प्रेरणेचं पाणी
लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही म्हण हनुमंत केंद्रे यांनी प्रत्याक्षात आणली आहे.भगिरथाने प्रयत्नाने स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली हे आपण पुराणात ऐकले होते. पण दुष्काळी गावाला सुजलाम सुफलाम करण्याची किमया जलदूत म्हणून ओळखले जाणारे हनुमान केंद्रे यांनी केली आहे.दुष्काळ हा काही काही गावासाठी पाचवीला पुजलेला असतो, पण स्वप्नं बघण्याचा आशावादी दृष्टिकोन ठेवला तर काय होऊ शकते याचा वस्तुपाठ हनुमान केंद्रे यांनी सिद्ध करून दाखवला आहे. […]
