नवीन लेखन...

ताप आणि त्यावर सोपे उपाय

वेगवेगळ्या प्रकारच्या तापांवर सोपे सोपे उपाय वाचा… 

साधा ताप

1. दोन कप पाण्यात एक चमचा जिरे टाकून उकळावे. पाणी उकळ्यावर त्यात बारीक केलेले अद्रक आणि तुळशीचे पान टाकावे. हे टाकल्याने किटाणू नष्ट होण्यास मदत होते. पाणी गार झाल्यावर ते गाळून घ्यावे आणि प्यावे.

2. कांद्याचा रस हातापायाला/अंगाला चोळावा. ५ वर्षाखालील मुलांवर मात्र विचार करून हा प्रयोग करावा. कांद्याचा रस लावायचा असल्यास अल्प प्रमाणात प्रथम लावावा कारण sensitive skin absorbs the juice faster and could give immediate results. So अंग लगेच थंड होऊ शकते.

3. तापमान नैसर्गिक रीतीने कमी करण्यासाठी डोक्‍यावर, पोटावर, छातीवर साध्या पाण्यात भिजवलेली पट्टी ठेवावी. ही पट्टी तेवढ्या भागातली उष्णता शोषून घेते. तेवढ्या भागाचे तापमान कमी झाले की मग शरीरातील अन्य भागातील उष्णता रक्ताद्वारे त्या भागात पोचते, ती पुन्हा पट्टी शोषून घेते. हे करताना पट्टी सतत बदलत ठेवावी. म्हणजे पुन्हा पुन्हा पाण्यात भिजवून ठेवत राहावी. किंवा ओल्या फडक्‍याने संपूर्ण अंग सतत पुसून काढावे.

4. तापामध्ये घाम येईल असे पाहावे. घामाचे बाष्पीभवन झाल्यास तापमान कमी होत असते.

5. शरीरातील पाण्याची पातळी (हायड्रेशन) चांगली राहील याकडे लक्ष पुरवावं. अधूनमधून थोडं थोडं पाणी पीत राहावं.

मलेरिया ताप

1. मलेरियाच्या मौसम मध्ये रोज ४ तुळशीची पाने व मिर्या वाटून खाल्याने मलेरिया पासून बचाव होतो.

2. भाजलेल्या तुरटीच्या चूर्णात चार पात दळलेली साखर चांगली मिसळावी. २ ग्राम चूर्ण २- २ तासाने पाण्याबरोबर तीन वेळ घ्यावे.मलेरिया चे हे रामबाण इलाज आहे.

टायफॉईड

1. आहारामध्ये साखर कमीत कमी घ्यावी.

2. टायफॉईडमध्ये फळे सालासकट खाण्यापेक्षा फक्त फळांचा रस घ्यावा. विशेषता: गोड डाळिंबाचा रस, सफरचंदाचा रस अतिशय उपयोगी आहे.

3. घन आहार घेण्यापेक्षा जुन्या तांदळाच्या भाताची पेज, खिमटी, खिरी असा आहार घ्यावा.

4. पालेभाज्या किंवा फळभाज्या खाण्यापेक्षा त्यांचे सूप घ्यावे. या हलक्या आहारांमुळे आतड्यांना ताण न येता पोषणही व्यवस्थित होते.

5. टायफॉईडच्या तापामध्ये चहा, कॉफी घेण्यापेक्षा आवळा सरबत, लिंबू सरबत, कोकम सरबत घ्यावे हे तीनही सरबत मरगळ, अशक्तपणा दूर करून तरतरी आणतात. शिवाय आतड्यांची सूज, आतड्यांमधील जखमा ब-या करण्यासाठी यांचा उपयोग होतो.

6. साळीच्या लाह्या पाण्यामध्ये भिजवून ते पाणी घ्यावे हे साळीच्या लाह्यांचे पाणी पचण्यास अतिशय सुलभ असून लगेच शक्ती प्राप्त करून देते.

7. दुपारी ताजे गोडसर तक व त्यात जिरेपूड, कोथिंबीर घालून प्यावे. ताजे गोडसर ताक हे आतड्यांचे अमृत आहे.

(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवरुन साभार)

Avatar
About सुषमा मोहिते 34 Articles
सुषमा मोहिते या आरोग्यविषयक लेखन करतात. त्या “आरोग्यदूत” या WhatsApp ग्रुपच्या Admin पदाचीही जबाबदारी सांभाळतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..