नवीन लेखन...

नवं सौरचक्र

अमेरिकेच्या नासा आणि नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थांनी सूर्याच्या निरीक्षणावरून काढलेल्या निष्कर्षांनुसार सूर्य हा गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात किमान सक्रियावस्थेत होता. आता सूर्याच्या जागृतावस्थेला सुरुवात झाली आहे. यानंतर सूर्य उत्सर्जित करत असलेल्या सौरकणांची संख्या तसंच सूर्याच्या पृष्ठभागावरील डागांची संख्या वाढत जाऊन ती सुमारे साडेपाच वर्षांनी – म्हणजे २०२४ सालाच्या सुमारास – ती जास्तीत जास्त असेल. त्यानंतर पुनः सूर्याच्या जागृतावस्थेची तीव्रता कमी होऊ लागेल व आणखी साडेपाच वर्षांनी – म्हणजे २०३० सालच्या सुमारास सूर्य पुनः २०१९ सालच्या अवस्थेत पोचलेला असेल. जर्मनीच्या योहान रुडॉल्फ वोल्फ यानं १८४३ साली सौरचक्रांचा कालावधी निश्चित केला. त्यानंतरचं, १७५५-१७६६ या काळातलं सौरचक्र हे पहिलं सौरचक्र म्हणून गणलं गेलं. सौरचक्राची सुरुवात ही सूर्य किमान जागृत अवस्थेत असताना सुरू झाल्याचं मानलं जातं. आता सुरू झालेलं हे सौरचक्र पंचविसावं सौरचक्र आहे.

सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान सुमारे सहा हजार अंश सेल्सियस इतकं असतं, तर सौरडागांचं तापमान हे सुमारे तीन हजार सेल्सियस इतकं असतं. हे सौरडाग जरी सूर्याच्या इतर पृष्ठभागाच्या तुलनेत थंड असले तरी, हे सौरडाग म्हणजे अतितीव्र चुंबकीय क्षेत्राची ठिकाणं आहेत. सूर्यावरून उफाळणाऱ्या सौरज्वाला या, याच डागांच्या परिसरात निर्माण होतात. सौरज्वालांद्वारे उत्सर्जित झालेले सौरकण हे विद्युतभारित असतात. त्यामुळे ते जेव्हा पृथ्वीवर पोचतात, तेव्हा त्यांच्यामुळे पृथ्वीवरील संदेशवहन व्यवस्थेला तसंच विद्युतवितरण व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर, या सौरकणांची वातावरणातील वायूंच्या रेणूंशी त्यांची क्रिया होते व त्याद्वारे रंगीबेरंगी प्रकाशाची निर्मिती होते. ध्रुवीय प्रकाश म्हणून ओळखला जाणारा प्रकाश तो हाच! सूर्य जागृत असताना, या ध्रुवीय प्रकाशाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असतं.

चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/Z0uIcLZ5rh8?rel=0

— डॉ. राजीव चिटणीस.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..