मुंबईतील ट्राम गाडया व जुन्या जमान्यातील वाहने!

Trams and Transport Systems in Old Mumbai

मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, पराचक्रे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले होते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागला. जमिनीवर होणाऱ्या समुद्राच्या लढाईला लगाम घालून ती थोपविण्याचे जमल्यावर शहरे वाढू लागली. नवीन रस्ते तयार केले गेले आणि पालखी हे वाहन पुष्कळच वाढले. (सतरावे अठरावे शतक) वाहन या दृष्टीने पालख्यांचा देशभर संचार चालू होता. मुंबईचे जे भाग पाण्यातून बाहेर पडले नव्हते तेथील दळणवळणाला होडया, नावा वगैरे जलवाहनांचा उपयोग केला जात असे. मुंबई शहराच्या काही भागांत गेल्या शकाच्या उत्तरार्धा पर्यंत लाकोंचे एक वाहन होडी हे होते. घोडा गाडी – बैलगाडी घेऊन त्यांचा व्यवहार सुरु झाला आणि ओझेवाल्याची हातगाडी आली. घर आणि उद्योग व्यवसायाचे ठिकाण यांतील अंतर जसजसे वाढत गेले तसतशी वाहनांची गरज आणि विविधता वाढत गेली. देशाच्या उन्नतीसाठी दळणवळणच्या गतीचा वेग वाढविणे हा देखील एक उद्देश असतो. वेगाबरोबर सुख वाढविण्याचीही काळजी घेतली जाते.

१९ व्या शकाच्या सुरवातीस इंग्लंडमध्ये आगगाड्या निघाल्या व त्यांचा प्रवेश थोडयाच दिवसात मुंबईत झाला. १८४३ पासून रेल्वेसाठी लोखंडी रूळांचा मार्ग ठाण्यापर्यंत २१ मैलाचा १८५३ च्या एप्रिलमध्ये पूर्ण झाला. आस्ते आस्ते पुणे-नाशिक पर्यंतचा रस्ता झाला.

आगगाडयांनी मुंबई व देशांतल्या दूरदूरच्या शहरांशी संबंध जोडला आणि लोकल गाडयांनी शहरातल्या बऱ्याच उपनगरांची रहदारी सुखाची व सुगम केली हे खरे असले तरी शहरातल्या शरत इतर वाहनांची वाढ चालू होती. सतराव्या-अठराव्या शतकातल्या पालख्यांच्या आणि बैलगाड्यांच या जोडीने घोडेगाड्यांचे बग्गी, फैटन इ. भिन्नभिन्न प्रकार अवतरून तेही खाजगी व सार्वजनिक गरजूंच्या वाहतुकीला साह्य करीत होते. व्हिक्टोरिया नावाचे वाहन चालू शतका आधीपासून पुष्कळ वर्षे तग धरून होते. आजच्या मोटारी मुंबईच्या रत्यावर वाढत्या संख्येने धावू लागल्याने व्हिक्टोरिया हे वाहन कालांतराने लोप पावले.

त्या काळात दळणवळणाची वरील प्रमाणे सोय करूनही मुंबईच्या रहदारीला ती पुरी पडेना तेव्हा ट्रामगाडयांची कल्पना निघाली व तिच्याबद्दल म्युनिसिपालिटी, सरकार व तसेच तिच्याकरिता द्रव्य वेचू इच्छिणारे भांडवलदार यांच्यात विचारविनिमय सुमारे १० वर्षे सुरु होता.

