नवीन लेखन...

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २

अनाद्यंतमाद्यं परं तत्त्वमर्थं
चिदाकारमेकं तुरीयं त्वमेयम् |
हरिब्रह्ममृग्यं परब्रह्मरूपं
मनोवागतीतं महःशैवमीडे ‖ २ ‖

कैलासनाथ भगवान शंकरांच्या या नितांत रमणीय स्तोत्रात त्यांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
अनाद्यंतम्- जे अनादि तत्त्व आहे. जे अनंत आहे. अर्थात ना ज्यांना आदी आहे ना अंत आहे. जे आहेतच आहेत. परम सनातन शाश्वत आहेत.
आद्यं – जे अनंत कोटी ब्रह्मांडाचे प्रथम तत्व आहेत. आदि तत्व आहेत.
परं तत्त्वम् – जे सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे. अंतिम सत्ता आहेत.
अर्थं- जे खऱ्या अर्थाने प्राप्त करावी अशा प्रकारचे तत्व आहे. मिळवण्याचे अंतिम स्थान आहे. जीवाने शरण जाण्याचे परमश्रेष्ठ स्थान आहेत.
चिदाकारम्- ज्यांचे स्वरूप म्हणजेच काही चैतन्याचे प्रगटीकरण आहे. निर्गुण निराकार चैतन्याचा सगुण साकार अविष्कार आहेत.
एकं – ज्यांच्या समान अन्य कोणीही नाही. एकमेवाद्वितीय. अतुलनीय.
तुरीयं – तीन गुणांच्या अतीत असणारी चौथी समाधी अवस्था असणारे. सदैव त्याच अवस्थेत स्थिर असणारे.
त्वमेयम् -मेय म्हणजे मोजमाप. अमेय म्हणजे याचे मोजमाप करताच येत नाही असे. अपरंपार. अमर्याद.
हरिब्रह्ममृग्यं- हरी म्हणजे भगवान विष्णू आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव यांच्याद्वारे मृग्य म्हणजे त्यांच्या स्वरूपाचा शोध घेतला जातो असे.
पुराणकथेनुसार ज्यावेळी भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट होतात त्यावेळी भगवान विष्णू कासवरूपात खाली तर भगवान ब्रह्मदेव हंसरूपात वर त्यांचा शोध घेतात. पण त्या दोघांनाही यांच्या स्वरूपाचा अंतपार लागत नाही.
परब्रह्मरूपं- परब्रह्मस्वरूप असणारे.
मनोवागतीतं- मन आणि वाइनच्या आतीत असणाऱ्या, महःशैवमीडे – भगवान शंकराची मी स्तुती करतो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड 

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 412 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..