नवीन लेखन...

गझल रियाज मैफिली

एकूण या तिन्ही मान्यवरांनी मला रियाजाकडे वळविले. पण एखादी गोष्ट जोरात सुरू होण्यासाठी एखादा जोरदार धक्का लागतो. माझे वडील चिंतामण जोशी हे निवडणूक जिंकून लायन्स क्लब इंटरनॅशनलचे मुंबईचे गव्हर्नर म्हणून निवडून झाले. त्यांचा शपथविधी समारंभ अमेरिकेत होणार असल्याने ते आणि माझी आई असे दोघेही अमेरिकेला गेले. मी एकुलता एक मुलगा असल्याने संपूर्ण घर पुढील २५ दिवसांसाठी […]

एक सांगीतिक प्रवास

“मुक्काम पोस्ट १०००”  या माझ्या – ‘स्वर’ प्रवासाच्या निमित्ताने माझी पत्नी सौ प्रियांका जोशी यांनी लिहिलेली ही कविता… हे तिचं मनोगतच… […]

गझल गायनाला शुभारंभ

लवकरच रेडिओवर तीन मराठी गाणी सादर करण्याचे कॉन्ट्रॅक्ट माझ्या घरी आले आणि गाणी घेऊन मी रेडिओच्या ऑफिसमध्ये गेलो. संगीतकार भूमानंद बोगम यांची भेट झाली आणि या पूर्वी कोणत्याही कलाकाराच्या आवाजात रेकॉर्ड झालेली गाणी सादर करता येणार नाहीत असे त्यांनी सांगितले. नवीन गाणी मिळवण्यासाठी माझी धावपळ सुरू झाली आणि मला एकदम आठवण झाली संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्या […]

आनंददायी प्रवासाला प्रारंभ

गाण्याची संधी मिळावी म्हणून माझे अनेक प्रयत्न सुरू होते. त्यातलाच एक भाग म्हणून ऑल इंडिया रेडिओच्या मराठी सुगम संगीत आणि हिंदी गीत-भजन अशा दोन ऑडिशन टेस्टस् मी दिल्या होत्या. या दोन्ही परीक्षांमध्ये मी पास झालो आणि मला बी ग्रेड मिळाली. रेडिओच्या ऑफिसला गेल्यावर मला कळले की सुरूवातीला कोणत्याही कलाकाराला ‘बी’ ग्रेडच मिळते. नंतर त्याने अपग्रेडेशनसाठी पुन्हा […]

एक मोठे पारितोषिक

त्या वेळी फक्त दूरदर्शन होते. तेही जेमतेम चार तास. त्यामुळे आज दिसणारी इतर मराठी आणि हिंदी चॅनेल्स आणि त्यावर होणाऱ्या झी सारेगमप आणि इंडियन आयडॉलसारख्या संगीत स्पर्धा त्यावेळी अस्तित्वातच नव्हत्या. आज या गोष्टीचे आश्चर्य वाटेल कदाचित. पण १९८० साली ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे संगीतामध्ये पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या माझ्यासारख्या मुलामुलींना आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धा हाच पर्याय उपलब्ध होता. […]

बारावी…इंजिनिअरिंग आणि गाणे

त्याचबरोबर माझा बारावीचा अभ्यास सुरू झाला. हे वर्ष माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते. कारण या बारावीच्या मार्कांवरच इंजिनिअरींगची अॅडमिशन अवलंबून होती. शाळेत अगदी पाचवीपासून विनय देवस्थळी, सुबोध दाबके, पंकज देवल, सुभाष देसाई, नितीन थत्ते असे माझे जवळचे मित्र बनलेले होते. बारावीतही आम्ही सगळे बरोबर होतो. अभ्यास एकत्र करत होतो. कॉलेजमधील मजाही एकत्रच अनुभवत होतो. बारावीत विनायक महाजनही […]

वरदहस्त: पंडित विनायक काळे सरांचा

१९७८ साली दहावीची परीक्षा मी ८३.१४ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झालो. त्यावेळी हे मार्क खूपच चांगले होते. कारण या मार्कांवर मला कोणत्याही उत्तम कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळू शकणार होती. आमच्याच शिक्षण संस्थेचे बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी मी अॅडमिशन घेतली. मला विज्ञानापेक्षा कला शाखेची जास्त आवड होती. पण कला आणि वाणिज्य शाखेपेक्षा विज्ञान शाखेत अॅडमिशन […]

शाळेने कला जोपासली

बा ल विकास मंडळ या शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन पाचवीसाठी माझा प्रवेश डॉ. बेडेकर विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत झाला. या शाळेतच माझे गाणे, वक्तृत्व, अभिनय अशा अनेक गोष्टींना सुरुवात झाली. याचे प्रमुख कारण आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक चिटणीस सर. ते स्वतः उत्तम लेखक आहेत. त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध झाली होती. शाळेत अभ्यासाबरोबरच मुलांच्या कला […]

पहिला संस्कार

आ मच्या घराजवळच श्री घंटाळी देवीचे प्रसिद्ध मंदिर होते आणि मंदिराला लागूनच घंटाळी मैदान होते. घंटाळी मित्र मंडळ नावाची संस्था सुप्रसिद्ध कलाकारांचे कार्यक्रम या मैदानात सादर करीत असे. आज सर्वांना परिचित असलेले योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे, श्री.रेडकर आणि इतर अनेक मंडळी यात कार्यरत होती. हे कार्यक्रम सर्वांना विनामूल्य असत. या कार्यक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे सगळे कार्यक्रम अगदी वेळेत […]

बाबूजींचे आशीर्वाद

त्या नंतर काही दिवसांनी माझा आवाज फुटायला लागला. म्हणजे लहानपणी मुलगे स्त्रियांच्या पट्टीत गातात. पण नंतर मुलांची पट्टी बदलते. त्यावेळी असे होते की, कोणत्याही सुरात नीट गाता येत नाही. सगळ्या मुलांना या अवस्थेतून जावे लागते. आपल्याला बहुतेक आता गाणे गाता येणार नाही की काय अशी गोंधळलेली अवस्था निर्माण होते. यावेळी नशिबाने एक अतिशय उत्तम घटना माझ्यासाठी […]

1 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..