चायनीजच्या गाड्यांवरचे भयानक वास्तव

shocked चायनीज !

आज सकाळी सकाळी morning walk गेलो …येताना बायकोच्या आज्ञेप्रमाणे सिमला मिर्च शोधत होतो ..

अजुन फारसे भाजी विक्रेते आले नव्हते ..शोधता शोधता एक भय्या नजरेस पडला..कोथींबीर,शेपुचा गाडा घेऊन उभा होता ..

जवळ गेलो असता कोपऱ्यात एका पोतडीत सिमला मिर्च भरुन ठेवलेली नजरेस पडली अन् चेहऱ्यावर हास्य उमलले..! भाव विचारला …तर बोलला ‘ सिमला नही है’…

अरे म्हटलं वो तो सामने पडा है.

‘ वो खराब है…आपको नही चलेगा…सडा माल है…चायनिज वालो के लिये रख्खा है…’

मी गोंधळलो…परत विचारले ‘क्या..?’

भय्या-‘वो चायनिज वालोंके लिये है..उनको चल जाता है…’

मी उत्सुकता व आश्चर्याने विचारले ‘क्या बोल रहे हो..?

भय्या-‘ हा मार्केट मे बचा हुवा..सडा हुवा सब माल चायनीज वालेही ले जाते है…उनको चल जाता है.. मसाला मारते है तो ग्राहक को समझ नही आता है.. मरा हुवा मुर्गा भी…कुछ भी डाल देते है… तभी तो ईतना सस्ता मिलता है ना…’

मी आश्चर्याने भाजीवाल्या भैय्याने सांगीतलेल्या गोष्टींचा विचार करित पुढे निघालो ..एवढ्या आवडीने ,मिटक्या मारत नाक्या नाक्यावर चायनीज खाणा-या तरुणपिढीसह सर्वांचे चेहरे माझ्या समोर येउन गेले ….!

परवाच गावी एक MBA झालेला तरुण मुलगा भेटला …काय करतो विचारले असता चांगली नौकरी सोडुन गावी आलो कारण बाहेरच्या जेवणामुळे पोटाचा problem झाला व सगळे सोडुन आलो…!

असे चायनीज आवडीने खाणा-या त्या सर्वांना हा त्रास होणारच…विचार करायला हवा….हे आपणच टाळायला हवं …ईतरांसाठी नव्हे ..आपल्यासाठी …आपल्या मुलाबाळांसाठी…!

आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..