१८७४ मध्ये मुंबईत ट्रामगाडयांची वाहतूक मोठया रस्त्यांवर नव्हे तर गल्लीबोळांतून देखील चालू झाली. ही गाडी गरीबांचे वाहन मानली जात होती. गाडीच्या धावण्याचा पल्ला कितीही मोठा असला तरीही अर्ध्या दोन आण्यांत उतारुंचे (प्रवाश्यांचे) काम भागे. इतर सर्व वाहने एका बैलाच्या रेकाला किंवा धमणीला जोडून ट्रामच्या मानाने पुष्कळच महाग दराची होती. ट्राम हे वाहन्सुद्धा लोखंडी रस्त्याचेच भावंड. पण ते ओढण्यासाठी घोडे जुंपावे लागत हा ट्रामगाडी व आगगाडी यांत मोठा फरक होता. ट्राम गाडयांची वेळ सकाळी साडेदहा पासून ते रात्री साडेअकरापर्यंत चालू असे. प्रथम एका घोड्याची व नंतर दोन घोड्यांच्या ट्राम अस्तित्वात आल्या. त्या काळात ट्रामच्या उतारुंच्या बाजू उघड्या असत. नंतर त्या बंद केल्या गेल्या. घोड्यांच्या ट्राम गाड्या १९०७ पर्यंत आपले काम बजावीत होत्या व त्यासाठी जवळजवळ ९०० घोडे तबेल्यांतून विभागून ठेवलेले असत. एक तबेला राणीच्या (आत्ताचे जिजामाता उद्यान) बागेसमोर भायखळा भागात होता तर दुसरा तबेला कुलाब्यास व तेथेच कंपनीच्या कारभारा चे केंद्र होते.

ट्रामगाड्यांना जन्म देणार्‍या कंपनीला प्रारंभी भांडवल मिळविण्यासाठी वानवा उत्पन्न झाल्यामुळे तीने न्यूयॉर्कहून (अमेरिकेतून) भांडवल संपादन केले. १९०७ च्या मे महिन्यात विजेच्या शक्तीने ट्रामगाड्या चालू करण्यात आल्या. घोड्यांऐवजी एक दांडी गाडीच्या छपरास लावलेली असून ती वरील विजेच्या तारेस जोडलेली असे आणि तिच्याद्वारे गाडीला विजेचा पुरवठा होत असे.

विजेच्या ट्रामगाड्या कुठे थांबाव्या यासाठी निश्चित जागा होत्या व तेथे तश्या पाट्या लावलेल्या असत. घोडयांच्या ट्रामगाडयांना अशी सोय नसल्याने उतरूंनी आपला हात अभारून ‘सबूर’ म्हणावे आणि आपल्या मर्जीस येईल तेथे ट्राम थांबवावी. असा प्रकार घोडयांच्या काळात असल्याचे काही वर्षांपूर्वी वृद्ध माणसांकडून ऐकाला मिळत होते (आत्तासुद्धा काही (BEST) बसेस “हात दाखवा बस थांबवा” आशा आहेत.

त्यानंतरच्या काळात ट्रोलीबसेस आल्या त्यांना त्या काळातल्या ट्रामसारखे रूळ नव्हते. पण वरती एका दांडीतून वीज प्रवाह ट्रोलीबसमध्ये येत असे. त्यांची दारे आपोआप उघड बंद होत असत व त्यामुळे खुपच गैरसोईचे होते. मुख्य म्हणजे आत्ता सारख्या (BEST) च्या मिनी बस प्रत्येक गल्लीबोळात जाऊ शकतात तश्या ट्राम किंवा ट्रोली बसेस जात नव्हत्या कारण त्या विजेवर चालत तसे बघायला गेलो तर ट्राम/ट्रोली बसेस यांचा संचार खुपच मर्यादित होता व ट्रामच्या रूळामुळे रात्यांवरील वाहतुकही वेगाने होत नसे.

तेव्हा ट्रामागाड्या एक मजली व दुमजली होत्या अर्थात त्या काळात मुंबईतील लोकसंख्या व इतर वाहने आजच्या एवढी वाढलेली नव्हती. याचा खरोखरीच मुद्दाम उल्लेख करावा लागेल. ट्राम विजेवर चालत असल्याने वायू प्रदूषण होत नव् हते. इंधनात बचत होत होती. जसे फायदे होते तसे तोटेही होते. हल्लीच्या वेगवान युगात काळाप्रमाणे बदल होत होत आजची सिंगल डेकर व डब्बल डेकर “बेस्ट” बसेस आपण बघतो. अर्थात तेव्हा ज्यांनी ज्यांनी ट्राममध्ये बसण्याचा आनंद घेतला असेल ते खरोखरच भाग्यवान !

— जगदीश पटवर्धनजगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 222 लेख
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

p-2078-IT-policy-300

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...
p-2104-muktagiri-300

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...
p-2060-mahalaxmin-temple-01-300

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...
p-2090-ambejogai-city-300

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…