स्मृति

जीवनाचा प्रवाह हा    भरला आहे घटनांनीं

विसरुनी जातो  काहीं    काहीं राहती आठवणी  ।।१।।

बिजे ज्यांची खोलवर    रुतुनी जाई त्या घटना

देह आणि मनावर    बिंबवूनी जाई भावना  ।।२।।

काळाचा असे  महिमा    आच्छादन टाकी त्यावरती

परि काहीं काळासाठी    विसरुनी जातात स्मृति  ।।३।।

प्रसंगी त्या अवचित    जागृत होती आठवणी

पुनरपि यत्न होतो    जाण्यासाठीं त्या  विसरुनी  ।।४।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1581 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…