नवीन लेखन...

द रियल हिरो – हिमांशू रॉय

जीवन हि माणसाला दिलेली एक अनमोल देणगी आहे अस म्हणतात खर  पण सध्याच्या २१ व्या युगात वावरत असताना याचा प्रत्यय खूप विलक्षण पद्धतीने येताना दिसतोय. जीवनात आलोय म्हटल्यावर मृत्यू अटळ आहे हे सत्यच आहे पण  तरीहि  कधी कोठे आणि कशा प्रकारे मृत्यू होईल, हे कोणीही सांगू शकत नाही.   मुळातच माणसे आत्महत्या का करतात? एवढ्या टोकाची भूमिका का घेतली जाते? मरण एवढं स्वस्त झाले आहे? असे अनेक प्रश्न मनात काहूर माजवितात. मग अशा वेळी मरण स्वस्त होत आहे का? असाही प्रश्न डोकावू पाहतो.

मनुष्य जन्म हा एकदाच आहे, असं म्हटलं जात असलं, तरी माणूस मग मरणाला अचानक का कवटाळतो? याचा शोध घेण्याची खºया अर्थाने गरज आहे. काही महिन्यापूर्वी काळजाला चटका लागून घडणारी घटना घडली ती म्हणजे  मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रोय यांची आत्महत्या. खर तर हि गोष्ट अजूनही पटत नाही कारण जो माणूस पोलिसात येऊ इच्छिणाऱ्या युवकांचा आदर्श आहे त्याच व्यक्तीने हे पाउल उचलाव याच्यावर अजूनही विश्वास बसत नाही.आयपीएस हिमांशू रॉय हे पोलीस दलासह नव्याने पोलीस दलात भरती होणाऱ्यांसाठी ‘आयडॉल’ होते. त्यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. हिमांशू रोय हे कर्तव्यदक्ष अष्टपैलू, खेळकर, हसर व्यक्तिमत्व. सर्वांशी प्रेमाने वागणारे, सर्वाना समान न्याय देणार, शिपाया पासून पोलीस निरीक्षकाबरोबर सर्वांशी आदराने वागणारे व्यक्तिमत्व होत  कर्तबगार व धडाडीचा आयपीएस अधिकारी असा लौकिक असलेल्या या अधिकाऱ्याच्या तीन दशकांच्या कारकिर्दीचा शेवट अशा दुर्दैवी पद्धतीने व्हावा, ही शोकांतिका म्हणावी लागेल.

हिमांशू रॉय सरांचा जन्म २१ जून १९६३ मधील. १२ वी नंतर  मुंबईतील सिंत जैस्वैर कोलेज मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. सुरवातीला मेडिकल करायचं ठरवलं पण ते काही शक्य झाल नाही मग नंतर CA ला प्रवेश घेतला व सीअ झाले पण तिथेही त्याचं मन लागेना सुरवातीपासूनच त्यांना पोलीसांच आकर्षण होत  मग त्यांनी upsc ची परीक्षा दिली व १९८८ साली आयपीयस ऑफिसर झाले. तिथूनच त्यांच्या आयुष्याला सुरवात झाली. पहिली पोस्टिंग मालेगाव येथे झाली मालेगाव हे अत्यंत संवेदशील शहर मानले जाते. तिथे असणारी जातीय व्यवस्था हिमांशु रॉय सरांनी व्यवस्थित ओळखली व तेथील नागरिकांना असे काही विश्वासात घेतले, त्यांच्याशी असा काही संवाद साधला की, त्यावेळी मालेगावात जातीय दंगा घडला नाही. हेच काय, रॉय कार्यरत असेपर्यंत मालेगावात जातीय दंग्याची मोठी,अनुचित घटना घडली नाही. तिथे सुरवातीचा बाबरी मस्जिद घटनेनंतरची  मुबईमधील जी परिस्थिती होती ती त्यांनी व्यवस्थित सांभाळली व नंतर नाशिकला यसपी म्हणून पोस्टिंग झाली. नाशिक मध्ये सर्वात तरून यस पी म्हणून त्यांची ओळख झाली अशीच त्यांची कारकीर्द पुढे चालत राहिली यामध्ये त्यांनी खूप पदावर काम केले नाशिक ग्रामीण, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक, मुंबईत परिमंडळ-१ व ८चे उपायुक्त, आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेत उपायुक्त असताना अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आणले. २००४ ते २००७ या कालावधीत नाशिकचे आयुक्त म्हणून काम करताना त्यांना वैयक्तिक आरोपांनाही सामोरे जावे लागले. मात्र त्याचा कामावर काहीही परिणाम त्यांनी होऊ दिला नाही. तेथून मुंबई पोलीस दलात कायदा व सुव्यवस्थेच्या पदावर त्यांना बढती मिळाली. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. महानगरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत पार पाडल्यानंतर त्यांच्यावर ‘क्राइम’ची जबाबदारी सोपविली. महाराष्ट्रात त्यांना सुपरकॉप म्हणून ओळखले जायचे.  एटीएसचे प्रमुख म्हणूनही त्यांनी दीड वर्ष जबाबदारी सांभाळली. २००९ मध्ये ते मुंबईचे Joint Commissioner झाले. प्रत्येक प्रकरणाचा सरांनी मोठ्या बारकाईनं तपास केला. अतिशय मोठा राजकीय दबाव असतानाही त्यांनी पल्लवी पुरकायस्थ आणि पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणांचा तपास केला. काम करताना मोठा दबाव असतानाही त्याचा चेहरा कायम आनंदी असायचा.

२०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग ची केस त्यांनी स्वताकडे घेतली व कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आरोपींना पकडले. त्यांची एकच इच्चा होती खोटा आरोप कोणावरही लागता कामा नये. सर्व पोलीस अधिकार्यांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते एकजुटीने काम करत ते आजपर्यंत लढत राहिले.

मुंबई हल्ल्यानंतर रॉय यांनी भारतावर वाकडी नजर ठेवणाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या अनेक दहशतवाद्यांकडून अत्यंत महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. पुन्हा असा हल्ला होणार नाही, यासाठी त्यांनी स्वत:च एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला होता. त्यामुळे ते खूपच आत्मविश्वासाने म्हणत होते की, मी मुंबईत असेपर्यंत आता कुणी मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. त्याच आत्मविश्वासाने ते जर हाडांच्या कॅन्सर ला सामोरे गेले असते तर द रियल हिरो आज आपल्यात असता.त्यांच्या धक्कादायक निधनाने कर्तव्यकठोर आदर्श अधिकार्‍याला मुकल्याची जाणीव होत आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले नसते तर त्यांची आणखी तेजस्वी कारकिर्द पाहावयास मिळाली असती अशी आशावादी भावनाही तमाम अधिकाºयांच्या मनाला स्पर्शून गेली हेही तितकेच सत्य आहे. परिवेक्षणार्थी अधीक्षकापासून ते दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुख पदापर्यंतच्या प्रत्येक पोस्टिंगवर त्यांनी स्वत:ची आगळी छाप निर्माण केली. मात्र हा जिंदादिल अधिकारी कर्करोगाची लढाई लढण्यात अपयशी ठरला.

— अक्षय जाधव   

 

Avatar
About अक्षय जाधव 1 Article
नमस्कार मित्रानो.. मी एक विद्यार्थी आहे. मी पुण्यात राहतो. मला वाचन व लेखन खूप आवडते. विविध विषयांवर मी लिहित असतो.
Contact: Google+

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..