भारतीय-कॅनेडियन अभिनेत्री सनी लियोन

केरेन मल्होत्रा हे सनी लियोनचे खरे नाव. भारतीय वंशाची कॅनेडियन अभिनेत्री असलेल्या सनी लियोनचा जन्म कॅनडातील सर्निया शहरात झाला. भारतीय-कॅनेडियन अभिनेत्री सनी लियोन यांचा जन्म १३ मे १९८१ रोजी झाला. सनी सुरूवातीला नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. सनी लियोनही शृंगारचित्रपटातील अभिनेत्री, उद्योगपती आणि मॉडेल आहे. सनीच्या आईवडिलांनी आपल्या मुलीचे नाव कॅथलिक शाळेत घातले होते. कारण शीख परिवारात वाढल्यामुळे पब्लिक स्कुलमध्ये सनीला अडचणी येतील असा विचार तिच्या आईवडिलांनी केला होता.

सनी १५ वर्षांची असतांना तिने पहिला जॉब एका जर्मन बेकरीमध्ये केला होता. मात्र, पेंटहाऊस मॅग्झिनचा फोटोग्राफर जे एलेनला भेटण्यापूर्वी सनी लियोनने ऑरेंज काऊंटीमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. सनीने २००५ मध्ये एमटीव्ही इंडियाच्या रेड कार्पेटवर रिपोर्टरची भूमिका साकारली होती. ती २००३ मध्ये पेंटहाऊस पेट ऑफ दी इयर होती, आणि त्याचवेळी व्हिव्हिड एन्टरटेनमेंट यांच्याकटे कंत्राटी पद्धतीने काम करत होती. मॅक्झिम मासिकाने २०१० मध्ये तिला पहिल्या १२ अग्रेसर शृंगार अभिनेत्र्यांमध्ये स्थान दिले होते.

भारतात २०११ मध्ये सनी पहिल्यांदा बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या पाचव्या पर्वात टीव्हीवर झळकली होती. बॉलिवूडमध्ये तिने जिस्म-२ या सिनेमाने पदार्पण केले. त्यानंतर तिने सिनेमांत काम करायला सुरुवात केली. बालपणापासूनच सनीची यशस्वी अभिनेत्री होण्याची इच्छा होती. सनी लियोनचे स्वतःचे एका प्रॉडक्शन आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव सनलस्ट पिक्चर्स असे आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2115 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…