नवीन लेखन...

शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक निनाद बेडेकर

छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे अभ्यासक अशी ख्याती होती. त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी पुणे येथे झाला. निनाद बेडेकर यांनी मॉडर्न शाळेतील शिक्षणानंतर शासकीय तंत्रनिकेतन येथून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांच्या मातोश्री या सरदार रास्ते घराण्यातील होत्या. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी महिलांचे संघटन केले होते. हाच वारसा निनाद बेडेकर यांच्याकडे आला. शिवचरित्राची गोडी लागल्याने बेडेकर इतिहास संशोधनाकडे वळाले. इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी मोडी, फार्सी, उर्दू या लिपींवर प्रभुत्व मिळविले. या लिपीमध्ये असलेल्या हस्तलिखिते आणि कागदपत्रांचे वाचन करून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. त्याचबरोबरीने बेडेकर यांनी पर्शियन, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजी या परकीय भाषा आत्मसात केल्या.

शिवचरित्र आणि १८ व्या शतकात देशभर विस्तारलेले मराठी साम्राज्य या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. राज्यातील आणि देशातील किल्ल्यांवर भ्रमंती करून शिवकालीन इतिहासामध्ये ते रममाण झाले होते. शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केले. शिवाजीमहाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी या पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यांनी लेखन केले होते. शिवरायांची व्यवस्थापकीय कौशल्ये हा विषय ते एमबीएच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये समजावून सांगत असत. लालित्यपूर्ण शैलीमध्ये ऐतिहासिक लेखन करणाऱ्या बेडेकर यांची ‘शिवभूषण’, ‘थोरलं राजं सांगून गेलं’, ‘गजकथा’, ‘हसरा इतिहास’, ‘दुर्गकथा’, ‘विजयदुर्गचे रहस्य’, ‘समरांगण’ आणि ‘झंझावात’ ही निनाद बेडेकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३५ पुस्तकांसह शेकडो लेख आणि शोधनिबंध लिहिले.

गेल्याच महिन्यात त्यांचे ‘अजरामर उद्गार’ हे अखेरचे पुस्तक प्रकाशित झाले होते. इतिहास संशोधनाच्या कार्यामध्ये रममाण होण्यासाठी त्यांनी किर्लोस्कर कमिन्समधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री रायगड स्मारक मंडळ, श्री राजगड स्मारक मंडळ, गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ या संस्थांशी संबंधित असलेले बेडेकर हे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाचे आयोजन करणाऱ्या ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ संस्थेचे अध्यक्ष होते. निनाद बेडेकर यांना शिवभूषण, दुर्ग साहित्य पुरस्कार, जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, पुराण पुरुष पुरस्कार, शिवपुण्यतिथी रायगड पुरस्कार या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

शनिवारवाडा येथील ध्वनिप्रकाश योजनेमध्ये दाखविल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बेडेकर यांनी संहितालेखन केले होते. गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती झाली होती. छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीमध्ये निनाद बेडेकर यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या. निनाद बेडेकर यांचे १० मे २०१५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4226 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..