नवीन लेखन...

टोल ची टोलवा टोलवी !!!!

टोल च्या प्रश्नावर चर्चा आणि आंदोलने ही होणारच होती. टोलची भीषण सत्यता लोकांना कळायला जरा वेळच लागला. राजकारणातील संबंधित लोकांना हे कधीच लक्षात आले होते. पण विनासायास मिळणा-या उत्पन्ना ची सवय त्यांना लागल्या ( श्रीमंत कारवाल्यांकडून ) मुळे निश्चिंत होऊन सर्वजण बघ्याची भूमिका घेत होते . लोकांना कोल्हापूर टोल आंदोलना नंतर अधिक जाणीव झाल्या मुळे आता फार काळ गप्पा मारून आणि निषेधाचे फलक दाखवून चालणार नाही हे लक्षात आल्यावर राजकीय पक्षांनी आंदोलनाची भाषा सुरु केली . खरेतर टोल सर्वच राजकिय नेत्यांना हवा आहे .यातील भ्रष्टाचार अगदी विनासायास आणि तो सुद्धा प्रचंड प्रमाणात होतो .

पुर्वी एक लोकप्रिय गोष्ट सांगितली जायची-एका राजाच्या पदरी एक भ्रष्ट सरदार होता .तो प्रत्येक बाबतीत पैसे खात असे .राजाला ही बाब लक्षात आली.तो त्याला काढून टाकू शकत नव्हता कारण तिच्या माहेरचा माणूस होता.त्याने त्याला समुद्राच्या लाटा मोजण्याचे काम दिले पण तो भ्रष्ट सरदार बंदरात येणारी जहाजे अडवू लागला . माझ्या लाटा मोजून झाल्यावर मी तुमचे जहाज बंदरात आत घेईन असे तो जहाज मालकांना सांगत असे.झाले आपसूक जे पैसे देतील त्यांची जहाजे बंदराला लागू लागली . त्याला पैसे खाण्यासाठी नवे कुरण त्याने अक्कल हुशारीने मिळवले . राजांनी डोक्याला हात लावला .

मी अमेरिकेत कारचा भरपूर प्रवास केला . तिथे टोल आहे . पण टोल कार्ड प्रत्तेक गाडीवर लावलेले असते आणि नाक्यावरून गाडी पास झाली कि तुमच्या बँकेतून तो सरकारी तिजोरीत आपोआप जमा होतो.रस्त्यांची सुरक्षा, अवस्था ,सोयी सुविधा अप्रतिम आहेत. कुठेही गोंधळ नाही कि थोड्या थोड्या अंतरावर टोल साठी लाईन नाही. लोकांना टोल बुडवण्याचा विचार मनात येत नाही.

पण मग असे आपल्याकडे झाले तर गावगुंडांना आणि पुढा-यांना मलिदा कसा मिळणार ?

System बदलण्याची गरज आहे. पण त्याची घाई कुणालाच नाही. टोल हि दारात बांधलेली कामधेनु आहे. तिचा फायदा नक्की कोणाला होतोय ?

— चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..