नवीन लेखन...

सितारा

एक महिन्यानंतर शबनम सुरतला परत आली होती. परन्तु तिच्यामध्ये खूप फरक पडलेला जाणवत होते. तिचे सितारा बरोबरचे वागणे देखील बदलले होते. मध्यंतरीच्या काळात ती थोडी उदास वाटायची. सिताराला खूप जपायची. तिच्याशी खूप प्रेमाने वागत होते परन्तु अलीकडे तिचे राहणीमान अगदी बदलून गेले होते सकाळी ऑफिसला लवकरच निघून जात होती. पूर्वी ती ऑफीमधून सरळच आमच्या घरी सिताराला घ्यायला येत असे आता खूप उशिरा यायला लागली होती ‘ऑफीमध्ये काम होते, ते केले तर मला ओव्हरटाईम मिळतो’ अशी कारणे देत असे.

सिताराभोवती फिरत रहाणाऱ्या तिच्या आयुष्यात कुठेतरी वादळ येत असल्याची चाहूल आम्हा उभयतांना लागली होती.

बोलता बोलता कोतवाल दमले होते. त्यांना थोडी खोकल्याची उबळ आली, सुनेने लगेच पाणी आणून दिले. आम्ही तल्लीन होऊन एखाद्या सिनेमाची कहाणी ऐकावी तसे ऐकत बसलो होतो. पुढे ऐकण्याची उत्सुकता वाढली होती. ठाकूर म्हणाले, “ काय माणसे असतात नाही, पैसा मिळाला की सगळे विसरून जातात. आपल्या बायको मुलीला ही विसरून गेला म्हणजे किती स्वार्थी माणूस असेल मिर्झा?” कोतवाल हसले आणि म्हणाले, “ मी तुम्हाला पहिल्यांदाच विचारले होते, की तुम्ही वेळ काढून आलात ना?, अजून कहाणी तर पुढेच आहे.” त्यांनी सुनेला हाक मारली आणि सांगितले की आमच्या दोघांचा स्वयंपाक कर. हे दोघे इथेच जेवण करतील. आम्ही नाही म्हणालो, परन्तु त्यांनी ऐकले नाही. “कसे आहे ना, सर मी तुम्हाला असेही सांगू शकलो असतो कि सितारा माझी मुलगी आहे, परन्तु तुमच्या मनात अनेक शंका राहिल्या असत्या आणि तुम्हालाinquiry मध्ये बरेच प्रश्न उभे राहिले असते. आणि आता हा विषय छेडला गेलाच आहे तर तो आपण पूर्णच करन टाकू.” कोतवाल हसत हसत म्हणाले. आणि त्यांनी कहाणी पुढे सुरु केली, “शबनम मधला हा फरक आमच्या लक्षात आला होता. परन्तु आपल्याला काय करायचे ह्या विचाराने आम्ही काही त्यात लक्ष घातले नाही. कसे कुणास ठाऊक पण तिच्या भावाच्या म्हणजे जावेदच्या कानावर काहीतरी कुणकुण गेली. आणि एके दिवशी अचानकच संध्याकाळी तो व त्याची बायको ‘झेलम’ मुंबईवरून सरळ अमच्याकडेच येऊन पोहचले. त्यांची सितारा खूप लाडकी होती. रमानें त्यांचे चहापाणी केले व शबनमला फोन करण्यासाठी फोन उचलला तसा जावेद पटकन बोलला, “ नाही नाही आंटी असे काही करू नका. ती येईपर्यंत आम्ही इथेच थांबतो. तुम्हाला थोडासा त्रास होईल. पण आजचा दिवस चालेल ना?”
त्याच्या बोलण्याचे रमाला थोडे आश्चर्य वाटले होते. पण तिने तसे दाखवले नव्हते. उलट अतिथी देवो भव! असा त्यांचा पाहुणचारच केला होता. रात्री आमच्या सगळ्यांची जेवणे आटोपली, सितारा तर झोपेला आली होती. शबनम रात्री खूप उशिरा आली. तिला येताना बघून जावेद व झेलम आतल्या खोलीत जाऊन लपले व आत जाताजाता रमाला म्हणाले “ तुम्ही तिला विचारा, उशीर का झाला?’ आम्ही सगळेच ह्या प्रकाराने गोधळलो. पुढे काही बोलणार तितक्यात तिने बेल वाजवली. तिला बघून सितारा तिच्याकडे धावत धावत गेली. रमानें विचारले, “ शबनम, फारच उशीर झाला का गं? सितारा झोपेला आली आहे”.
“हो आंटी आज ऑफिसमध्ये खुप काम होते आणि नंतर एका मैत्रिणीकडे पण थोडे काम होते म्हणून तिच्या घरी गेले होते.” शबनम अजून बोलतच होती तेवढ्यात सिताराने मामाला हक मारली, “मामाजी मम्मी आली.” तशी शबनम एकदम बिचकली. जावेद व झेलम बॅग घेऊन बाहेर आले व तिला म्हणाले, “घरी चल” शबनम एकदम कावरीबावरी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव अगदी स्पष्ट दिसत होते. आजही मला तिचा तो चेहरा आठवतोय. ते सगळे घरी गेले. त्यानंतर दोन दिवस सितारा आमच्याकडे आली नव्हती. त्यांच्या घरी काहीतरी वाद झाले असतील हे तर नक्कीच होते. परंतु आम्ही विचार केला होता की मामा मामी आले आहेत, त्यामुळे सितारा आली नसेल. ह्या जावेदने मिर्झा त्यांना सोडून गेल्यानंतर सिताराला खूप जीव लावला होता. त्यामुळे मामा दिसला की सितारा खुश होत असे. आम्ही आपला तसाच विचार केला. तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जावेद व झेलम सिताराला घेऊन आमच्याकडे आले. आम्हाला काही कळेना हा काय प्रकार आहे? जावेद खुप निराश दिसत होता आणि झेलम एकदम गप्प होती. सितारा येऊन रमाच्या मांडीवर बसली, ति तर झोपेतच होती. काहीतरी गंभीर प्रकार आहे हे आमच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. जावेधी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याच्या तोंडून शब्द निघत नव्हता. झेलम तर रडायलाच लागली. शेवटी जावेद रडवेला होऊन म्हणाला, “ कोतवाल साहेब, माझ्या बहिणीचे डोके फिरले आहे. तिला तिचा boss इब्राहीम बरोबर निकाह करायचा आहे. हा इब्राहीम आमची आई गेली तेंव्हा मुंबईला आम्हाला भेटायला आला होता. नंतर ऑफिसचे काम आहे म्हणून १५ दिवस मुंबईतच होता. तेंवा ही शबनम सारखी विचारणे शक्य झाले नव्हते. ३-४ दिवसांपूर्वी इब्राहिमच्या बायकोचा फोन आला होता. म्हणून आम्ही तिला घेऊन जायला आलो होतो. पण ति काही ऐकायला तयार नाही. इब्राहीम वयाने कितीतरी मोठा आहे शिवाय त्याला तीन मुले आहेत. तिला दोन दिवस खूप समजविण्याचा प्रयत्न केला. ह्या सिताराचे काय होईल ह्याचाही ति विचार करत नाही. म्हणते, मी तिला बरोबर घेऊन जैन. कसे शक्य आहे हो? राशीद तर ह्यांना सोडून गेलाच आहे आता ही पण.” त्याला हुंदका आवरणे अनावर झाले होते. झेलम म्हणाली, “आंटी, आम्ही दोघांनी रात्रभर खूप विचार केला आणि शेवटी सिताराला अम्च्यब्रोब्र घेऊन जायचे अक्की केले. माझ्या दोन मुलांबरोबर ति मोठी होईल. बस तुम्हाला सांगायलाच आलो आहे.”

