाजापुढे पडला आहे तर आता माणसात देव शोधला पाहिजे. जगातील सारे डॉक्टर पोलीस डिपार्टमेंट हेच देव रूपात काम करत आहेत त्यांना आम जनतेने सह कार्य तेली पाहिजे एवढे मात्र निश्चित…l

श्रीमंत माणसाला जवळ पैसा आहे त्यांची चिंता नाही जो हात मजुरीवर कष्ट करतो ज्याच्याजवळ पैसा नाही या लाकडांच्या दोन-अडीच महिन्यामध्ये दुकान दाराने मालाचे दर भरपूर वाढवून फायदा करून घेतला. पाच रुपयाला मिळणारी तंबाखूची पुडी पंचवीस रुपयांनी विकली आहे शिवाय माध्य व्यवसाय म्हणजे व्यापाऱ्यांनी ग्रामीण भागामध्ये पुष्कळ पैसे लावून व्यवसाय केला आहे मंडळी हा पैसा त्यांना सुख देणार नाही एवढे मात्र निश्चित.

रोग कमी करायचा का वाढवायचा हे आपल्या हातात आहे यामध्ये देवाला दोष देण्यात अर्थ नाही शेवटी सत्य पुढे येणार आहे. ही जनता कशी वागते कशी बोलते दिवसातून किती वेळा स्वार्थासाठी लबाड बोलते याचे उत्तर या लॉक डाऊन मध्ये आहे प्रत्येक मानवाने याचा विचार करायला हवा. पूर्वीचे दिवस गेले पूर्वीची माणसे गेली आता तुम्ही कसे वागणार कसे बोलणार व कशी वाटचाल करणार हे तुमच्या हातात आहे.

हे कलियुग आहे कलीचा वाऱ्याप्रमाणे ही माणसे वागतात पण सत्य कुठे लपत नाही संत थोर होत त्यांचे विचार आचार वेगळी होत आता या जनतेने कसे वागावे हे तुम्हीच ठरवा यू हवे हल्ली सगळीकडे वातावरण फार वाईट आहे जग बुडी ची वेळ आली आहे इथून पुढच्या काळात तरी प्रत्येकाने सगळ वागावे यातच भलेपणाचा आहे. माणसासारखे वागा माणूस म्हणून जागा आपलं सर्वांना म्हणा. आईवडिलांची सेवा करा मग हा भयानक रोग पळून जातो की नाही पहा.

धन्यवाद मंडळी….l

— दत्तात्रय पांडुरंग मानुगडे

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..