नवीन लेखन...

उपवर तरुणींसाठी

अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क मध्ये एक अगदी वेगळे स्टोर निघाले आहे. हे स्टोर फक्त स्त्रियांसाठी आहे. पुरुषांना येथे येण्याला बंदी आहे. तसेच एखादी स्त्री या स्टोरला आयुष्यात फक्त एकदाच भेट देऊ शकते. हे स्टोर सहा माजली उंच आणि भव्य आहे.

या स्टोर मध्ये नवरे मिळतात!

लिली नावाची २७ वर्षे वयाची, विवाहीत्सुक पण अति चिकित्सक तरुणी घाई घाईने त्या स्टोर मध्ये शिरते. कारण तिला लग्नासाठी नवरा हवा असतो. ती पहिल्या मजल्यावर येते. तेथे पाटी असते “सर्व साधारण नवरे “. त्यातील बरेच जण हे घटस्पोट झालेले किंवा विधुर असतात. तसेच वयाने वाढलेले, टक्कल असलेले, फारसे शिक्षण नसलेले व अगदीच बेताचे उत्पन्न असलेले असतात.

ती वरील मजल्यावर जाते. तेथे पाटी असते “प्रथम वर ” तेथे पण बरेच जण वाढलेल्या वयाचे, टक्कल असलेले, बेताचे शिक्षण आणि पगार असलेले, आई वडिलांची किंवा घरची जबाबदारी असलेले असतात.

ती अजून वरच्या मजल्यावर जाते. तिथे पाटी असते “तरुण आणि देखणे प्रथम वर”. तिथे असलेली मुले देखणी आणि तरुण असतात. पण काहींची प्रेम प्रकरणे असतात तर बर्याच जणांना मैत्रिणी असतात. तसेच व्यसने पण असतात. काही जणांवर घरच्या जबाबदाऱ्या असतात तर काही जणांना संसाराची आवड नसते. तसेच बहुतेकांचे उत्पन्न बेताचे असते.

ती अजून वरच्या मजल्यावर जाते. तिथे पाटी असते” तरुण, देखणे, उत्तम पगार असणारे, घरची जबाबदारी नसणारे, संसाराची आवड असणारे प्रथम वर” पण येथे सुध्धा काही जणांची जुनी प्रेम प्रकरणे असतात, काहींना मात्रिणी असतात, तर काहींना कमावणारी- नोकरी करणारी बायको हवी असते

म्हणून ती शेवटच्या म्हणजे सहाव्या मजल्यावर येते. तिथे पाटी असते ” शेवटच्या या सहाव्या मजल्यावर आपण आल्याबद्दल धन्यवाद! आपण येथे येणाऱ्या ४३२५२ व्या महिला आहात. येथे नवरे मिळत नाहीत. कारण आपली नवऱ्या विषयीची अपेक्षा जगातील कोणताच पुरुष पूर्ण करू शकणार नाही. कृपया शेजारील जिन्याने खाली उतरावे. उतरताना काळजी घ्यावी.”

उपवर तरुणींनो आपली लिली होणार नाही याची काळजी घ्या.

— उल्हास हरी जोशी

उल्हास हरि जोशी
About उल्हास हरि जोशी 31 Articles
श्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..