नवीन लेखन...

स्पंदन

मनुष्याचे जीवन अनेकानेक परिस्थितीचे भलेमोठे जाळे बनले आहे. एका समस्येतून बाहेर पडतो न पडतो तोच दुसरी परिस्थिती सामोरी उभी राहते. त्या परिस्थिती मधलाच एक भाग आहे “संबंध”. मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. अनेकानेक संबंधामध्ये गुरफटलेला . हे जाळे जितके विस्तारावे तितके कमीच. काही वर्षांपूर्वीचा काळ थोडा वेगळा होता. गावामध्ये एखाद्याच्या घरामध्ये लग्न प्रसंग असेल तर सारे गाव त्या ख़ुशी मध्ये, आनंदामध्ये सहभागी होऊन साजरा करायचे तसेच दुःखामध्ये सुद्धा मदतीचा हात पुढे करत असे. पण आज ……… आज शैक्षणिक स्तर वाढत असला तरी मनाची नाती खूप दुरावलेली दिसून येतात. एका छताखाली आज पती-पत्नींना एकत्र राहणे सुद्धा मुश्किल. हा बदल का ?

शरीराची प्रकृती जशी खालावत चालली आहे तसेच मन ही कमजोर होत आहे. आपल्यामध्ये असलेल्या गुण व शक्तींचा ऱ्हास होत चालला आहे. सहन करणे, समजून घेणे, सामावून घेणे——- ह्यांची कमी आज जाणवून येते. व्यक्ती पहिले आपल्या संबंधांना महत्व दयायचा त्या साठी काहीही करण्याची मनामध्ये ताकद असायची पण आज भौतिक वस्तू,पद, धन,——- ह्यांचे महत्व वाढत चालले आहे.

थॉमस एडीसन ज्यांनी बल्ब चा शोध लावला. त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो कि खुप प्रयत्नं करून जेंव्हा बल्ब तयार होतो व तो परिक्षणासाठी जाणार होता व जो व्यक्ती, त्याच्या हातून तो काही कारणाने फुटला. त्यावेळी एडीसन ह्यांनी कोणतीही वाईट प्रतिक्रिया न देता त्या गोष्टीला let go केले. दुसऱ्या वेळी पुन्हा जेव्हा तो बल्ब परिक्षणासाठी घेऊन जायचा होता तेव्हा त्यांच्या आसपास असणाऱ्यांनी विशेष त्या व्यक्तींचा हातात न देण्याचा सल्ला एडीसन ह्यांना दिला. तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले कि ‘बल्ब तुटला फुटला तरी मला चालेल पण त्यांचे मन तुटलेले मला चालणार नाही.’ सांगण्याचे तात्पर्य हे कि संबंधांमध्ये विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे.

विश्वासाच्या आधारावर वाईट वृत्ती किंवा सवयी असलेल्या मनुष्यांमध्ये सुद्धा खूप मोठा बदल आपण घडवून आणू शकतो. विश्वासाच्या पाठीमागे आपली शुभभावना, श्रेष्ठ वृत्तीची साथ जर एखाद्या व्यक्तीला मिळत असेल तर हा खूप मोठा सहयोग आपण त्याला देत आहोत. कितीतरी वेळा आपण बघतो माणूस विविध मुखवटे घालून कार्य करतो ज्या मुळे त्यांची खरी ओळख, खरा स्वभाव समजण्यासाठी खूप वर्षाचा कालावधी द्यायला लागतो. अशावेळी स्वतःचीच खरी ओळख काय हे त्यालाच समजत नाही. मी असा का ? हे थोडं थांबून स्वतः ला विचारण्याची नितांत गरज आहे. आपले विचार हे शब्दांपेक्षा ही गतिशील आहेत. काहीहि न बोलता ही आपले विचार एखाद्या व्यक्तिपर्यंत पोहोचतात. मग ती व्यक्ति जगाच्या कुठल्या ही कानाकोपऱ्यात का न असावी. जी आपली भावना आहे तीच भावना त्या व्यक्तीच्या मनात पेरली जाते. मग ती प्रेमाची असो व द्वेषाची.

एक राजा होता. त्याचा मित्र लाकडाचा व्यापारी होता. एक दिवस मित्र लाकडांचा किती साठा आहे हे पाहण्यासाठी आपल्या वखारीत जातो. चंदनाच्या लाकडांकडे बघून त्याच्या मनात प्रश्न उदभवतो कि हा साठा कसा संपेल. उत्तर येतं कि एखादा खूप मोठा व्यक्ती जर मेला तरंच ह्या लाकडांचा उपयोग होऊ शकेल. राजा (त्याचा मित्र) जर तोच वारला तर——- मनामध्ये ह्या विचारांचे वारे वाहू लागतात. एकीकडे हे सुद्धा जाणवते कि मी असा विचार कसा करू शकतो ? जेव्हा कधी त्या दोघांची भेट होत असे, मित्राच्या मनात राजाच्या मरणाचे विचार सुरु व्हायचे. तिथे राजाला सुद्धा विचार यायला लागले कि ‘ माझा मित्र इतका पैसा कोणासाठी व का कमावतोय ?’ त्याला तर कोणी वारिस नाही. ह्याचा मृत्यू झाला तर ह्याची कमाई माझ्या खजान्यात जमा होईल. ह्याचा मृत्यू कसा होईल ?’ दोघांच्या मनात एकमेकांच्या मृत्युबद्दलचे विचार सुरु होतात.

