नवीन लेखन...

स्मार्टफोन – नक्कीच एक वरदान

आज घरी असाच एक विषय निघाला होता “स्मार्टफोन वरदान कि शाप” त्यामुळे हा लेख लिहिण्याचा लहानसा प्रयत्न


आई – अरे तुला किती वेळा सांगितले की मला दुकानातून वस्तू आणून दे म्हणून पण तुला त्या मोबाईल पुढं काही सुचत नाही..

बायको – आहो तो फोन पहिला खाली ठेवा बरं, मी काय म्हणते त्याच्या कडे लक्षच देत नाहीत..

मुलगा – अगं आई मी सगळी कामे करतो फक्त ही गेम पूर्ण होउदे.

नवरा – अगं आज चहा मिळणार आहे की नाही?? सारखी मैत्रिणीसोबत बोलत असतेस..

काय मग मंडळी, हेच चालू असते ना तुमच्या घरात? तुमच्याच काय आमच्या घरात सुद्धा.. आजचा हा विषय आपल्यासाठी काही नवीन नाही. आपण सगळेच उत्तम प्रकारे जाणतो की ह्या मोबाईल मध्ये काय वाईट किंवा काय चांगले आहे ते… ह्यावर प्रत्येकाची वैयक्तिक मते असू शकतात परंतु आज मी ह्याच्या फायद्या विषयी किंवा तोट्या विषयी फार बोलणार नाहीये. आज आपण ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करूया.

खरेतर आपले जीवन हे कोणत्याही डिव्हाईस च्या शिवाय व्यतीत करणे अशक्य आहे. आता हेच बघा ना आपले शरीर हे सुद्धा एक डिव्हाईसच आहे की, ह्या डिव्हाईसला सुद्धा मरम्मत लागतेच त्यालाच आपण व्यायाम आणि उत्तम आहार असे म्हणतो. आपण कधी विचार केला का की हे आपल्याला मिळालेले शरीर चांगले की वाईट किंवा शाप की वरदान ?? नाहीं ना?? त्याला कारण पण तसेच आहे. आपल्याला महित आहे कि हे शरीर जर सुदृढ असेल तर चांगले आणि ह्या शरीराकडून जी कार्य केली जातात ती जर उत्तम असतील तर हे शरीर आपल्यासाठी नक्की वरदानच आहे..

अगदी असेच ह्या स्मार्टफोनचे आहे. ह्याचा उपयोग जर आपण चांगल्या पद्धतीने केला तर तो नक्कीच वरदान आहे. जशी आपण आपल्या शरीराची काळजी घेतो तशीच ह्या फोनची घ्यावी लागते. म्हणजे तो आपल्याला जास्त काळ साथ देतो. ह्या मोबाईल कडून आपण आपल्याला हवी ती कामे चुटकीसरशी करून घेऊ शकतो. तुम्हाला अल्लाउद्दीन आणि जीन ची गोष्ट माहीत असेलच अगदी त्याच प्रमाणे…

ह्या जादुई दिव्यावर म्हणजेच आपल्या मोबाईलवर आपण आपली बोटे घासली की तो तुमचे कोणतेही काम करायला तयार होतो त्यालाच आपण फोन अनलॉक करणे म्हणतो.. आता ह्या जीन कडून तुम्ही कशाप्रकारे कामे करून घेताय त्याच्यावर किंवा कशाप्रकारे त्याचा उपयोग करताय त्यावर अवलंबून आहे की आपला हा मोठ्या स्क्रिन चा दिवा शाप की वरदान.. त्याकाळी तो दिवा फक्त अल्लाउद्दीन कडे होता म्हणून त्याचे अप्रूप होते आता हा दिवा सर्वसामान्यांना परवडेल इतक्या कमी किंमतीत खरेदी करता येतो. ह्याचा उपयोग आपण कसा करतोय ते फार महत्वाचे आहे. अश्या ह्या स्मार्टफोनचा आपण सर्वांनी उपयोग करून घेतला पाहिजे उपभोग न्हवे.. नाहीतर आपली गरज, केव्हा आपले व्यसन होऊन जाईल ते आपल्याला कळणार सुद्धा नाही.

तर मंडळी आज आपण एकमताने नक्कीच ठरवू शकतो की आम्ही याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करू मग तो लहान मुलांनी केला काय किंवा घरातील मोठ्यांनी. असा हा जादुई दिवा वापरासंबंधित योग्य काळजी घेतली म्हणजे झाले.

— अक्षय पुंड

1 Comment on स्मार्टफोन – नक्कीच एक वरदान

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..