नवीन लेखन...

गायिका कृष्णा कल्ले

कृष्णा कल्ले यांचा जन्म १८ डिसेंबर १९४० रोजी मुबंईत झाला. परंतु त्यांच्या वडिलांच्या नोकरीमुळे त्या कानपूरला राहू लागल्या. त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते आणि त्यांच्या आत्या तारा कल्ले या प्रथितयश गायिका होत्या. शालेय शिक्षणाबरोबर कृष्णा कल्ले यांचे संगीताचे प्राथिमक शिक्षण दरभंगा घराण्याचे रामसेवक तिवारी आणि अफझल हुसेन निझामी यांच्याकडे झाले , तर सुगम संगीताचे शिक्षण त्यांनी कानपूरच्या युसूफ मलिक यांच्याकडे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक राष्ट्रीय स्तराच्या गायनस्पर्धेमध्ये पहिले स्थान मिळवले होते.

कृष्णा कल्ले यांना १९५८ साली झालेल्या सैगल मेमोरिअलतर्फे होणाऱ्या गायनस्पर्धेत पहिले पारितोषिक आणि गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया ‘ हा मानाचा ‘ किताब मिळाला. कानपूरमध्ये शिक्षण पूर्ण करून त्या लग्नानंतर १९८५ साली मुंबईला आल्या. कानपूरमध्ये त्या आकाशवाणीवर ‘ अ ‘ श्रेणीच्या गायिका होत्या. मुंबईला आल्यावर त्या आकाशवाणीवर त्यांना परत परिक्षा द्यावी लागेल का म्ह्णून विचारायला गेल्या तेव्हा त्यावेळी संगीत विभागाचे प्रमुख श्री. यशवंत देव हे होते. त्यांना कृष्णा कल्ले यांचा आवाज खूप आवडला म्ह्णून त्यांनी त्यांच्या आवाजात एक मराठी गाणे रेकॉर्ड करून घेण्याचे ठरले. परंतु कृष्णा कल्ले यांनी त्यांना नम्रपणे सांगितले की मला मराठीमध्ये गाता येत नाही , हिंदीत गाता येते. परंतु यशवंत देव यांनी त्यांच्याकडून मराठी गाणे गाउनच घेतले . आकाशवाणीसाठी त्यांचे पाहिले गाणे गाऊन घेतले ते गाणे पुढे खूप गाजले , ते गाणे होते ‘ मन पिसाट माझे अडले रे ‘ पुढे एच .एम .व्ही. ने तीन गाण्याची रेकॉर्ड काढली त्यातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली. त्यामध्ये वंदना विटणकर यांचे ‘ परिकथेतील राजकुमारा ‘ हे गीत संगीतकार अनिल मोहिले यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून गाऊन घेतले. ह्या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली आणि संगीतकार अनिल मोहिले यांना संगीतकार म्ह्णून मान्यता मिळाली.

पुढे संगीतकार दत्ता डावजेकर यांनी कृष्णा कल्ले यांच्याकडून ‘ पडछाया ‘ चित्रपटासाठी ‘ उठ शंकरा सोड समाधी ..’ हे शास्त्रीय बैठक असलेले गाणे गाऊन घेतले.तर श्रीनिवास खळे यांनी ‘ मैना राणी चतुर शहाणी ‘ सारखी अनेक गाणी गाऊ लागली. मराठी त्यांचे मातृभाषा नसतानाही अनेक मराठी गाणी गाणाऱ्या म्ह्णून त्या प्रसिद्ध झाल्या. कल्ले यांची मराठीमधील ‘ पुनवेचा चंद्रमा आला घरी , चादाची किरण दर्यावरी , हे मंगळसूत्र या चित्रपटातील गाणे खूपच गाजले. त्याचप्रमाणे केला इशारा जाता जाता , एक गायब बारा भानगडी या चित्रपटातील त्यांच्या लावण्या गाजल्या. त्याचप्रमाणे त्यांचे गोडगोजिरी लाज लाजरी आणि कामापुरता मामा ही गाणी खूप गाजली .

१० ते १२ वर्षात कृष्णा कल्ले यांनी सुमारे ५०० गाणी गायली , महंमद रफी , महेंद्रकपूर यांच्याबरोबर खूप गाणी गायली , त्यांची शिकार, बंदिश अशा अनेक हिंदी चित्रपटातील गाणी रसिकांच्या स्मरणात आहेत.

त्यांचे लग्न मनोहर राय यांच्याशी झाले होते. त्यांच्या पतीचे निधन झाल्यावर त्या एकाकी झाल्या .कृष्णा कल्ले याचा चित्रपटसृष्टीतील राजकारणात बळी गेला कारण त्यांना गाणी मिळू नये अशी परिस्थिती निर्माण होत गेली. आयुष्यात आलेल्या अडचणी आणि एकटेपण, तसेच संगीतक्षेत्रात आलेले दारुण अनुभव यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीतुन निवृत्त व्हावे लागले. साधरणतः दुर्देवाने त्या कालखंडात अनेक गायिकांना असे भोग भोगावे लागले याचे कारण माहीत असूनदेखील कुणी काही करू शकत नव्हते असेच म्हणावे लागेल.

१९९० मध्ये त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी १९९२ पासून कार्यक्रम बंद केले

ठाण्यामध्ये त्यांचे निधन होण्याआधी काही महिन्यापूर्वी त्या गडकरी रंगायतनमध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांना भेटता आले.

कृष्णा कल्ले यांना नुकतेच २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.

ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांना पक्षाघाताचा झटका आला होता . त्यांना बरेही वाटले होते परंतु १५ मार्च २०१५ रोजी अंधेरी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 436 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..