नवीन लेखन...

तुझ्या अव्यक्ततेमधील व्यक्तता

आपलं कधी असं ठरलं नव्हतं
आपण बोलताना
हा असा अमुक अमुक विषय काढू
तमक्या विषयावर तू तुझं मत मांड
हा विषय ऐनवेळीचा विषय म्हणून
घेऊया का चर्चेस
हा एक इतका महत्वाचा विषय आहे
तू तुझे विचार ऐकव
आणि मग मी माझे मत मांडते
मग तुझ्या वाट्याला एवढी वाक्ये आणि
एका वाक्यात अमके एवढेच शब्द बसण्याची मर्यादा
आपलं अस काहीच नव्हतं ठरलं
हे आज आठवलं म्हणजे मग
आताशा माझ्या लक्षात येतंय की
फक्त मीच तर बोलायचे…
मी बोलायचे आणि तू ऐकायचास
असही नाहीच म्हणू शकत मी
मी बोलायचे आणि मला तू ऐकत
असल्याचा निदान आभास तरी व्हायचाच
मी बोलायचे
काही जुन्या आठवणी निघायच्या
काही आवडती गाणी सांगायचे
मी आजूबाजूच्या
प्रत्येक गोष्टीवर बोलायचे
मला पडलेल्या स्वप्नांवर
माझ्या स्वतःच्या स्वप्नांवर
तू काय केले पाहिजेस सांगायचे
तू आज कसा छान दिसतोस हे देखील
बोलूनच सांगायचे
आपण भेटलो ना की मी बोलायचे
उधानलेल्या पावसाने
उधानलेले पाणी जणू
तसे कसेही आणि कुठेही वळायचे माझं बोलणे
आणि …
माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद म्हणून
तू हसायचास..
मग मीच अर्थ लावायचे या हसण्याचे
तू खळाळून हसलास की
तुला पटल किंवा तू तुझ्या हास्याच्या धबधब्यात
माझं बोलणं उडवून लावलंस
तू फक्त बुद्धासारखं पुसटस हसलास की
मला वाटायचं तुला नाही बोलायचं या विषयावर
हे असे नेमके हेच आहेत का अर्थ
असही मी विचारलंच नाही तुला कधी
पण आज ….
प्रत्येक गोष्ट बोलून का दाखवतेस?
या तुझ्या एका प्रश्नासरशी
तुझ्या अव्यक्ततेमधील व्यक्तता जाणवली
‘नाहीच बोलणार मी आता’
आता हे देखील नसते बोलले तरी चाललं असतंच म्हणा
असो…..

©राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१८/०८/२०१८

Avatar
About राजश्री शिवाजीराव पाटील 2 Articles
मी ललित लेखन,प्रवास वर्णन, ऐतिहासिक व्यक्तींबद्दल लिखाण करते. माझं ललित लेखनाचे “ही श्री ची लेखणी” हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मी कविता लिहिते.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..