प्रेमाचा ओव्हरडोस

प्रेम हा शब्द उच्चारताच आपणासमोर एक ठराविक स्त्री व पुरुष या दोघांमधील प्रेम एवढेच येते. पण मी आज ज्याविषयी लिहीणार आहे ते वात्सल्य किंवा ममता या सदरातील पालकांचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम या बाबत आहे. जगातील प्रत्त्येक व्यक्ती आपल्या मुलांवर जीव तोडून प्रेम करत असते. पण सध्या आसपास जर पाहिले तर या प्रेमाचा ओव्हरडोस किंवा अतीरेक होतोय का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे असे वाटते.

मला माझ्या लहानपणी शाळेत सांगीतलेली एक गोष्ट आठवते. एकदा शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गुलाबाचे रोप दिले. मुलांना सांगीतले की घरी जाऊन प्रत्येकाने ते रोप जमीनीत किंवा कुंडीत लाऊन त्याला वेळचेवेळी पाणी देऊन सांभाळ करावा. एक महिन्याने सर्व मुलांचे घरी येऊन शिक्षक पहाणी करतील व ज्या मुलाचे रोप वाढले असेल त्याला बक्षीस मिळेल. वर्गातील एका मुलाने ते रोप घरी बागेत लावले व तो त्याची व्यवस्थित काळजी घेत होता. आपले रोप सर्वात चांगले व्हावे म्हणून त्याने खुपच काळजी घेतली. पण आपलेच रोप मोठे व्हावे या हव्यासापोटी तो त्या रोपाला रात्रंदिवस सारखे पाणी देत होता. त्याला उन्हाचा वाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून प्लास्टीक अच्छादन घातले होते. त्याचा विपरीत परिणाम परिणाम असा झाला की पाण्याच्या अती वापरामुळे त्याचे रोपाची वाढ नीट झाली नाही. त्याला ऊन, वारा यांची सवय नसल्याने एका जोराच्या वादळी पावसात त्याचे रोप टिकाव धरु शकले नाही ते ऊन्मळून पडले.

आज एकुणच समाजातील पालकांचे मुलांच्या बाबतीत प्रेम पहाता ते त्या शाळेतील लहान मुलांप्रमाणे प्रेमाचा अतीरेक करतायत का असेच वाटते. हल्ली बहुतांश घरात मुलगा किंवा मुलगी एकच अपत्य असते. त्यामुळे ते घरातील सर्वांचे लाडके असतेच. आई वडील दोघेही नोकरी करणार असतील तर ते मुलांना वेळ देऊ शकत नाहीत मग त्याची भरपाई म्हणून महागडे खेळ, कपडे , हॉटेलींग याचा भडीमार केला जातो. विकेंडला आसपास एखाद्या वॉटर पाकला ट्रीपवर नेले जाते. त्याला नामवंत शाळेत डोनेशन भरुनप्रवेश घेतला जातो. घरात चांगले संस्कार करणारे कोणी असतेच असे नाही. बहूतांशी अशा पालकांची मुलं अशीच विनासंस्कार मोठी होतात. मग पात्रता नसताना भल मोठ डोनेशनदेऊन मेडीकलला किंवा ईंजीनियरींगला प्रवेश घेतला जातो. कसं बस शिक्षण पुर्ण होते. मुले हुशार असतील तर चांगल्या प्रकारे शिक्षण पुर्ण करुन आई वडिलांचे नाव ऊंचावतात. पण अशी संख्या फार कमी असते. बहुतांश वेळी परिस्थिती ऊलट असते व मुल अती व फाजील लाडाने बिघडण्याची शक्यता जास्त असते.

आयुष्यात करिअर ,पैसा ,प्रसिथ्दी असावी. त्याला महत्त्व आहेच पण त्यामागे धावत असतानाच ज्याच्या साठी हे आपण सर्व करतोय ती आपली मुल त्याहून जास्त महत्त्वाची आहेत. त्यासाठी त्यांचेवर लहानपणा पासून चांगले संस्कार होणे गरजेचं आहे. दोघांपैकी किमान एकाने तरी मुलांच्या लहान वयात सुरुवातीला आपलं करिअर थोडं बाजूला ठेवून लक्ष घातले पाहिजे. त्यासाठी नोकरी सोडून घरीच बसलं पाहिजे असं नाही पण वेळेवर घरी येणे संध्याकाळी थोडावेळ त्यांच्याशी गप्पा मारण त्याचा अभ्यास करवून घेणं त्याच्या अभ्यासातील किंवा अन्य काही अडचणी असतील तर त्या समजून घेणे येवढे जरी केलं तरी पुरेसे आहे. आणी ते सुध्दा मुलं पाचवी सहावी इयत्तेत जाईपर्यंत. त्यानंतर मुलांना समजू लागते व ती स्वतःहून योग्य निर्णय घेऊ लागतात. आई वडील आपल्या पाठिशी आहेत ही भावनाच त्यांना पुरेशी असते. शेवटी पैसा कितीही मिळवला तरीही कमीच वाटतो. पण त्याच्या पाठिमागे लागून आपले व आपल्या कुटुंबाचे किती हाल करायचे याचा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा आहे. कुटुंब सुखी तरच आपण सुखी एवढे जरी लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे. हे माझे वैयक्तिक मत मांडले आहे सर्वांना पटेलच असे नाही व तसा आग्रहही नाही.यावर मतभिन्नता असू शकते. कोवळया वयातील मुलांची सध्या सुरु असलेली असहाय्य पाहून वाईट वाटते म्हणून हा लेखन प्रपंच.

— सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा
१२ जुन २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 47 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

महाभारतकालीन कुंतलनगर काटोल

महाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन ...

Loading…