नवीन लेखन...

नाट्य-चित्र कानोसा – “७२ मैल-एक प्रवास”

आयुष्य मर्म किंवा तत्त्व, त्याचा अर्थ कधी कधी खाच खळगे व कठीण परिस्थितीला सामोरे गेल्यावर उलगडत जातो. नेमकं जीवनातील महत्त्व आणि त्याचा शोध म्हणजे “७२ मैल-एक प्रवास” हा सिनेमा आहे.

ही कथा आहे अशोक व्हटकर यांच्या “७२ मैल” या कादंबरीवर आधारित. चित्रपट सत्य घटनेवर आधारित असला तरी सुद्धा नेमक्या रुपात प्रेक्षकांपर्यंत सादर करण्याचं कसब दिग्दर्शक राजीव पाटील यांनी अचूकरित्या पेललं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत खिळवून ठेवून उत्कंठा निर्माण करायला लावतो.
खुद्द अशोक व्हटकरांची बालपणाची भूमिका या चित्रपटातनं अधोरेखीत होते, शिक्षणात फारसा रस नसलेला, आणि सतत उनाडक्या करणार्‍या अशोक अर्थात ही भूमिका साकारणार्‍या चिन्मय संतची रवानगी थेट सातार्‍याच्या हॉस्टेल मध्ये करण्यात येते, पण तिथे एकटेपण व अनोळखी वातावरणात मन रममाण न झाल्यामुळे अशोक हॉस्टेल मधून पळ काढण्याचा निर्णय घेतो व कोल्हापूरला आईकडे जाण्याचा निर्धार करतो, पण खिशात दिडकी नसताना सुद्धा पायी किंवा मिळेल त्या मार्गाने प्रवास करण्याची तयारी पाहून त्याचं कौतुक वाटत राहतं, असातच या प्रवासात लहानग्या अशोकची भेट होते “राधाक्का” (स्मिता तांबे) शी, जी आपल्या मुलांसह आयुष्याच्या प्रवासाला निघाली आहे, जिथे फक्त तिला त्याचा अर्थ शोधायचा आहे, तो या प्रवासातून उलगडत जातो. कोल्हापूरचा प्रवास गाठताना कोणकोणते बरे, वाईट अनुभव या सर्वांना मिळतात या सर्वांचे वर्णन या माध्यमातून सुंदररित्या रेखाटण्यात आलेलं आहे. त्याबरोबरच सर्व बालकलाकारांचा अभिनय, बोली, प्रसंगानुरुप वावर चित्रपटाच्या कथेला मिळता जुळता असून, संगीत, गीत ही चित्रपटाला साजेशी ठरतात. या सर्वांमध्ये खुलून दिसतो स्मिता तांबे चा अभिनय, आत्तापर्यंतच्या स्मिताच्या कारकीर्दीतील महत्त्वाची भूमिका आहे, या चित्रपटामुळे स्मिता तांबे ला अभिनेत्री म्हणून पुरस्कारांसाठी नामांकन तसंच विजेती म्हणून सन्मान मिळण्याची शक्यता आहे, कारण राधाक्काची भूमिका प्रत्यक्षरित्या जिवंत केली आहे. अगदी शारीरिक हावभाव किंवा डोळ्यातून बरच काही बोलून जाणवतं, जीवनाच्या हालअपेष्टांमुळे आलेलं सुजाणतेपण त्यातून जीवनाचं उलगडलेलं “सार” हुबेहुब साकारल्यामुळे सत्यता डोळ्यासमोर तरळते व काही प्रसंग अक्षरश: चित्रपट पाहताना काळजाला चटका लावणारे ठरतात.
जीवनाची वेगळी बाजू अगदी अनोख्या पद्धतीनं, एका विशिष्ट विषयांभोवती न फिरता अनेक पैलूंवर वेळोवेळी भाष्य केल्यामुळे सिनेमातून जीवनाचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न केला गेल्यामुळे सिनेमात कुठेही बेबनावपणा वाटत नाही व शेवटपर्यंत पाहावासा वाटतो.
चित्रपटाची कथा, पटकथा ही आजपासून ४०-४५ वर्षांपूर्वीची असल्यामुळे तेव्हाचा म्हणजे ७० चा काळ चित्रपटात उभा केला गेला आहे; त्याकाळचं रहाणीमान, वेशभूषा, कलादिग्दर्शन अगदी समर्पक वाटतं; अभ्यासून व नीट मांडणी झाल्यामुळे चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सकस ठरतो. याचं सारं श्रेय दिग्दर्शका सोबत “राधाक्का” ची भूमिका साकारणार्‍या स्मिता तांबे ला द्यायला हवं, त्याशिवाय चित्रपटात जिवंतपणा उतरला नसता.
चित्रपटाचा मध्यंतर वेगळ्या पद्धतीनं करता आला असता स्पेशल इफेक्टचा वापर त्यासाठी उपयोगी ठरला असता जसा की विहीरीत पोहण्याच्या प्रसंगावेळी किंवा त्याआधी असता तर उत्कंठा ही वाढली असती, मध्यतरा नंतर ही सिनेमात ट्विस्ट येतात ज्यामुळे राधाक्काचं, अशोक, भीमा, बायज्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. जीवनात काहीही रस नसताना त्यासाठी संघर्ष करत राहणं, यामुळे कुठेतरी चित्रपटातनं, दिग्दर्शकाला आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहण्यासाठी प्रेरित करण्यासाठी उद्देश असेल तर तो या चित्रपटाला शोभून दिसतो.
कठीण परिस्थितीत सुद्धा आपलं इच्छित स्थळ गाठता येऊ शकतं, पण त्यासाठी गरज असते ती इच्छाशक्ती व निश्चयाची, हेच मर्म “७२ मैल” चित्रपट पहिल्यानंतर येतं.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..