नवीन लेखन...

एक अविस्मरणीय प्रवास

एका अतिमहत्वाच्या कामासाठी गावी जायचे होते. मुळात गावावरून फोन आला त्यावेळी रात्रीचे साडेअकरा वाजले होते. तरीही मी ओळखीच्या ट्रॅव्हल्समध्ये “सांगली, मिरज, कोल्हापुरला जाणारी एखादी तरी गाडी आहे का?” म्हणून चौकशी केली. पण एकही नव्हती. मग या क्षणाला कशाने जायचे हा गहन प्रश्न होता. […]

थोडं गोड, थोडं आणखी गोड

त्यादिवशी संध्याकाळी मी ऑफिसातून जरा तावातावानेच आलो. दिवसभर प्रामाणिकपणे काम करून साला! साहेबाला त्याचं काहीच नाही म्हणजे काय? काल न सांगता रजा घेतली म्हणून टकल्याने अगदी रामादेखत माझी बिनपाण्याने केली. काल एका महत्वाच्या शोधमंडळात आमची नियुक्ती झाली होती हे त्याला सांगून काय उपयोग? […]

लवणी फटका

आजकालचे शिक्षण म्हणजे भलतीच सुधारीत आवृत्ती आहे. आताचे दुसरी तिसरीतले बाळ ज्या सफाईने इंग्लिश बोलते किंवा त्याच्या अभ्यासातल्या शंका विचारते, तशा प्रकारचे इंग्रजी आम्हांला इंटरव्युव्हला जाताना यायला लागले. आताची पिढी खूपच चुणचूणीत आहे यात वादच नाही. बर्‍याचदा त्यांनी विचारलेली शंका काय आहे हेच कळत नाही. पण आता मला जे काही थोडेफार इंग्लिश येते त्यात सर्वात मोठा […]

बंड्या आणि शिक्षणमंत्री

“शाळेचा शोध कुणी लावला?” हा प्रश्न माझ्या सहावीत जाणार्‍या बंड्याला सिनीयर केजीत गेल्यापासून भेडसावतो आहे. खेळणी, कार्टुन आणि छोट्या भीमच्या जगात सुखी असता असता इवल्याशा लहान जीवाच्या मागे हा शाळा नावाचा प्रकार कशासाठी असतो हा त्याचा रास्त प्रश्न आहे. […]

मोबाईलचे दुष्परिणाम : एक शालेय विरुद्ध खरा संवाद

बंडयाने परवा मला एक शालेय संवाद दाखवला. मोबाईलचे दुष्परिणाम काय असतात हे त्याला आई सांगत असते असा एकूण मजेशीर विषय होता. एकूण विषय देतानाच कर्ता, कर्म आणि क्रियापद वापरून जे काही तयार होते ते खरे असते का, हे तपासण्याची शाळेला गरज वाटली नसावी. असो, तर आपण शालेय संवादाकडे वळू. […]

नवकवीचा विळखा

दोन महिने उलटून गेले तरी एजंटचा फोन किंवा पॅनकार्ड यापैकी काहीच आले नाही. एजंटला फोन केला तर त्याचे भलतीच बातमी दिली. त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन दिलेला माझा फॉर्मच त्याला सापडत नव्हता. उद्या सकाळी ऑफिसमध्ये या आणि शोधा असे सांगण्यात आले. पुन्हा दुसर्‍यादिवशी सकाळ सकाळी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. मी भेटलेल्या एजंटचा पत्ता नव्हता. बाजूलाच दोघेजण खाली मान घालून आपापले काम करत बसले होते, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करणे बरोबर नव्हते. […]

गोष्ट एका मिशीची

लहानपणापासून माझ्या मनात बरीच कुतुहले आहेत. मोठा झाल्यावर त्यातली बरीच कमी झाली‚ काही आणखी नवी आली. बालपण खेडयात गेले असल्याने सुरवातीची बरीच वर्षे दुरच्या डोंगराच्या पायथ्याची वाहने बघून ती आपोआप कशी धावतात याचे कुतूहल वाटायचे. वाहन चालवायला ड्रायव्हर असतो हे आमच्या ध्यानीमनीही नव्हते. सगळयाच वाहनांना ड्रायव्हर असतो हे समजल्यावर तर मला धक्काच बसला होता. पोपट हा […]

अतिरेकी मेसेजेस

काही अतिरेकी भक्तलोक देव, देवी किंवा महाराजांचे उगाचच धमकीवाले मेसेज पाठवतात. नुसते पाठवत असतील पाठवू देत बिचारे! त्याचे काही नाही. पण त्यांनी पाठवलेल्या मेसेजची लिंक तोडायची नसते. मेसेज पुढे पाठवला नाही तर फार मोठे नुकसान होणार अशी वर धमकी असते. […]

काय म्हणतंय तुमचं ड्रायव्हिंग?

“मग काय म्हणतंय तुमचं ड्रायव्हिंग?” हा प्रश्न विचारून लोक नवशिक्या ड्रायव्हरच्या जखमांवर का मीठ चोळतात कळत नाही. म्हणजे अशा प्रश्नांना काय उत्तर द्यायचे हा एक प्रश्नच असतो. बर्‍याचदा हा प्रश्न निर्मळ मनाने विचारला जातो की उगाचच डिवचायला हे समजणे अवघड असते. बरं ड्रायव्हर लोकांना नवीन गाडी शिकणार्‍याची व्यथा तरी समजते पण ज्याला ड्रायव्हिंगचे ओ का ठो […]

व्यायाम केलाच पाहिजे का?

‘आरोग्यम् धनसंपदा-’ या उक्तीचा साक्षात्कार झाला की मी व्यायाम चालू करतो आणि ते वेळापत्रक दोन दिवसात कोलमडते. एरव्ही व्यायामाची मला आवड आहे अशातला भाग नाही. कोणतरी हार्टफेलने गेला किंवा कुणाचे बीपी वाढलेले कानावर आले की मी नेमाने व्यायाम सुरू करतो. आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवायचेच म्हणून आपोआप आतून स्फुरण येते, पण ते फारच कमी टिकते. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..