पातालं यस्य नालं वलयमपि दिशां पत्रपंक्तीं नगेन्द्रान्
विद्वांसः केसरालीर्विदुरिह विपुलां कर्णिकां स्वर्णशैलम् ।
भूयाद्गायत्स्वयंभूमधुकरभवनं भूमयं कामदं नो
नालीकं नाभिपद्माकरभवमुरुतन्नागशय्यस्य शौरेः ॥२४॥
भगवंताच्या नाभीचे अति दिव्य स्वरूप वर्णन केल्यानंतर त्यातून उत्पन्न झालेल्या या अनंत कोटी ब्रह्मांडाची प्रथम निर्मिती असणाऱ्या, निर्मितीचे कार्य करणाऱ्या ब्रह्मदेवांचे ही उत्पत्ती स्थान असणाऱ्या कमळाचे सकल ब्रम्हांड व्यापी वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात करीत आहेत.
ते म्हणतात,
पातालं यस्य नालं – सर्व चवदा भुवनांची पैकी सगळ्यात खालचा असलेला पातळ हेच ज्याचे देठ आहे.
वलयमपि दिशां – सगळ्या दिशा हेच ज्याचे पसरलेली स्वरूप आहे.
पत्रपंक्तीं नगेन्द्रान् – हिमालयासमान महान पर्वतराज त्याच्या पाकळ्या आहेत.
विद्वांसः केसरालीर्विदुरिह विपुलां – या ब्रम्हांडातील असंख्य विद्वान हेच ज्याच्या वरील केसर आहेत. त्यांच्यामुळे ज्याचा सुगंध पसरतो.
कर्णिकां स्वर्णशैलम् – सुवर्ण मंडित मेरू पर्वत ज्या च्या आत मध्ये असणारी कर्णिका आहे.
कमळाच्या आत असणाऱ्या पिवळ्या टपोऱ्या भागाला कर्णिका असे म्हणतात.
भूयाद्गायत्स्वयंभूमधुकरभवनं – भगवान ब्रह्मदेव रूपी भुंग्याचे जे निवासस्थान आहे .
भूमयं कामदं नो – ते आम्हाला परिपूर्ण इच्छित प्रदान करो.
नालीकं नाभिपद्माकरभवमुरुतन्नागशय्यस्य शौरेः – शेषावर शयन करणार्या, शूरसेनाच्या वंशात श्रीकृष्ण रूपात अवतार घेतल्यामुळे शौरी नाम असणाऱ्या श्रीविष्णूच्या नाभीतून निघालेले ते कमळ.
आमचे कल्याण करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply