नवीन लेखन...

चरित्रकार सुमती देवस्थळे

आज २७ डिसेंबर आज चरित्रकार सुमती देवस्थळे यांचा जन्म २७ डिसेंबर १९२७ रोजी झाला. सुमती देवस्थळे यांची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि लालित्यपूर्ण भाषेत सर्वच चरित्रं अत्यंत लोकप्रिय झाली होती. टॉलस्टॉय एक माणूस, मॅक्झिम गॉर्की, छाया व ज्योती, एक विचारवंत (मार्क्स), अल्बर्ट श्वाइत्झर, सप्तर्षी आणि अरुंधती अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सप्तर्षी आणि अरुंधती या पुस्तकात त्यांनी आठ प्रतिभावंतांच्या चरितकथा मांडल्या. टॉलस्टॉय एक माणूस यात टॉलस्टॉयचे चरित्र लिहिताना.

विश्वशांतीचा मार्गदर्शक, अलौकिक प्रतिभासंपन्न साहित्यिक, दीन-दुबळ्यांचा कैवारी, सत्याचा उपासक, अभिनव प्रयोग करणारा शिक्षणशास्त्रज्ञ, अविरतपणे आत्मशोधनात मग्न असणारा, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा, शांतीने प्रतिकार करा असा आग्रह धरणारा टॉलस्टॉय एकीकडे दिसतो. तर दुसरीकडे ‘वॉर ऑण्ड पीस’सारखे युद्धविरोधी लिखाण लिहिलेला, मात्र तरुणपणी स्वत: आघाडीवर राहून लढलेला, गरिबांचा कळवळा असला तरी कुटुंबाचे हाल नको,या सबबीखाली जमीनदारी थाटात राहणारा, वेगवेगळ्या क्षेत्रांत शिरुनही त्यात सातत्य न टिकवणारा, संयमाचा मंत्र सांगूनही स्वत: विषयासक्त असणारा असा टॉलस्टॉय आहे असे त्यांनी दाखवून दिले.

सुमती देवस्थळे यांचे २२ जानेवारी १९८२ रोजी निधन झालं.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..