नवीन लेखन...

Standerton – साउथ आफ्रिका – Dark Side – भाग ३

वास्तविक या गावात मी केवळ २ वर्षेच राहिलो पण, तरीही साउथ आफ्रिकेचा “अर्क” बघता आला!!
मुळात, Standerton हे छोटेसे गाव, जिथे मनोरंजनाची साधने जवळपास अजिबात नाहीत, थंडीच्या मोसमात हाडे गोठवणारी थंडी, आमची कंपनी आणि नेसले कंपनीचा कारखाना ( ३ वर्षांनी हा कारखाना देखील दुसरीकडे हलवला!!) वगळता कुठलीच मोठी इंडस्ट्री नसल्याने, रोजगाराच्या संधी तशा फारच कमी. खरतर, आमची बृवरी देखील पुढे बंद केली!! थंडीवरून आठवण झाली. त्यावर्षी मी मे  महिन्यात भारतात महिन्याभराच्या रजेवर आलो होतो, तेंव्हा इथे तापमान होते – २!! मुंबईत उतरलो ते +३५ तापमानात!! मुंबईतील सगळी सुटी जवळपास उघड्या अंगाने काढली. खरा प्रॉब्लेम आला, मी परतल्यावर!! परत आलो, तेंव्हा तापमान – ६ होते!! आदल्यादिवशी +३५ तापमानातून परत – ६ मध्ये वावरणे, हि अत्यंत खडतर परीक्षा होती!! सकाळी गाडी पाण्याने धुणे,  हे दिव्य असायचे. गाडीच्या काचेवर Frost साठलेले असायचे. गरम पाणी वापरणे शक्यच नसायचे कारण गरम पाण्याने काच तडकायची भीती आणि साध्या पाण्याने गाडी धुवायची म्हणजे तपश्चर्या!!
सकाळी उठले की प्रथम बाहेर येउन, गाडीतील हीटर सुरु करावाच लागायचा अन्यथा गाडीत शिरणे अवघड!! गाडीचे स्टीयरिंग हातात पकडणे कठीण, त्यावर उपाय म्हणजे हातमोजे वापरणे!!
मला नेहमी नवल वाटायचे, अशा कडाक्याच्या थंडीत, १०० कि.मी. वरील काळ्यांची वस्ती कशी राहात असेल. माझ्या घरात, मी बेडच्या बाजूलाच हीटर लावून झोपत असे (घराच्या भिंती तशा सौम्य गरम असायच्या!!) त्यामुळे निदान घरात तरी मी निवांत असे.
वास्तविक मी इथे दोनच वर्षे होतो परंतु इथे “खरे” साउथ आफ्रिका बघायला मिळाले. अन्नान्नदशा झालेले काळे लोक, त्याचबरोबर सुखात निवांतपणे राहणारे गोरे लोक!! गमतीचा भाग असा आहे, इथे काळ्यांना भरपूर सवलती आहेत, म्हणजे शिक्षणात सवलत, आर्थिक मदत अशा अनेक सवलतीची खैरात चालू आहे पण, मुळातच (काही अपवाद वगळता!!) काळ्यांना मेहनत (बौद्धिक) करायची इछाच नसते. जितके सहज, फुकट मिळेल, ते ओरबाडून घ्यायचे, हीच वृत्ती!!
मागील लेखात मी म्हटले त्याप्रमाणे, अंतर्भागातील साउथ आफ्रिका आणि शहरातील साउथ आफ्रिका, यात जमीन-आसमान इतके अंतर आहे, हेच खरे. माझ्या या  कंपनीत, बृवरीमध्ये, कामगार बहुतांशी काळे (स्वस्तात – पगाराच्या दृष्टीने) होते. बृवरी आणि ऑफिस एकाच कंपाउंडमध्ये असल्याने, मला बृवरीमध्ये जाणे तसे सोयीचे होते. तसेच इथला सेल्स विभाग काळे लोकच बघायचे!! (उघड आहे, अंतर्भागात बियर विकायला कोण जाणार??) सगळा व्यवहार Cash मध्ये असल्याने, Cash Collection, ही रोजची डोकेदुखी असायची!! एक सुंदर उदाहरण देतो, आमची बृवरी २४ तास चालू असायची (असायची असे म्हटले कारण मी सोडल्यानंतर इथली बृवरी ६ महिन्यात बंद पडली!!) त्यामुळे, सकाळी मला तिथे दररोज २ तास घालवायला लागत असत, म्हणजे आदल्या दिवसाचा Production Report आणि Sales Report याचा ताळमेळ घालणे आवश्यक असायचे. वास्तविक, माझा Production Manager या कामासाठी नेमला होता, परंतु दिलेले काम व्यवस्थित केले तर तो “काळा” कसला!! माझ्या २ वर्षांच्या कारकिर्दीत, १ दिवस असा निघाला नाही, ज्या दिवशी वितंडवाद झाला नाही!!