एक दिवस दोघ भेटतात तेव्हा न राहवून मित्र आपल्या मनातले भाव राजासमोर ठेवतो. त्याची माफी ही मागतो. राजा सर्व ऐकल्यानंतर मित्राची सुद्धा माफी मागतो. दोघं ही आपल्या मनातले भाव प्रकट करून त्यावर सुंदर योजना बनवतात. लोभापाई आपल्या जीवलग मित्राचा मृत्यू व्हावा ही भावना त्यांना लाजीरवाणी करते. राजा सांगतो कि मी तुझ्या लाकडांना विकत घेऊन मंदिर बनवतो व तुला त्याचे भरगोस पैसे देतो. ह्यावर मित्र म्हणतो कि ‘राजा , हे पैसे मला देण्याऐवजी मंदिराची आरास तसेच मूर्तीच्या स्थापनेमध्येच ते लावावे.’ अशा पद्धतीने दोघांनी आपली भावना शुद्ध करून मंदिर बनवण्याची हामी भरली.

सारांश असा कि मनामध्ये चालणारे प्रत्येक शुभाशुभ विचार व्यक्तिपर्यंत पोहोचतात. त्याची प्रतिक्रिया समोरून त्याच पद्धतीने होते. म्हणून शब्दांवर जसे आपले लक्ष असते तसेच विचारांवर सुद्धा लक्ष ठेवावे. जर नकारात्मक भावना पोहोचू शकतात तर शुभभावनांचा ही परिणाम होऊ शकतो. शुभ भावनांनी तुटलेली नाती परत जोडू शकतो. अविश्वासाचे रूपांतर विश्वासामध्ये करू शकतो. फक्त हे सर्व करण्यासाठी मनाची तयारी आणि दृढ संकल्प करण्याची आवश्यकता आहे. वस्तू, पदार्थ, धन——- ह्यांच्यापेक्षा मला हे नातं महत्वाचे आहे हे स्वतःला पटवून देण्याची आवश्यकता आहे.

आज जीवनात कोणताही बदलाव आणायचा असेल तर मनुष्य पहिला प्रश्न विचारतो ‘मीच का ?’ परिवर्तनाची अपेक्षा नेहमी दुसऱ्यांकडून केली जाते. पण ‘ स्वपरिवर्तनानेच विश्व परिवर्तन होते. हे आपण लक्षात ठेवावे. बुद्धीजीवी मनुष्य जेव्हा एखादे कार्य बुद्धीच्या स्तरावर करतो तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या बुद्धीवर होतो. पण तीच गोष्ट जर हृदयाच्या स्तरावर केली तर दुसऱ्यांच्या हृदयाला स्पर्श होतो. म्हणून सांगितले जाते. ‘ कोणते ही कार्य करा पण मनापासून करा.’ मग ती प्रार्थना असो, जेवण असो किंवा अभ्यास असो. त्याचे फळ नक्कीच आपल्याला मिळते.

एखादा व्यक्ती आजारी असेल किंवा कोणत्याही कठीण परिस्थितींचा सामना करत असेल तर आपण म्हणतो ‘ देवाकडे मनापासून प्रार्थना कर, सगळे ठीक होईल ’ ही प्रार्थना म्हणजेच विचारांचे स्पंदन. जेव्हा कोणी व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे मित्र-संबंधी त्याच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून काही वेळ त्याच्या आसपास उभे राहतात, ही त्याच्यासाठी केलेली शांतीची प्रार्थना म्हणजे सुद्धा विचारांचे स्पंदन होय. विचारांमध्ये भरलेली वेगवेगळी भावना मग ती प्रेमाची, शांतीची, द्वेषाची, घृणेची ——- असो ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. काही संतांनी, धर्मगुरूंनी आपल्या ह्याच विचारांच्या स्पंदनाची शक्तीचा वापर दुसऱ्यांचे दुःख, त्रास नष्ट करण्यासाठी केला. संकल्पाचे बळ सत्कारणी लावले. आपल्याकडे सुद्धा ते बळ आहे. पण कदाचित आपले त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. जसे मृगाकडे कस्तुरीची सुगंध आहे पण त्याला त्याची जाणीवच नाही तसेच आपल्या संकल्पांमध्ये खूप शक्ती आहे, पण त्याची जागृती नाही.

आजपासून आपण प्रत्येक विचारांचे महत्व समजून त्याचा उपयोग स्वतःसाठी म्हणजेच आपले शरीर निरोगी राहावे, संबंध सुमधुर राहावे, जीवनामध्ये सुख-समृद्धी रहावी ——– ह्या साठी करू या आणि त्याच बरोबर दुसऱ्यांचे स्वास्थ्य तसेच संपूर्ण जीवन सुखी-समाधानी रहावे या साठी याचना करू या.

Bk neetaa

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 9 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..