नवीन लेखन...

तक्षशिला – भारतातील प्राचीन विद्यापीठ – भाग 2

तक्षशिला विद्यापीठात शिकवले जाणारे पाठ्यक्रम

विद्यापीठात वेगवेगळे पाठ्यक्रम शिकवले जात. त्यात वेद त्यांच्या सहायक सहा शाखा. वेदाचे  योग्य ऊचारण, वेगवेगळे साहित्य, विधी, यज्ञ व्याकरण, जोतिषशास्त्र , छंदशास्त्र आणि त्याची  व्युत्पत्ती, या अभ्यासाचा उपयोग वेद आणि त्याच्या शाखा यांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी होत  असे.

या शाखापैकी काही शाखा असत, सांखया, न्याय वैसेशीखा, अंकगणित , संगीत, औषधे पुराण, इतिहास, युद्धशास्त्र, काव्य, कायदा बीजगणित, शेती, वाणिज्य, पशूउत्पादन, लोहारकाम, सुतारकाम, वैद्य, शल्यचिकित्सा , धनुष्य बाण , गुप्त खजिना शोधन, नृत्य, चित्रकला.

शिकवले जाणारे  पाठ्यक्रम जोपर्यंत विद्यापीठ होते तो पर्यन्त शिकवले जात होते. ज्या वेळी वाटे की सामाजिक , राजकीय, धार्मिक बदल होत  असे  त्यावेळी त्यामध्ये भर घातली जात असे.

परकीय आक्रमण

इसापूर्व सहाव्या शतकात पर्शियाने आक्रमण केले, त्यावेळी ब्राह्मी लिपीची जागा खारोषतरी लिपीने घेतली.

इसा पूर्व दुसऱ्या शतकात ग्रीक आक्रमण झाले त्यामुळे त्यांचे अधिकचे पाठ्यक्रम शिकवू जाऊ लागले. ग्रीक भाषा शिकवू जाऊ लागली. गुरुजनांना ती भाषा शिकवण्यात कोणताही कमीपणा वाटत नसे इतके ते उदार मनाचे होते.

ग्रीकांची जागा पहिल्या शतकात कुशाणांनी घेतली. पण त्यांची अशी स्वताची संस्कृति नव्हती. त्यामुळे फारसा फरक पडला नाही.

पाचव्या शतकात हुणानि जागा घेतली. बुद्धीझमचा   विद्यापीठावर भरपूर प्रभाव पडला. जो इसापूर्व सहाव्या शतकात जन्माला आला. बुद्धीझमला पाठ्यक्रमात जागा मिळाली.

विज्ञान शाखेत लेखी व सराव दोन्ही परीक्षांचा अभ्यास करावा लागे, पण खरा सराव विद्यार्थी शिक्षण संपवून बाहेर पडत असे, व आयुष्याची सुरवात करत असे तेव्हाच होत असे. वैद्यक शास्त्रात विद्यार्थी पूर्ण पारंगत झाला आहे की नाही याची खात्री करूनच त्याची परीक्षा घेतली जात असे.

पाचव्या शतकात विद्यापीठाचा शेवट झाला.

– रवींद्र शरद वाळिंबे

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..