नवीन लेखन...

कठोर परिश्रमाचे फळ

स्वातंत्र्यपूर्व काळातील बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका गावी घडलेली ही घटना आहे.

वार्षिक परीक्षा नुकतीच संपून गेली होती. त्या परीक्षेचा निकाल ज्या दिवशी होता त्या दिवशी विद्यार्थ्यांची शाळेत गर्दी होती. निकालानंतर शाळेला सुट्टी असल्याने सर्वच मुले आनंदात होती. त्या त्या वर्गात शिक्षकांनी जाऊन मुलांचे निकाल जाहीर केले व निकाल पाहून विद्यार्थी शाळेतून निघूनही गेले. मात्र एका वर्गातील एक मुलगा आपल्या वर्गातच बसून होता. वास्तविक तो मुलगा परीक्षेत उत्तीर्ण झाला होता, मात्र गणितामध्ये त्याला खूपच कमी गुण मिळाले होते आणि गणितामधील कमी गुण पाहून आपले वडील आपणास मारतील याची त्याला भीती वाटत होती. कारण शाळेत येतानाच त्याच्या वडिलांनी त्वाला तशी तंबी दिली होती. त्यामुळे रडवेला चेहरा करून तो वर्गातच बसून होता.

शेवटी शाळा बंद होण्याची वेळ आली. शिपाई एकेक वर्ग बंद करू लागला तेव्हा त्या वर्गात त्याला हा मुलगा एकटाच बसलेला दिसला. त्याने चौकशी केली. शिपायाला पाहताच तो मुलगा रडू लागला. शिपायाने त्याच अवस्थेत त्याला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे नेले. मुख्याध्यापकांनी त्याला विचारल्यावर त्याने सांगितले की, गणितात कमी गुण मिळाल्यामुळे वडील घरी गेल्यावर मला मारतील म्हणून मला घरी जायची भीती वाटत आहे.

त्यावर मुख्याध्यापकांनी त्या मुलाला समजावून सांगितले, एका परीक्षेत गणितात कमी गुण मिळाले म्हणून तू असा निराश होऊ नकोस. पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापासून तू नियमितपणे अभ्यास कर, कठोर परिश्रमाचे फळ नेहमीच चांगले असते. त्यामुळे तू गणिताचा मन लावून अभ्यास केल्यास तुला गणितात चांगले गुण मिळू शकतात. तुझ्या वडिलांनाही समजावून सांगण्यासाठी मी स्वत: तुझ्या घरी येणार आहे.

त्याप्रमाणे तो मुलगा मुख्याध्यापकांसह त्याच्या घरी गेला. स्वत: मुख्याध्यापकच आल्यामुळे वडील काही त्या मुलावर रागावले नाहीत, मात्र त्या मुलाने दुसऱ्याच दिवसापासून सर्वच विषयांचा मन लावून अभ्यास करण्यास सुरुवात केली. प्रत्येक वर्षी चांगल्या गुणवत्तेसह तो उत्तीर्ण होत गेला.

त्या मुलाचे नाव होते राजेंद्रप्रसाद !

हेच डॉ. राजेंद्रप्रसाद पुढे स्वातंत्र्य चळवळीत उतरले व स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याचा त्यांना मिळाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..