Production आणि Stock यांचे Reconciliation करणे, हा माझ्या कामाचा प्रमुख भाग ठरला!! बरे, हे काळे बहुतांशी आफ्रिकान्स भाषेत बोलणार म्हणजे अनिलची दांडी गुल!! त्यामुळे, हातातील Reports, हाच माझा Control!! त्यातून, सकाळसकाळी तोंडाला दारूचा वास!! डोके उठून जायचे!! इथे एक गमतीचा भाग असा आहे (ज्यामागचे कारण आजही मला समजलेले नाही!!) इथले लोक, (बहुतेक सगळेच) रात्री झोपायच्या आधी आंघोळ करतात आणि सकाळी, मग तसेच उठून कामावर येतात!! इथे मात्र एकसमानता दिसते!! आधीच तोंडाला दारूचा भपकारा, त्यातून सकाळी आंघोळ न केल्याने अंगाला घामाचा भपकारा!! मला आजही नवल वाटते, मी इथे बऱ्याच लोकांना याबाबत विचारले होते पण कुणीही समाधानकारक उत्तर दिले नाही. थंडीत, आंघोळ न करणे समजण्यासारखे आहे, कारण अंगाला “घाम” येणे दुरापास्त!! पण, विशेषत: डिसेंबर-जानेवारीत उन्हाळा डोक्यावर असताना, तीच “प्रथा” पाळायची!!
असो, सकाळी बृवरीत, कुठलाही “काळा” मन लाऊन काम करत असेल तर शपथ!! रिक्सन हा माझा Production Manager होता. स्वभावाने तसा मवाळ पण पक्का कामचुकार!! त्यातून, Raw Material परस्पर बाहेरच विकायचा धंदा, सर्रास चालू असायचा!! एकाअर्थी त्यांना दोष देण्यात तसा फारसा अर्थ नाही. पगारच इतका कमी असायचा की महिना काढायचा म्हणजे जीवावरचे दुखणे!! पण, त्याचे त्यांना काहीही वैषम्य नसायचे. आठवड्याच्या अखेरीस चार पैसे कनवटीला लावायला मिळाले की काळे खुश!! परत, मंगळवार/बुधवार, खिसा खाली!!
मागे मी एका लेखात लिहिले त्याप्रमाणे, इथे लोकांना कितीही पगार असो, महिन्याच्या मध्यास सगळे “कंगाल”!! यात, भरभक्कम पगार घेणारे गोरे देखील आले!! स्टीवन काय किंवा स्टीफन काय, महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खंक!!
वास्तविक, स्टीफन माझा बॉस म्हणजे फायनान्स बाबत नव्हे, पण, सगळ्या बृवरीचा प्रमुख. त्याला आणि मला, टार्गेट पेक्षा जर का सेल्स जास्त झाला तर कमिशन मिळण्याची तरतूद, आमच्या पगारात असताना आणि तसे बरेचवेळा मिळत असताना देखील, १७, १८ तारखेस, समजा ड्रिंक्सचा कार्यक्रम ठरायची वेळ आली, तर शक्यतो कंपनीच्या खात्यावर खर्च टाकायचा किंवा अन्यथा तो कार्यक्रमच टाळायचा!! तरी, इथे मॉल्स वगैरे अजिबात नाहीत!! तसेच हॉटेल्स तशी फार महागडी नाहीत.
