धावपटूंनी कामगिरी उंचावण्यासाठी आहाराची घ्यावयाची काळजी

dhavpatu-1आपणास माहिती आहेच ना कोणत्याही स्पर्धात्मक खेळात जय व पराजय ह्यातील अंतर अगदीच नगण्य असते. ….छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास महत्वाच्या मुख्य गोष्टींमधे फरक जाणवतो. ….आहाराच्या शास्त्राकडे लक्क्ष्य देणे कोणत्याही खेळात निर्णायक ठरू शकते. ….तुमच्या कामगिरीत स्पर्धात्मक आव्हाने झेलण्यास आहार शास्त्र महत्वाची भूमिका बजावते

दर वर्षी 5 मे हा जागतिक धावपटू (Athletic) दिन म्हणून साजरा केला जातो. आव्हान टिकवून धरण्यासाठी फिटनेस, स्टॅमिना आणि चांगले प्रशिक्षण धावपटूंसाठी अत्यंत महत्वाचे आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी तुमची कामगिरी खालावू शकतात. पण तुम्ही खाण्या पिण्याच्या सवयीची योग्य ती काळजी घेतल्यास तुमची कामगिरी उंचावण्यासाठी ते मोलाची मदत करतात

प्रत्येक खेळात आहाराचे/खाण्याचं एक वेगळेच तंत्र आहे आणि हे खाण्या चे तंत्र तुम्हीं व्यायाम किती काळ करता ह्या वर अवलंबून असते. जर व्यायाम हा 45 मिनीटांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला तुमच्या खाण्या पिण्याकडे लक्ष्य देणे गरजेचे असते. खेळामुळे येणारा थकवा कमी करण्यासाठी आहार आणि पाणी महत्वाची भूमिका बजावतात. जितका खुराक योग्य व चांगला तितका तुमचा परफॉर्मन्स चांगला तसेच तुमचा फिटनेस आणि skills जास्तीतजास्त उंची वर नेऊन ठेवण्यात ते मोलाची मदत करतात पण खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी तुमचा खेळ तर बिघडतोच पण तुमचा शारिरीक दुखापतीचा संभवही वाढतो, वजनावरही त्याचा परिणाम होतो. एवढेच नव्हे तर खेळामुळे गेलेली एनर्जी परत मिळवण्यातही कमतरता येते.

dhavpatu-2खेळाडूना अन्नघटकांची आणि द्रवपदार्थांची गरज ही त्याच वयाच्या इतर व्यक्तींपेक्षा जास्त असते. योग्य वेळी योग्य अन्नघटक घेणे (nutrient timing) हे अत्यंत महत्वाचे आहे ज्याचा असर तुमच्या परफॉर्मन्स वर होतो. खेळापुर्वी खेळामध्ये आणि खेळानंतर योग्य अन्नघटकांचे सेवन केल्यास तुमच्या परफॉर्मन्स ची पातळी उंचावण्यासाठी ते मोलाची मदत करतात

धावपटूंसाठी कोणकोणते अन्नघटक महत्वाचे
Fluid (द्रवपदार्थ) – शरीरातील फक्त 2% पाण्याची पातळी खालावली तर तुमचा परफॉर्मन्स 15 ते 30% पर्यंत कमी होऊ शकतो म्हणून fluids वर लक्ष द्या

एनर्जी – तुमचं वजन योग्य राखण्य एवढेच एनर्जी चे सेवन करावे. 45 मिनीटांपेक्षा व्यायाम जास्त असल्यास तुम्हाला एनर्जी व इलेकट्रोलाईट घेणे आवश्यक असते

कारबोहैड्रेट – carbohydrate = sports performance. कोणत्या प्रकारचे कारबोहैड्रेट किती प्रमाणात घ्यावयाचे हे तुमच्या व्यायामाच्या प्रकारावर, व्यायाम करण्याची वेळ, तुमचे सध्या चे वजन, आणि ते तुम्ही कोणत्या वेळी घेता ह्या वर अवलंबून असते.

फॅट – व्यायाम करताना किंवा खेळामध्ये तळकट आणि अति तेलाच्या पदार्थांचे सेवन त्रासदायक ठरू शकते ज्यामुळे तुमचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो. पण हीच फॅट तुम्ही योग्य प्रकारची, योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतली तर तुमची कामगिरी उंचावण्यासाठी ते मदतीचा हात देऊ शकतात तसेच तुमचे आरोग्य ही सुधारण्यास ही ते उपयोगी पडतील.

कॅल्शियम – मुली, तरूण स्त्री धावपटूंसाठी जास्तीच्या ट्रेनिंगमुळे मासिकपाळीसाठी आवश्यक असणाऱ्या हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे त्याचा मासिकपाळी वर परिणाम होतो, तसेच वेळेच्या आधी irreversible osteoporosis होऊ शकतो. तर पुरुष धावपटूंमध्ये testosterone ची कमतरता झाल्यामुळे osteoporosis होऊ शकतो.

लोह (iron) – अती शारीरिक व्यायामामुळे लोह ह्या खनिजाची कमतरता होऊ शकते आणि कमतकमतरतेमुळे रक्तक्षय (अनिमीया)चा धोका निर्माण होऊ शकतो

मॅग्नेशियम – मॅग्नेशियमच्या तातपुरत्या कमतरतेमुळे थकायला लवकर होण, मळमळणे, तसेच muscle cramps चा धोका वाढू शकतो तर क्राॅनीक कमतरतेमुळे रक्तक्षय आणि ओस्टीओपोरोसिसचा धोका वाढतो.

पोटॅशियम – थकवा, muscle cramps कमी करण्यासाठी मदत करतात

Selenium – रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि फ्री रेडिकल चा धोका कमी करण्यास मदत करतात

सोडियम – घामाद्वारे शरीरातील सोडियम चे प्रमाण कमी होते. रक्तातील सोडियम चे प्रमाण कमी होते ज्यामुळे muscle cramps चा धोका वाढतो. 5 तासापेक्षा जास्त व्यायाम केल्यास आणि तो उष्ण हवामानात केल्यास रक्तातील सोडियम ची पातळी खूप कमी होऊ शकते जी जीवनाला घातक ठरू शकते

Zinc – स्नायूंच्या नुतनिकरणासाठी आणि अन्नातील उर्जेचा शरीराला आवश्यक असणाऱ्या उर्जेत रुपांतरीत करण्यासाठी आवश्यक आणि कमतरतेमुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होते ज्यामुळे छोटे मोठे आजार होऊ शकतात

dhavpatu-4

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

1 Comment on धावपटूंनी कामगिरी उंचावण्यासाठी आहाराची घ्यावयाची काळजी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…