नवीन लेखन...

निरागस जीवन

प्रफुल्लित भाव वदनी, घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या, आज त्याच्या मनांत कांहीं…१ खेळत होता दिवसभर , इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें, हीच तयाची जीवन अंगे…२ सांज होता काळोख येवूनी, निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं, कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या आधीन होतां, निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या दिवसा विषयी, अजाण होता […]

भास

चमचम चमकते नाणें   दूरी वरुनी दिसले । चांदीचे समजूनी    मन तयावर झेपावले ।।   निराशा आली पदरीं    जाणतां तुकडा पत्र्याचा । खोटी चमक बाळगुनी    फसविणे गुणधर्म तयाचा ।।   भास ही चेतना ती    तर्क वाढीवी कसा । दिसून येई सदैव  मनावर जो उमटे ठसा ।।   ठसे उमटती संस्कारांनीं    बघतां भोवती सारे । मनावर बिंबून जाते […]

बदलते भाव

बदलते भाव   कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येते राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटते….१ देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले….२ देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी…३ जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून भावांचे रंग बदलती, अंतर बाह्यावरून…४   डॉ. भगवान नागापूरकर […]

संस्कारा प्रमाणे

समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई सबळ दुर्बल याचा संघर्ष, टळत नेहमी जाई….१, मर्दूमकीचा विचार ठेवूनी, मैदानी उतरी त्याच स्थरावर सारे घडते, मुरले जे शरिरी….२, ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी हात घाईची सिमा परि, तो टाळी विचारांनी…..३, मस्तावले शरिर असतां, धक्का-बुक्की होते देहामधली जमली शक्ती, बाह्य मार्ग शोधते….४, दिसून येतो ऊर्जा वापर, देह […]

आधुनिकता

नवलाईचे विश्व सारे,  नवलाईतच जगते आगळ्याच्या शोधामध्यें,   नव-नवीन इच्छीते ताजे वाटते आज जें,   शिळे होई उद्यांच ते प्रवाही असूनी जीवन,   बदल घडवीत जाते मुल्यमापन बदलांचे,   संस्कारावरी अवलंबूनी परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें,  विचार फिरे क्षणोंक्षणीं मुळतत्व ते राही कायम,   आकार घेई जसा विचार ताजा शिळा भाव मग तो,   ठरविला जाई वेळेनुसार डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे….४. डॉ. भगवान नागापूरकर संपर्क […]

फूलपाखरे नि फुले

रंगबिरंगी सुंदर ठिपके, पंखावरी आकर्षक छटा त्या, मनास मोहीत करी…१, नृत्य पहा कसे चालते, तालबद्ध होवूनी फूलपाखरे बागडती, फुलाफुला वरूनी…२, नृत्याचे आंगण त्यांचे, ते ही सुंदर नि मोहक मखमालीच्या पाय घड्या, दरवाळताती सुवासिक…३, दोघांमधली चढाओढ, नर्तक आणि नृत्यांगणा कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

प्राण ज्योत

दिवा होता छोटासा, एक मजकडे इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे तळांत होती योजना, तेल सांठवण्याची शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं व्यय टाळून प्रवाही […]

1 11 12 13 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..