नवीन लेखन...

शिवांबू उपचार – श्रेष्ठ उपचार

शिवांबू म्हणजे स्वमुत्र प्राशन करणे. शरीर रक्तापासून मूत्र वेगळे करून शरीराबाहेर टाकते. परंतु हे मूत्र प्राशन केल्याने शरीरातील रोग, त्रास कमी होतात असे अनुभव आहेत. मी गेले ४० वर्षे शिवांबू घेत आहे. माझे वय ७० आहे. शिवांबू घ्यायला सुरवात केल्यापासून मला डॉक्टरची औषधे घ्यावी लागली नाहीत. मी दररोज शिवांबू घेतो. हवा बदल, खाणे यातून ताप येणे, जुलाब, सर्दी, खोकला, लघवीला आग हे होतच असते. त्यावेळी  शिवांबू जास्त घेतो. सध्या माझ्या तोंडात दोनच दात शिल्लक आहेत. तरीसुद्धा सर्वकाही खातो. अगदी पिझ्झा, बर्गर, सामोसे, पंजाबी डिशेस सुद्धा खातो. नंतर शिवांबू घेतो. त्यामुळे हे पदार्थ बाधत नाहीत. मी ह्या वयातही माझे लाईफ एन्जॉय करतो. मला डायबेटीस, हार्टचा त्रास नाही. मी गेल्या ४० वर्षात बर्याच लोकांना शिवाम्बुचा सल्ला दिला. ज्यांनी केले त्या प्रत्येकाला फायदा झाला. अगदी डायबेटीस वाल्यांना सुद्धा! काहींची ऑपरेशन्स वाचली. तर काहींची जाडी कमी झाली. त्या अनुभवांचे ‘शिवांबू कसे व का घ्यायचे?’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. ते वाचून अनेक लोकांची शिवांबू घेण्याची मनाची तयारी झाली.

फायदे:

शिवांबू हे शरीरच देत असल्याने डायग्नोसिस साठी टेस्ट कराव्या लागत नाहीत.
औषधाला पैसे मोजावे लागत नाहीत किंवा कमतरताही नसते.
ह्यात आपल्याशिवाय कोणीही भेसळ करू शकत नाही.
जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आपल्या बरोबरच असते.
आपण घेतलेले कुणालाही कळत नाही अगदी लाईफ पार्टनरलासुद्धा!!

शिवांबू सुरु करताना पहिला महिनाभर शिवांबू निम्याला निम्मे पाणी घालून प्यावे.
शिवाम्बुचा सर्वसाधारण डोस वय गुणिले १० मिली असा असावा.
(२० वर्षे * १० मिली = २०० मिली = १ ग्लास/४० वर्षे * १० मिली = ४०० मिली = २ ग्लास)

अरविंद जोशी
९४२१९४८८९४

आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन

Avatar
About अरविंद जोशी 41 Articles
अरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.

5 Comments on शिवांबू उपचार – श्रेष्ठ उपचार

  1. Patients with diabetes have some sugar in their urine.Can they take shivambu?I m diabetic with 6.6 HbA1c.pl guide with quantity of shivambu and time to take..

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..