नवीन लेखन...

रेल्वे बांधणीचा परामर्श

जिद्द, नियोजन, सर्व पातळ्यांवरची तत्परता, दर्जाबाबत तडजोडीला संपूर्ण फाटा, असा तोल साधत, १८५३ सालात सुरू झालेल्या भारतीय रेल्वेनं पहिल्या, पंचवीस वर्षांत ६,५४१ मैल मार्ग पूर्ण केले. त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत, म्हणजे रेल्वेबांधणीला पन्नास वर्षं होता होता २३,६२७ मैल रेल्वेमार्ग पूर्ण करत ही संख्या जवळपास चौपटीच्या आसपास आणून ठेवली. रेल्वेला ६० वर्षं होता होता, १९१३ च्या सुमाराला व्हिक्टोरिया […]

भारतीय रेल्वे व कामगार

खालील तक्त्यात भारतीय व युरोपियन कारागारांची संख्याही दर्शवलेली आहे. वर्ष मार्गबांधणी (मैलांमध्ये) भारतीय मजुरांची संख्या युरोपियन कामगारांची संख्या १८६०     १८७९ १,६०३ (एक मैल बांधणीला १२६ मजूर लागले.) १,३८७ २,३८,७०२     १,७४,७६२ ६४१     ४६२ रेल्वेचं जाळं भारतभर सर्वत्र पसरण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेत, एकूणच रेल्वे बांधणीत ‘कामगार’ हा अतिशय महत्त्वाचा घटक होता. त्यामुळे कामगारांची […]

कथा कर्जत स्टेशनची

दहिवली या खेड्याचा आधार घेत कर्जत स्टेशनची बांधणी झाली. दहिवली, वेणगाव, तमनाथ, कडाव अशा अनेक खेड्यांना पेशव्यांनी भेटी दिल्याचाही उल्लेख आहे. १८५३ मध्ये मुंबई-ठाणे या मार्गावर सुरू झालेली रेल्वे १८६० सालापर्यंत कल्याण, बदलापूर, नेरळ, कांपोली (खोपोली) असा अडीच तासांचा रेल्वेप्रवास करीत होती. त्यावेळी मुंबई ते खोपोली तिकीट होतं २ रुपये. याच मार्गावर घाटाच्या पायथ्याशी रेल्वेमार्गांच्या बांधकामाचं सामान उतरवण्याकरता म्हणून व घाटात आवश्यक असलेला गाडी चढण्यापूर्वीचा मोठा थांबा, अशा दोन कारणांकरता कर्जतच्या अवाढव्य स्टेशनची बांधणी झाली. […]

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) : एक अप्रतिम शिल्प

बोरीबंदर स्टेशन पाहताना लंडन शहरातील सेंट पॅनक्रॉस रेल्वेस्टेशन सारखा भास होतो. ही भव्य देखणी वास्तू बांधण्यास २.६ लाख पौंड खर्च आला होता, पैकी फ्रेडरिक यांनी आपली फी रुपयांत १८ लाख इतकी स्वीकारली होती. हे स्टेशन जागतिक वास्तुशिल्पांमधील एक जागतिक वारसा (World Heritage Structure) बनून राहिलं आहे. ३६५ दिवस, २४ तास अखंड कार्यरत असणारं हे रेल्वेस्टेशन आहे आणि म्हणून ‘वारसा यादी’त त्याचं महत्त्व […]

रेल्वेस्टेशन्स – भारतीय संस्कृतीचं दर्शन

रेल्वेची भराभराट होत गेली, तसतशी रेल्वेमार्गावर स्टेशनच्या रूपात आलेली, पण एके काळची नगण्य असलेली अनेक खेडी उजेडात आली. खेड्यांची गावं झाली, गावांची शहरं, तर शहरांची महानगरं बनली. प्रत्येक स्टेशन हे त्या त्या प्रदेशाचं सांस्कृतिक केंद्र बनलं आणि ही स्टेशनं विविध व्यवसायांची केंद्रस्थानंही बनली. […]

रेल्वेस्टेशन्स आणि प्लॅटफॉर्म्सची बांधणी

विस्तार बघून आश्चर्य वाटेल असं जगातलं सर्वांत मोठं रेल्वेस्टेशन इटलीतल्या मिलान इथे आहे. १०३ एकरांच्या भल्याथोरल्या परिसरात ते पसरलेलं आहे; तर भारतातलं सर्वांत मोठ स्थानक कलकत्त्यात ८० एकर परिसरात हावडा रेल्वेस्टेशन’ नावानं बनलेलं आहे. इथे १६ ते १८ प्लॅटफॉर्म्स आहेत. या स्टेशनच्या बाहेर हातगाडी, घोडागाडी, बैलगाडी, ऑटो, टॅक्सी, लॉरी, बसेस आणि ट्राम्स इतकी विविध त-हेची वाहनं उभी असतात. स्टेशनबाहेरच्या जागेत वाहनांची इतकी विविधता एकाच ठिकाणी दृष्टीला पडणारं हे जगातलं एकमेव रेल्वेस्थानक आहे. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..