नवीन लेखन...

सितारा

दुसऱ्या दिवशी सितारा शाळेत गेल्यानंतर आम्ही तिच्या घराच्या पत्त्यावर पोहचलो. शाळेपासून थोडे दूरच एका बंगलावजा सोसायटीत हे घर होते. छोटासा दोन मजली टुमदार बंगला होता. बाहेर छोटासा बगीचा होता. सोसायटी मध्यमवर्गीय लोकांचीच दिसत होती. काही पण पूर्वसूचना न देता कोणाच्या तरी घरी जाणे हे मनाला पटत नव्हते. परन्तु आमचा नाईलाज होता.

आम्ही दारावरची बेल वाजवली. साधारणपणे तिशीतील एका तरुणाने दरवाजा उघडला. आम्हां अनोळखी माणसांना बघून तो जरा आश्चर्य चकितच झाल्यासारखा दिसला. “कोण पाहिजे” त्याने विचारले.

“कोतवालांचे घर हेच का? आम्हाला कोतवालांना भेटायचे आहे” ठाकूर म्हणाले. “हे कोतवालांचेच घर आहे. आपल्याला कोणते कोतवाल हवे आहेत?” त्याने विचारले. काय उत्तर द्यावे हे एकदम सुचले नाही. परन्तु आम्ही त्याला आमची ओळख दिली व आम्हाला सितारा मिर्झा च्या संदर्भात बोलायचे आहे असे सांगितले. तसे त्याने आम्हाला आत बोलावले या बैठकीच्या खोलीत बसवले. एक बाई पाणी घेऊन आल्या. त्या तरूणाने, “मी अशोक कोतवाल व ही माझी पत्नी अरूणा कोतवाल.” अशी स्वतःची व त्या बाईंची ओळख करून दिली. पाण्याचे रिकामे glass घेऊन अरुणाताई आत गेल्या. “काय काम होते आपले? आणि आपण येणार आहात असे सितारा काही बोलली नाही” अशोक म्हणाला. “हो तिला माहिती नाही” मी बोललो. विषय कुठून सूरु करावा ते समजत नव्हते. तरीही मी बोलायला सुरवात केली, “ सितारा आमच्या शाळेतील उत्तम या कर्तव्यदक्ष शिक्षिका आहे. गेल्या दोन वर्षापासून ती मुलांवर खूप मेहनत घेत आहे. त्यामुळे आमच्या शाळेचा रिझल्टही खूप छान लागला आहे. आठ मुले इंजिनियरिंगला व दोन मुले मेडिकलला गेली आहेत. हे तुम्हाला देखील माहीतच असेल. अरे हं, तुम्ही तिचे कोण?” मी विचारले. “मी तिचा भाऊ. मी बॅंकेत नौकरी करतो. तुमचे सिताराबद्दलचे हे कौतुकास्पद शब्द ऐकून मला फार आनंद झाला. परन्तु अलीकडे शाळेतील काही शिक्षकांनी तिच्या विरुद्ध तक्रार केली आहे. त्यामुळे तिला खूप मानसिक त्रास होत आहे. आणि तुम्हाला कल्पना असेलच, तिने गेल्या पंधरा दिवसांपासून extra कोचिंग बंद केले आहे.” अशोकने सांगितले. “हो आम्हाला ह्याची कल्पना आहे. याच संदर्भात चौकशी करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आमचे मुख्याध्यापक इनामदार यांनी आम्हाला जी काही माहिती दिली त्यावरून तिला लोक जाणूनबुजून त्रास देत आहेत, ते आमच्या लक्षात आले आहे. त्यासाठी त्या लोकांवर जी काही योग्य कारवाई करणे जरुरी आहे ती आम्ही करूच. ठाकूर बोलले.

परन्तु काही लोकांनी तिच्या चारित्र्याबद्दल शंका उत्पन्न केली आहे. त्यांनी तसा लेखी अर्ज दिला आहे. त्यांनी असे लिहले आहे की हिचे नाव ‘सितारा मिर्झा’ आहे. आणि ही कोतवालांकडे रहात आहे. हे काहीतरी गौडबंगाल आहे. आणि ह्या संदर्भातील चौकशीसाठी आम्हाला तुमच्या कडून सहकार्याची अपेक्षा आहे.” मी सांगुन टाकले. तो गालातल्या गालात हसला. त्याने आळीपाळीने आमच्याकडे नजर फिरवली व म्हणाला, “ही माहिती आमच्या सोसायटीतील लोकांकडून सुद्धा मिळाली असती. काही हरकत नाही, तुम्ही आता आलाच आहात तर माझ्या वडिलांना भेटा, ते तुम्हाला सर्व सविस्तर माहिती देतील. तशी मी सुद्धा दिली असती परन्तु माझ्या ऑफिस ची वेळ झाली आहे. मी बाबांना इकडे घेऊन येतो.”
तो आत मध्ये गेला या wheel-chair वरून वडिलांना घेऊन आला. आम्ही दोघांनीही उभे राहून त्यांना नमस्कार केला. त्यांनी ही आम्हाला नमस्कार करून बसायला सांगितले. अशोकने आमची त्याच्याबरोबर ओळख करून दिली. व आम्ही कुठल्या कामासाठी आलो आहोत त्याचे थोडक्यात निवेदन केले.

प्रथम तर ते थोडे चिडले होते, “ काय वाईट समाज आहे, स्वतःला काही माहिती नसते आणि दुसऱ्याच्या अब्रुवर उठतात. हे लोक कल्पनेत देखील चांगला विचार करू शकत नाहीत. माणसाला सुखाने जगून देत नाहीत. अशा नीच लोकांना काय सांगायचे? आमचे काय नाते आहे हे मी समजावून सांगितले तरी ते समजण्याची त्यांची लायकी असायला पाहिजे ना. आहे का त्यांची तशी लायकी? सांगा ना” ते खूपच चिडले होते. काही वेळासाठी तर आम्ही दोघेही घाबरलो. अशा परिस्थितीत आणि ह्या वयात आपण त्यांना त्रास देऊ नये असे एक क्षण जाणवले. त्यांच्या मुलाने त्याच्या पाठीवर हात फिरवला व त्यांना शांत केले. ते पाच मिनिटे शांत बसले. नंतर त्यांनी आम्हाला विचारले, “ तुम्हाला काय विचारायचे आहे?हेच ना की आम्ही कोतवाल आणि ती मिर्झा हे कसे? ती आमची कोण? तिचे राहणीमान आमच्यासारखे कसे? ह्या शिवाय आणखीन काही?” आम्ही मानेने होकार दिला. त्यांनी आपल्या मुलाकडे बघितले. त्याला डोळ्यानेच सांगितले कि ते ठीक आहेत. तू ऑफिसला जा. आणि आम्हाला म्हणाले, “ मी सगळे सांगतो. वेळ घेवून आला आहात ना?” आम्ही “हो” म्हणालो.

त्यांच्या सूनबाई आम्हा सगळ्यांसाठी चहा घेऊन आल्या . तिने कोतवालांना त्यांच्या औषधाची गोळी दिली. आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. नंतर कोतवालांनी बोलायला सुरवात केली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..