नवीन लेखन...

सौंदर्य दृष्टी

कां मजला ही सुंदर वाटते ? दृष्टी माझी वा सौंदर्य तिचे ? कोण हे ठरवी निश्चीत, मजला काही न कळते असेल जाण सौंदर्याची तर, दिसेल सर्वच सुंदर नयनी तिच एक कशी असेल सुंदर, जग सारेच असतां सुंदर सौंदर्याची दृष्टी नाहीं, म्हणून सौंदर्य एखाद्यांत पाही पूर्वग्रह दुषित असते, तेच सौंदर्याचे परिणाम ठरते मला जे भासते सुंदर, दुजास […]

ग्रह परिणाम

वळून बघता पूर्व आयुष्यी, प्रखरतेने हेची जाणले घडले नाही कधीही ते ते, हवे असूनी मनी योजीले….१ सभोवतालची देखूनी स्थिती, आखती योजना कल्पकतेने खेळामधली चाल नियतीची, ध्यानी न येते दुर्दैवाने…..२ मार्ग तिचे ठरले असूनी, बांधलेले इतर जीवांशी अपूर्व योजना निसर्गाची, कळेल कुणाला सहज कशी….३ जाळीतल्या धाग्याची टोके, गुंतली असती ग्रह गोलाशी फिरता फिरता खेच पडे, वा ढीली […]

निरोप

तिक्ष्ण दृष्टी दे घारीसम, देवा तिजला  । दूरवर बघत राहीन, ती लेकीला  ।।१।। लेक चालली निरोप घेवूनी, सासरी  । भरल्या नयनी माय उभी, शांत दारी  ।।२।। जड पावले पडता दिसती, लेकीची  । ओढ लागली त्याच पावलांना, मायेची  ।।३।। उंचावूनी हात हालवीत, चाले  लेक  । जलपडद्यामुळे दिसे, तीच अंधूक  ।।४।। वाटेवरूनी जाता जाता, दृष्टीआड झाली  । अश्रूपूसून पदराने, […]

प्रथम शाहाणा कर

अपमान होईल तुझा शारदे, हे घे तू जाणूनी  । मूर्खावरती बरसत आहेस, जाणेना कुणी  ।। ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा, असे माझे ठायी  । भाषा साहित्य यांच्या छटा, दिसून येत नाही  ।। निर्धनासी धन मिळता,  जाई हर्षूनी  । हपापलेला स्वभाव येई, मग तो उफाळूनी  ।। माकडाचे हाती मिळे कोलित, विनाशास कारण  । गैरउपयोग होई शक्तीचा,  नसता सामान्य ज्ञान  […]

जखमांचे वृण

किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]

जीवन मृत्यू खेळ

सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी….१, भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा, काळाची ती भूक असूनी,  माहीत असते सर्वांना….२, अविरत चालू लपंडाव ,  जगण्या मरण्याचा शेवट हा जरी निश्चीत असला,  हक्क तुम्हां खेळण्याचा….३, खेळती काही तन्मयतेने,  रिझविती इतरजणां, खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां….४   — डॉ. […]

प्रतिक्रिया

क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी  । तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी  ।।१।।   फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी  । प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं  ।।२।।   शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी  । येऊनी धडकतील, तुमचेच पाठीं  ।।३।।   प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते  । आनंदी लहरी, मनां सुखावते  ।।४।।   — डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com […]

स्थिर वा अस्थिर

स्थिर आहे जग म्हणूनी, अस्थिर आम्ही जगू शकतो । अस्थिर आहे जग म्हणून, स्थिर आम्ही जगू शकतो ।।१।।   पोटासाठी वणवण फिरे, शोधीत कण कण अन्नाचे । थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे ।।२।।   धरणी फिरते रवि भोवतीं, ऋतूचक्र हे बदलीत जाते । जगण्यामधला प्राण बनूनी, चैतन्य सारे फुलवून आणते ।।३।।   पूरक बनती […]

जाळी

धागा धागा विणून, केली तयार जाळी । गोलाकार नि बहुकोनी घरे, पडली निर निराळी ।।१।। स्थिर सुबक घरे, जसा स्थितप्रज्ञ वाटे । सर्व दिशांचा तणाव, न दिसे कुणा कोठे ।।२।। तुटेल फुटेल तरी, सैलपणा येणे नाही । जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही ।।३।। जगे तो अभिमानानें, मान ठेवूनीया ताठ । संसारामधील क्लेश, झेलीत होती […]

1 8 9 10 11 12 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..