नवीन लेखन...

अमेरिकन गाठुडं – १०

भारत अमेरिकेची तुलना होऊ शकणार नाही. तो देश दोनशे वर्षा पासून स्वतंत्र आहे, आपण त्यामानाने खूप उशिरा स्वतंत्र झालोय. चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करत गेलो, तर कोणत्याही प्रगत देशा पेक्षा आपण मागे रहाणार नाही. अन एक दिवस, ‘सारे जहासे अच्छा हिंदूस्ता हमारा!’ आपणच अभिमानाने म्हणू. शेवटी एकच सांगावस वाटत, स्वर्ग काय अन अमेरिका काय? या गोष्टी फक्त पहायच्या असतात, राहायच्या नसतात. शेवटी ‘आपला गाव बरा!’ हेच सत्य असत! […]

अमेरिकन गाठुडं – ९

ऑस्टिन! सकाळी साडेआठची वेळ! पारा पाच अशांवर! आभाळ म्हणजे, राखेडी रंगाचं विशाल घुमट. सूर्याचे अस्तित्व म्हणजे, त्या घुमटातून पाझरलेला, वस्त्रगाळ प्रकाश. पडून गेलेल्या पावसाचे अवशेष परिसरात आणि आसमंतात बिलगून राहिलेले. वातावरणात एक गूढ आणि गोड अशी (‘ती’च्या आठवणींची) कातरता! अधून मधून, गार रेशमी झुळका आसपास लहरून जात होत्या. […]

अमेरिकन गाठुडं – ८

वीक एन्ड आला. एक शॉर्ट ट्रिप करण्याचे ठरले. सॅन अँटोनियो. “किती लांब आहे?” मी विचारले. “काही नाही, तीन साडेतीन तासाच्या ड्राइव्हवर आहे.” मुलगा म्हणाला. या अमेरिकेत प्रवासाचे अंतर मैल किंवा किलोमीटरवर कधीच मोजत नाहीत. किती वेळ लागेल यावर मोजतात! हल्लीची मुलं खूप छान ट्रिप मॅनेज करतात, याचे प्रत्यंतर या वेळेसही आले. मुलाने प्रवासासाठी सात सीटर दांडगी […]

अमेरिकन गाठुडं – ७

ऑस्टिनच्या वास्तव्यात मी मॉल आणि दुकान पहिली. पैकी वॉलमार्ट आणि कोस्टको हे मॉल भव्य. वॉलमार्ट तर जगातलं प्रथम क्रमांकावरील रिटेलर आणि कॉस्टको नंबर दोन वर! कॉस्टको हे होलसेल मल्टिनॅशनल चैन! यांचे टाचण्या पिना पासून पेट्रोल पम्पा पर्यंत प्रॉडक्ट आहेत. कॉस्टकोत किमती मला तरी कमी वाटल्या, पण लॉट्स मध्ये घेतले तर. व्हरायटी वॉलमार्टच्या मानाने कमीच होती. […]

अमेरिकन गाठुडं – ६

मी ऑस्टिनला आल्यापासून तीन मंदिरांना भेट दिली आहे. पैकी ‘ऑस्टिन पब्लिक लायब्ररी’ तुमच्या पर्यंत पोहंचवली आहे. राहिलेले दोन मंदिरांन पैकी एक होते व्यंकटेशाचे मंदिर. […]

अमेरिकन गाठुडं – ५

आपल्या कडे कंपाउंड हे भक्कम विटा सिमिटाच्या भिंतीत असते. येथे बहुतेक कंपाउंड हा प्रकार नसतोच. असला तरी लाकडी फळकुटाचे असते, किंवा मग लोखंडी. आमच्या कम्युनिटीला लोखंडाचे आहे. संपूर्ण सेक्युरिटी इलेक्ट्रॉनिक डिव्हिसेसवर. कार गेटजवळ आली कि गेट उघडते. नाही उघडले तर गेटच्या  पोलवरल्या पॅनलवर कोड नंबर प्रेस करावा लागतो. किंवा बहुतेकांच्या घराच्या किल्ल्या सोबत गेटचा रिमोट असतो. कोठेही सेक्युरिटी गार्ड नाही. […]

अमेरिकन गाठुडं – ४

येथे गरीब असो श्रीमंत असो कार आवश्यक आहे. ‘कार’ हि येथे, रोटी-कपडा-और मकान इतकीच गरजेची आहे. त्याला करणेही आहेत. विरळ आणि विखुरलेली रहिवाशी वस्त्या. दूर अंतरावरील गरजेच्या वस्तूंचे आउटलेटस, सार्वजनिक वाहतूक खूप अविकसित, त्यामुळे तिच्यावर अवलुबुन रहाणे अशक्य. स्वस्त कार्स, आणि त्या साठी सहज, कमी दरावरील कर्ज, उत्तम रस्ते, त्यामुळे चारचाकी वाहन गरजेचे झाले असावे. […]

अमेरिकन गाठुडं – ३

मी पहिले पाऊल जेव्हा ऑस्टिन एअरपोर्ट बाहेर जमिनीवर टाकले, तेव्हा आपले नगरपण असेच स्वच्छ असावे असे वाटून गेले. आणि तसे ते दिसेल हि. फक्त प्रत्येकाने ते मनावर घेतले तर. आपले महामार्गहि, इथल्या इतके रुंद नसले तरीही, चांगलेच आहेत. येथील रस्त्यावर आपल्या इतके जाहिरातीचे प्रस्त दिसले नाही. रस्त्यावर केवळ दिशादर्शक, गरजेचे फलक मात्र आहेत, आणि तेही वाहन चालकाच्या नजरेच्याटप्प्यात सहज येण्याच्या उंचीवर. […]

अमेरिकन गाठुडं – २

आम्ही आमच्या नंबरची सीट हुडकून त्यावर बसलो. एका ‘हवाईसुंदरी’च्या मदतीने, हिची हातातली बॅग आणि माझी लॅपटॉपची बॅकसॅक, सीटवरील रॅक मध्ये सारून दिल्या. सीटवर पाघरायची शाल, एक चिटूर्नि उशी, आणि हेडफोनचे पाकीट होते. समोरच्या सीटच्या पाठीवर एक मॉनिटर होता. खूप ‘प्रयत्न-प्रामादा'(Trial – error साठी हा शब्द कोठेतरी वाचला होता. कसा आहे?) नंतर, या स्क्रीनने माझी पंधरा तास […]

अमेरिकन गाठुडं – १

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय हवाईअड्डा’ गाठले तेव्हा आठ वाजून गेले होते. एका गोष्टीची मला नेहमीच गंमत वाटते, विमानतळाला हवाईआड्डा का म्हणतात? ‘अड्डा ‘ म्हणला की, अंगात आडव्या काळ्या पट्ट्याचे टी शर्ट घातलेले, तोंडात सिगारेट धरून धूर सोडणारे चार-सहा गुंड एखाद्या गोदामात पत्ते खेळात बसल्याचे, दृश्य माझ्या नजरेसमोरयेते! तेव्हा ‘अड्डा’ गुंडाचा हि संकल्पना काही डोक्यातून जात नाही.   […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..