भारतीय अर्थकारणाचे नाविक
१९३५ साली स्थापन झालेली ‘रिझर्व्ह बॅंक’, भारतीय अर्थव्यवस्थेत आणि देशाच्या प्रगतीत ‘मध्यवर्ती बँक’ या स्वरूपात आधारस्तंभाची भूमिका निभावत असते. देशाला चलन पुरवठा करणे, राष्ट्राची गंगाजळी राखणे, देशाचे आर्थिक धोरण ठरवणे, विदेशी विनिमयाचे व्यवस्थापन करणे, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टमचे नियमन करणे, केंद्र व राज्य सरकारे तसेच देशातील सर्व बँकांचे बँकर म्हणून काम बघणे अशी अनेक अतिमहत्त्वाची उत्तरदायित्वे रिझर्व्ह बॅंकेला पार पाडावी लागतात. […]
