मुंबई ते कल्याण रेल्वेप्रवासाची नांदी
१८५४ मध्ये मुंबईजवळचा पारसिकचा डोंगर फोडून त्यातून बोगदा खोदून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. नवीन लोहमार्ग टाकून झाल्यानंतर या लोहमार्गाची चाचणी करुन घेण्यासाठी १ मे १८५४ रोजी मुंबईचा गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन याने २५० प्रतिष्ठित नागरिकांसमवेत आगगाडीतून कल्याणचा दौरा केला. त्यापूर्वी जेमतेम एक वर्षाआधी भारतातीलच नाही तर आशिया खंडातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला मुंबई – […]