नवीन लेखन...

टिवल्या बावल्या

जमताच रिकामटेकडे, सुरु चर्चा राजकारणाची ।असते चढा ओढ अकारण तिथे, मत-प्रदर्शनाची ।।नसते हाड जिभेला, असते रेलचेल, अपशब्दांची ।करण्यां वर्षाव असभ्य शब्दांचा, भिती न कुणाच्या बापाची ।।भिती न कुणाच्या बापाची ।।१।।फुरसतींतुनि न दवडती संधी, सोडण्या वाफ मुखाची ।वेळ अचूक शोधिती, राग घरांतील, बाहेर काढण्याची ।।मिळतांन अवसर, वेळ येते मग, कुढत बसण्याची ।असते धारणा एकेकाची, मारतो, मुकुटे खाण्याची ।।मारतो, मुकुटे खाण्याची ।।२।।खुपसतां नाक, नको तेथे, येते वेळ उपमर्दाची ।गत अशीच होते, न विचारतां, उपदेश करणार्‍यांची ।।जो तो असतो, भागविता हौस, अपुल्या मनाची ।आंस असते मनीं, टिमकी अपुली वाजविण्याची ।।टिमकी अपुली वाजविण्याची ।।३।।असते जया अंगी सवय, करणे चिंता दुसर्‍याची ।पातळी, खासते वाढविती, अपुल्याच रक्त दाबाची ।।अकारण करुनि चिंता, येई मनीं, भावना वैफल्याची ।सवय असते एकेकाची, तर्‍हा स्वभाव वैचित्र्याची ।।तर्‍हा स्वभाव वैचित्र्याची ।।४।।नसतां मनीं विचार शीलता, जाण होते वैफल्याची ।धरसोड वृत्तीतुनि, आफत, अपुल्याच कुचंबणेची ।।घिसाड घाईतुनि, येते पाळी, पश्चाताप करण्याची ।धरावी सदैव, कांस, जीवन मार्गी, चारू विचारांची ।।जीवन मार्गी, चारू विचारांची ।।५।।कित्येकां असे सवय, खाजवुनि खरुज काढण्याची ।नको नको ते काढूनि विषय, चवी चवीने, चघळण्याची ।।काढुनि खुसपट, सवय अनेकां, लज्जत चाखण्याची ।गिळूनि मूग बसणे, असते कृती, बेरक्या जनांची ।।असते कृती, बेरक्या जनांची ।।६।।जमताचि दोघे, रंगते चर्चा, तिसर्‍याच्या वैगुण्याची ।नकळत, दाविती ते, झलक अपुल्याच विकृयीची ।।तयां वाटे, अधिकारवाणी, अपुल्याच फुशारकीची ।लाय करावे, आहे रेलचेल येथे, असल्याच प्रवृत्तीची ।।रेलचेल येथे, असल्याच प्रवृत्तीची ।।७। येताच समविचारी एकत्र निघते टूर सहलीची ।परी येई न तेथे कधी, प्रचीती सात्विक आनंदाची ।।रुळली प्रथा, अपेय पानांतरी, अभक्ष भक्षणाची ।आहे हीच व्याख्या, प्रचलित निखळ सौख्याची ।।प्रचलित निखळ सौख्याची ।।८।।असते सवय अनेकां, चांभार चौकश्या करण्याची ।असती उद्योग सारे, नसते जयां, किंमत वेळेची ।।जडते सवय अकारण, भिंतीस तुंबड्या लावण्याची ।मुबलकता येथे, या असल्या, उद्यमी महाभागांची ।।या असल्या, उद्यमी महाभागांची ।।९।।उद्योग नसता, सवय कित्येकां, चोंबडेपणा करण्याची ।नसे कमी, इतरां नयनीं, कुसळते, शोधणार्‍यांची ।।तत्परता अंगी, देऊनि कान, भांडण शेजार्‍याचे ऐकण्याची ।ठाऊक नसते महती, आयु हे, सरलपणाने जगण्याची ।।आयु हे, सरलपणाने जगण्याची ।।१०।।नसते स्वत:स अक्कल जराही, स्वयं उन्नती करण्याची ।दाविती तत्परता, वर जाणार्‍यांचे, पाय ओढण्याची ।।न होई इच्छा, अशांना कधी, इतरां मदत करण्याची ।नीती ऐसी, ठरते सदैव, जगती या कुचकामाची ।।सदैव, जगती या कुचकामाची ।।११।।न वनवा, राखुनि हात, व्यवहार करणार्‍याची ।मुबलकता येथे, वेळेस ऐन, घात करणार्‍यांची ।।जन ऐसे, न सोडिती संधी, इतरां ओरबाडण्याची ।रांग येथे, ठेवुनि छातीवरी हात, खोटे बोलणार्‍यांची ।।रांग येथे, खोटे बोलणार्‍यांची ।।१२।।नसे कमतरता, स्वार्थीपणाचा, कहर करणार्‍यांची।नाही वानवा, टाळूवरील मृतांच्या, लोणी खाणार्‍यांची ।।लाज नसते, पोळीवर स्वत:च्या, तूप वाढून घेण्याची ।जरा ही करिती न विचार, न काळजी इतरांची ।।घेती न काळजी इतरांची ।।१३।।रेलचेल येथे, दिलेला शब्द कधी न पाळणार्‍यांची ।प्राबल्य येथे, शब्द, कस्पटा समान मानणार्‍यांची ।।कधी, यावी न वेळ, ऐशा मृगजळांवरी विसंबण्याची ।।विसंबिता, येईल वेळ, पदोपदीं, निराशा होण्याची ।।पदोपदीं, निराशा होण्याची ।।१४। अपदांतुनि, येते प्रचिती, खर्‍याखुर्‍या मित्रत्वाची ।दांभिकते, क्षणीं गरजेच्या, न राकिती बूज, मैत्रीची ।।किळस येई, मनोमनीं, असल्या ढोंगी डोंबकावळ्यांची ।परी कधी कळीं, होते मदत, न भेटलेल्या अनोळखी जनांची ।।न भेटलेल्या अनोळखी जनांची ।।१५।।एक दोन कां होईना, साथ हवी, जिवास जीव देणार्‍यांची ।ग्रीष्मांतही, वर्षाव-प्रीतीचा, करण्याच्या सहृदांची ।।जोडी हवी, स्वप्न-पूर्तीस, हातभार लावणार्‍या प्रिय जनांची ।संगत असावी सदा, जीवनीं, स्नेह वाढविणार्‍या सज्जनांची ।।स्नेह वाढविणार्‍या सज्जनांची ।।१६।। -गुरुदास / सुरेश नाईक२८ डिसेंबर २०११, बुधवारपुणे – ३०
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..