नवीन लेखन...

शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत

शिवसेनेची बुलंद आणि कणखर कडकडणारी तोफ अशी ओळख असणारे शिवसेना उपनेते, प्रवक्ते आणि खासदार अरविंद सावंत यांचा जन्म ३१ डिसेंबर १९५१ रोजी मुंबई येथे झाला.

शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासुनच अरविंद सावंत आघाडीचे शिलेदार आहेत. शिवसेना पक्ष बांधणीमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केली. वक्तृत्व, मुत्सद्देगिरी व समाजकारण यांचा त्रिवेणी संगम म्हणजे अरविंद सावंत. अरविंद सावंत यांची शिवसेनेतील ५० हून अधिक वर्षांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. १९६८ मध्ये शिवसेनेचा गटप्रमुख म्हणून त्यांनी सुरुवात केली. १९९५ मध्ये अरविंद सावंत यांनी नोकरीला रामराम ठोकून पूर्णवेळ पक्षासाठी झोकून दिलं. १९९६ मध्ये अरविंद सावंत विधानपरिषदेवर आमदारपदी निवडून आले. २०१० मध्ये अरविंद सावंत यांना शिवसेने प्रवक्ते म्हणून बढती मिळाली. २०१४ मध्ये अरविंद सावंत लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले. काँग्रेसचे तत्कालीन खासदार मिलिंद देवरा यांच्याविरोधात त्यांनी शड्डू ठोकला होता. त्यावेळी सावंत यांचा विजय कठीण मानला जात होता. परंतु देवरांचा तब्बल एक लाख वीस हजारांच्या मताधिक्क्याने पराभव करुन ते खासदारपदी निवडून आले. २०१९ मध्ये पुन्हा त्यांनी मिलिंद देवरांचा एक लाखांच्या मताधिक्क्याने पराभव केला.

मोदी 2.0 सरकारमध्ये सावंत यांना अवजड उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं. शिवसेनेच्या वाट्याचं हे एकमेव केंद्रीय मंत्रिपद होते. पहिल्या मोदी सरकारमध्येही हेच खातं शिवसेनेला मिळालं होतं. त्यावेळी अनंत गिते या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. ३० मे २०१९ रोजी मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर अरविंद सावंत यांनी अवघ्या साडेपाच महिन्यांत राजीनामा दिलेला होता. १६६ दिवस अवजड उद्योग मंत्रालयाचा भार सांभाळल्यानंतर ११ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी स्वाभिमान व पक्षनिष्ठेच्या मुल्यांना जागुन अचानक आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. “लोकसभा निवडणुकी आधी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावरील जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.” असे मनोगत त्यांनी राजीनाम्याच्या वेळी व्यक्त केले होते.

शिक्षण आणि आरोग्य सेवेपासून वंचित मुलांसाठी अरविंद सावंत यांची तळमळ आणि धडपड गत अनेक वर्ष सर्वश्रुत आहे. २५-३० वर्षांपासुन ते ठाणे जिल्ह्यातील आदिवासींसोबत दिवाळी साजरी करतात. कोकणातील शंकर महादेव विद्यालयात अनेक अमुलाग्र सुधारणा करून तेथे १९ वर्षे सातत्याने १०० टक्के निकाल आणून दाखवला. तेथील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवुन दिला. त्या शाळेतही नाशिकच्या आदिवासी मुलांना दत्तक घेऊन मोफत शिक्षण आणि वसतिगृहाची व्यवस्था केली आहे.

अगदी तरुणपणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्राथमिक शाळेतील गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित हे विषय प्रिं. वामनराव महाडिक यांच्या क्लासेसद्वारे शिवडी येथे विनामुल्य शिकवत. अरविंद सावंत यांनी २० वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवशी मोखाड्यातील ११० अंगणवाड्यांना गॅस आणि शेगड्या दिले, तेही त्याकाळी गॅस व शेगड्या मिळणे दुरापास्त असताना. नाशिकमधील पेठ, सुरगाणा असो, नंदुरबारमधील तोरणमाळ असो वा पालघर जिल्ह्यातील मोखाडा असो सावंत या तळागाळातील जनतेपर्यंत पोहचले, त्यांच्याशी संवाद साधुन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. तेथील मुलांना, परिवारांना कपडे, धान्य पुरवणे, त्यांच्या सोबत दिवाळी, आरोग्य शिबीर, मुलांना शैक्षणिक साहित्य पुरविणे हे उपक्रम कोणत्याही राजकीय लाभाचा विचार न करता केले.

या साठी नुकताच ‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंटरियन अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हा पुरस्कार अरविंद सावंत यांना जाहीर झाला आहे. सदर संस्था प्रतिवर्षी भारतातील लहान मुलांचे जीवन सुधारण्यासठी महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या खासदारांना पुरस्कार प्रदान करते.

अरविंद सावंत यांना लोकसभेत ‘शिक्षणाचा हक्क’, ‘मुलांवरील अत्याचारांपासुन त्यांची सुरक्षा’ ‘कुपोषण आणि बाल आरोग्य’ या संदर्भात चर्चासत्रातील त्यांचा उल्लेखनीय सहभाग आणि लोकसभेत उपस्थित केलेले प्रश्न, या सर्वांचा विचार करून २०१८-१९ वर्षासाठी उपरोक्त पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

http://arvindsawant.com/

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..