नवीन लेखन...

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी, फसवी सर्वाला काय डब्यामध्ये, कळेना कुणाला…३ झाकण उघडा, दुःख दिसे आंत लपून बसले, प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच, दुःख हाती येई भासलेले सुख, नष्ट होत जाई…५ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

माझा मीच गुरू

मीच माझा गुरू, जे मनी ठरवू विचारांती तेच करू ….।।धृ।। सल्ला घेईन सर्वांचा, वाटे मज किंमतीचा मनाची कदर करूं…१ मीच माझा गुरु निर्णय असे अनेक, सारेच असती ठिक निवड एकाची करूं…२ मीच माझा गुरु, इतरांना जे वाटते, माझ्या सोईचे नसते सोईचा आग्रह धरूं…३ मीच माझा गुरू शेवटीं माझ्या करिता, गोष्टीची उपयोगिता स्वतःसाठीं योग्य करू…४ मीच माझा […]

प्रभू नामस्मरण

नाम घ्या हो तुम्ही, प्रभूचे सतत नामस्मरण , असू घ्या मुखांत …१ काय सांगावी, नामाची थोरवी दगडही जेथे, तरंगून जाई…२ रोम रोमामध्यें, प्रभूचा संसार बनून कवच, रक्षती शरिर…३ नामाची लयता, मन गुंतवून एक होतां चित्त, जाई आनंदून…४ अंतीम ध्येय, ईश समर्पण नामानी साधती, प्रभू सर्वजण…५ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सुखाची मोहमाया

तप्त लोखंडात, लपली ती आग दिसे लाल लाल, जाळी सर्व भाग…१, सुंदर फूलात, सुंगध तो छान अवती भवती काटे, ते कठीण…२, विजेची ती तार, प्रकाशी दिव्याला, झटका तो देई, स्पर्श होता तिला..३, सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया न दिसे ती आम्हा, असे मोह माया…४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

तन्मयतेत आनंद – प्रभू

सतत गुंतलो आहो सारे शोध घेण्यास त्या ‘आनंदाला’ युगानूयुगे प्रयत्न होतो मिळवण्यासाठींच प्रभूला…१ बाह्य जगाचे सुख आगळे लागले सारे त्याच्या पाठीं ‘देह सुख’ अंतीम वाटे, खरा ‘आनंद’ देण्यापोटी…२ ‘ज्ञानामध्ये’ भरला ‘आनंद’ समजूत झाली ही कांहींना लेखक, कवी, साहीत्यिक हे पाठ त्याची कांहीं सोडीना…३ साधू संत हे थोर महात्मे आनंद शोधूती ‘विश्रमांत’ ‘ध्यान’ लावून एक मनानें शांत […]

सुखाचे मृगजळ

धांवत असे मन आमचे, शोधण्या नेहमीं सुखाला सुख तर आहे मृगजळ, फसवित राही सर्वाला…१ मृगजळाचे धावूनी पाठी, निराशा हाती येत असे, वेडी आशा मनीं बाळगुनी, सुखासाठी तडफडत असे…२, आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे जवळ जातां प्रयत्न करूनी, सुख नसूनी दुःखची भासे…३, खरे सुख कशांत बघतां, तें तुमच्या मनींच वसत बाह्य जगी शोधत असतां […]

तीन गुणाचे जीवन

तीन गुणांनीं युक्त असूं द्या, तुमचे जीवन सारे । जीवन यश पताका तुम्हीं, फडकवित रहा रे ।।१।। असती सारे ईश्वरमय, याच भूतला वरचे । प्रथम मान द्या हो प्रभूला, कार्य समजून त्याचे ।।२।। आनंद घेऊनी संसारांचा, लक्ष्य असावे जीवनीं । निसर्गाचे हे चक्र फिरावे, विचार असूं द्या मनी ।।३।। दुसऱ्याचा बघूनी आनंद, दुप्पट होई आपला । […]

खोडकर कृष्ण

किती रे खोड्या करिशी कृष्णा यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।। झोपू दे रे तिजला आतां, ती तर गेली खूप दमूनी दही दुधांनी भांडी भरली, काही प्याली, काही वाटली, काही तर ती उपडी झाली, पिऊनी सांडूनीच सगळे, नासलेस दही दूध लोणी…१, किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी गणरायाचे पूजन करितां मग्न झाली यशोदा माता लक्ष्य […]

जीवन म्हणती याला

    जीवन म्हणती याला   त्याची ऐकूनी करूण कहाणी, डोळे भरून आले पाणी हृदय येता उंचबळूनी, निराश झाले मन ।।१।। आघात होता त्याच्या जीवनी, तो तर नव्हता माझा कुणी तरी का आले प्रेम दाटूनी, उमजेना काही ।।२।। दु:ख दुजाचे समोर आले, मनास ज्याने कंपीत केले दोन जीवांच्या हृदयामधले, अदृष्य हे धागे ।।३।। मानव धर्म एक […]

यशासाठी प्रयत्नाची दिशा

प्रयत्न करितां जीव तोडून, जेव्हां यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्हीं, नशिबास दोष देत राही..१ दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हां, मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२ चूक दिशेने प्रयत्न होतां, वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन…३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले […]

1 22 23 24 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..