ऐकून आम्हाला खुप वाईट वाटले. सितारा आता आपल्या कडे यणार नाही ह्या विचाराने आम्ही खूप दुःखी झालो होतो. पण आमचा नाईलाज होता. छोटी सितारा रमाच्या मांडीवर बसून सगळे ऐकत होती. तिचा लाडका मामा रडत होता हे भेदरलेल्या नजरेने बघत होती. काहीतरी विचित्र घडत आहे हे तो छोटा जीव समजला होता. मामीने उचलून घेतले व आम्हास टाटा करायला सांगितले तर तिने रमाला घट्ट धरून रडायला सुरवात केली. ते बघून रमा देखील रडायला लागली होती. माझ्याजवळ बसलेला अशोक ही भेदरल्यासारखा झाला होता. शेवटी कसेबसे समजावून मामासोबत रवाना केली. तो दिवस खूप भयंकर होता.” कोतवाल थोडा वेळ गप्प बसले आणि परत त्यांनी सांगायला सुरवात केली, “ एखाद्या लहान मुलाला कोणीतरी रस्त्यात टाकून दिले किंवा देवळाच्या दारात सोडून निघून गेले, हे आपण पेपरात वाचत असतो. आपण एक ‘बातमी’ ह्या नात्याने त्याकाडे फरसे लक्षही देत नाही. परंतु त्या दिवशी आईबाप जिवंत असताना आपल्या मुलाला स्वतःच्या स्वार्थासाठी कसे पोरके करतात हे पहिले. आणि मुल पोरके होणे किती भयंकर प्रकार असतो हे समजलो होतो. मला आजही आठवतय त्या दिवशी मी ऑफिसला गेलो नव्हतो. रमा तर दिवसभर रडत होती. अशोकलाही आम्ही शाळेत पाठविला नव्हता. माझे वडील होते तेंव्हा, त्यांनी त्या दिवशी कुठलाही श्लोक न म्हणता गुपचूप देवाची पूजा केली होती. आम्ही कोणीही दिवसभर धड जेवलो नव्हतो. शबनमच्या वागण्याने फार बेचैन झालो होतो. आमची लाडकी सितारा, आईबापा विना पोरकी झाली होती. आणि आम्ही फक्त बघत राहिलो होतो. त्या आईनेही आपल्या मुलीच्या भवितव्याचा विचार केला नव्हता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..