स्टीवनचे आणि माझे सूर मात्र चांगले जुळले होते, अजूनही, मी भारतात परतल्यावर देखील आहेत. तिथे मी २ ख्रिसमस सेलिब्रेट केले, दोन्ही त्याच्याच घरी. घरात भरभक्कम टर्की शिजवलेली, हातात Champagne किंवा बियरचा ग्लास, समोर तोंडात टाकण्यासाठी थोडेसे पदार्थ, बहुदा चीज आणि घरातील सिस्टीमवर अप्रतिम संगीत!! आम्ह एकत्र बसलो तेंव्हा चुकूनही ऑफिसचा विषय निघत नसे. सुदैवाने, त्याला संगीताची आवड असल्याने माझे सूर लगेच जुळले. अर्थात, आस्वादाची पद्धत वेगळी तरी देखील, अशा बऱ्याच पार्ट्या या काळात, आम्ही दोघांनी एन्जॉय केल्या.
इथे तसे मनोरंजनाचे काही साधन नसल्याने, मी इथला गोल्फ क्लब जॉईन केला होता, स्टीवननेच आग्रह करून, मला जॉईन करायला लावला. त्यानिमित्ताने, मी गोल्फचा सगळा सेट विकत घेतला होता. आयुष्यात या पूर्वी कधीही मी खेळलो नव्हतो त्यामुळे, जे स्टीवन सांगेल तसे करायचे, हे ठरविले. पहिल्याच दिवशी, त्याने, मला जोरात फटका मारायला सांगितले, त्यातून माझी क्रिकेटची आवड त्याला माहिती असल्याने, त्याने मला तसाच फटका खेळायला सांगितला. वास्तविक, शुभ्र सकाळ होती, हवेत गुलाबी गारवा होता, त्यामुळे मीदेखील फॉर्मात!! अंगात उत्साह होता आणि त्याच उत्साहात मी, बॉल मारण्यासाठी स्टिक फिरवली आणि समोर उंचावर नजर लावली, मी, मारलेला बॉल कुठेच दिसेना!! बरे, स्टिक व्यवस्थित क्रिकेटप्रमाणे फिरवलेली!! क्षणात पायाशी नजर गेली आणि तिथेच तो “पांढरा” बॉल बघून, डोळे “पांढरे” व्यायची वेळ आली होती. स्टीवनदेखील खोखो हसत होता. अर्थात, काही दिवसांनी नियम वगैरे तांत्रिक गोष्टी समजून घेतल्या आणि त्या खेळाची मजा घ्यायला सुरवात केली.
इथला गोल्फ क्लब मात्र अप्रतिम. आसमंतात हिरवळ पसरलेली आणि त्या पार्श्वभूमीवर तिथल्या पांढऱ्या स्वच्छ टेबल्सवर बियर ठेऊन, हिरवळीवर नजर स्थिर करून, विचारात गढून जाण्याचा आनंद काही अलौकिकच!! तासंतास मी इथे घालवले. कितीतरी श्रीमंत लोकांशी ओळखी झाल्या. इथली Ball Room मात्र खास विशेष आहे. इथे तुम्हाला ड्रेस कोड पाळावाच लागतो अन्यथा प्रवेश नाही. पाश्चात्य चित्रपटातून जशा पार्ट्या बघायला मिळतात, अगदी तशाच प्रकारच्या पार्ट्या इथे अनुभवत आल्या!! सुरवातीला, टिपिकल भारतीय माणसाप्रमाणे बुजून गेलो होता पण स्टीवनने मला व्यवस्थित सांभाळून घेतले, इतके कि खाऊन झाल्यावर, हातातील काटा/चमचा कशा पद्धतीने रिकाम्या प्लेटमध्ये ठेवायचा!! वगैरे अनेक गोष्टी इथे शिकायला मिळाल्या. पुढे, मी प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग शहरात नोकरीसाठी स्थलांतर केले आणि असे प्रसंग बरेचवेळा अनुभवावे लागले पण तेंव्हा माझ्यातला बुजरेपणा पूर्ण निकालात गेला होता!!
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..